ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर News मध्ये क्वार्टाइल कोडी सोडवणे

Apple News+ सदस्यांना दररोज नवीन क्वार्टाइल्स कोड्यांचा ॲक्सेस मिळतो. खेळाडू शब्द तयार करण्यासाठी चार बाय पाच ग्रिडमधून दोन ते चार अक्षरे असलेली टाइल सिलेक्ट करतात. तुम्ही प्रत्येक शब्दासाठी कमाल चार टाइल वापरू शकता आणि जितक्या जास्त टाइलचा वापर कराल, तितके तुम्ही जास्त पॉइंट मिळवू शकता.

चार टाइलपासून तयार झालेल्या शब्दाला ‘क्वार्टाइल’ म्हणतात आणि त्याची किंमत 8 पॉइंट आहे. जेव्हा तुम्ही पाचही क्वार्टाइल शोधता, तेव्हा तुम्हाला अतिरिक्त 40 पॉइंट मिळतात.

‘सर्वोच्च’ स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले 100 पॉइंट मिळवणे हा गेमचा उद्देश आहे. तुम्ही ‘सर्वोच्च’ स्थानापर्यंत पोहोचल्यानंतरही शब्द तयार करणे आणि पॉइंट्स जमा करणे चालू ठेवू शकता.

नोट : Apple News, Apple News+, आणि कोडी सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

News ॲपमधील क्वार्टाइल्स कोडे.

‘क्वार्टाइल’ प्ले करणे

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. क्वार्टाइल्स कोडे उघडा.

  3. शब्द तयार करण्यासाठी टाइलवर टॅप करा, त्यानंतर ते प्रविष्ट करण्यासाठी ‘प्रविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

    उदाहरणार्थ, एक पॉइंट मिळविण्यासाठी, “pear” वर टॅप करा, नंतर ‘प्रविष्ट करा’ बटण वर टॅप करा. 2 पॉइंट मिळविण्यासाठी “ap” वर टॅप करा, त्यानंतर “appear” शब्द तयार करण्यासाठी “pear” वर क्लिक करा. “ap”, “pear”, नंतर “ance” वर टॅप करून 4 पॉइंट मिळवा. ‘क्वार्टाइल’ पूर्ण करा आणि “disappearance” असे स्पेलिंग तयार करून 8 पॉइंट मिळवा.

    पूर्ण केलेले शब्द ’सापडलेले शब्द’ बॉक्समध्ये दिसतात, आणि तुम्हाला सापडलेले कोणतेही ‘क्वार्टाइल’ चार टाइलच्या गटांमध्ये दिसतात.

    ‘क्वार्टाइल’ कोड्यांमध्ये सर्व संभाव्य शब्द योग्य ठरतात असे नाही. उदाहरणार्थ, अस्पष्ट आणि तांत्रिक टर्म, विशेषनाम आणि अपशब्द शब्दांच्या यादीत कधीही दिसत नाहीत.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमच्या टाइल रीऑर्डर करा : टाइलना ग्रिडच्या वर ठेवण्यासाठी तुम्ही टाइलवर टॅप केल्यानंतर, तुम्ही त्यावर टच आणि होल्ड करू शकता, नंतर त्यांना रीऑर्डर करण्यासाठी ड्रॅग करा.

    • पुढील स्थानावर जाण्यासाठी आवश्यक पॉइंट पहा : ‘पुढील स्थान’ वर टॅप करा.

    • तुम्हाला वापरायचे नसलेली टाइल क्लिअर करा : ‘काढून टाका’ बटण वर टॅप करा.

    • किती शब्द शिल्लक आहेत ते पहा : जेव्हा तुम्ही ‘सर्वोच्च’ स्थानावर पोहोचता, तेव्हा ‘सापडलेले शब्द’ बॉक्स दाखवतो की तुम्हाला किती शब्द सापडले नाहीत.

    • प्रत्येक शब्दाचे पॉइंट पहा : ‘सापडलेले शब्द’ बॉक्समध्ये ‘विस्तारित करा’ बटण वर टॅप करा.

टिप : अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर त्वरित ‘क्वार्टाइल’ ट्यूटोरिअल घेण्यासाठी ’कसे खेळावे’ वर टॅप करा किंवा ‘क्वार्टाइल’ कोडे फीड उघडण्यासाठी ‘अधिक कोडी’ वर टॅप करा.

टाइल शफल किंवा गटबध्द करणे

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. क्वार्टाइल्स कोडे उघडा आणि शब्द शोधणे सुरू करा.

  3. तुम्हाला आढळलेले क्वार्टाइल ग्रिडच्या तळाशी ॲन्कर केले गेले आहेत. जर तुम्हाला त्यांना ग्रिडच्या वरच्या भागात ॲंकर करायचे असेल, तर अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘सापडलेले क्वार्टाइल्स क्रमवार लावा’ निवडा.

  4. सापडलेल्या ‘क्वार्टाइल’ चा भाग नसलेल्या टाइल शफल करण्यासाठी शफल बटण वर टॅप करा.

  5. ग्रिडमधील सर्व टाइल शफल करण्यासाठी, ॲन्करिंग बंद करण्यासाठी व्यवस्थापन बटण वर टॅप करा, नंतर शफल बटण वर टॅप करा.

सर्व शब्द उघड करणे

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. क्वार्टाइल्स कोडे उघडा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘सर्व शब्द उघड करा’ वर टॅप करा. तुम्हाला न सापडलेले शब्द दाखवले जातात.

    • जर तुम्ही ‘सर्वोच्च’ स्थानापर्यंत पोहोचण्याआधी उघड केल्यास : तुमच्या ‘स्कोअरबोर्ड’ च्या आकडेवारी आणि स्ट्रीकमध्ये कोड्याची गणना केली जात नाही.

    • जर तुम्ही ‘सर्वोच्च’ स्थानापर्यंत पोहोचल्यानंतर उघड केल्यास : तुमची आकडेवारी किंवा स्ट्रीक्स प्रभावित झाले नाहीत.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.