iPad वरील ‘संदेश’ ॲपमध्ये लोकांचा पोल घेणे

तुम्ही काय खावे, कोणता चित्रपट पाहावा, कुठे प्रवास करावा, कधी भेटावे आणि इतर अनेक गोष्टी ठरवण्यासाठी कोणत्याही iMessage संभाषणात पोल पाठवू शकता. संभाषणातील प्रत्येकजण पर्यायांमध्ये योगदान देऊ शकतो आणि मते काय येतात ते पाहू शकतो.

नोट : पोल सुरू करण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा पोलमध्ये मतदान करण्यासाठी तुम्हाला iOS 26, iPadOS 26, macOS Tahoe, watchOS 26, visionOS 26 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर iMessage वापरणे आवश्यक आहे.

’संदेश’ ॲपमधील पोल.

पोल सुरू करणे

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. संभाषणात, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, नंतर ‘पोल्स’ वर टॅप करा.

  3. पर्याय समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक ओळीवर टॅप करा. पोलमध्ये जास्तीत जास्त 12 पर्याय असू शकतात.

  4. पाठवा बटण वर टॅप करा.

टिप : पोल्ससाठी सूचना प्राप्त करण्यासाठी Apple Intelligence* सुरू करा.

पोलमध्ये मतदान करणे

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. त्यामध्ये पोल असलेले संभाषण उघडा.

  3. तुमचे मत समाविष्ट करण्यासाठी पर्यायावर टॅप करा. तुमचे मत काढून टाकण्यासाठी पुन्हा टॅप करा. तुम्ही कोणत्याही पर्यायाला किंवा सर्व पर्यायांना मत देऊ शकता.

पोलमध्ये पर्याय समाविष्ट करणे

पोलमध्ये सहभागी होणारा कोणीही त्यात पर्याय समाविष्ट करू शकतो.

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. त्यामध्ये पोल असलेले संभाषण उघडा.

  3. ’पर्याय समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर दुसरा पर्याय प्रविष्ट करा.

  4. पोलमध्ये पर्याय समाविष्ट करण्यासाठी पाठवा बटण वर टॅप करा.

    नोट : मतांशिवाय पर्याय समाविष्ट केले जातात. तुम्ही समाविष्ट केलेल्या कोणत्याही पर्यायाला मत देण्यासाठी टॅप करा.

मतदानाचे परिणाम तपासणे

लोकांनी कसे मतदान केले आहे किंवा ज्यांनी अद्याप मतदान केलेले नाही हे तुम्ही पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. त्यामध्ये पोल असलेले संभाषण उघडा.

  3. पोलला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘पोलचे तपशील’ वर टॅप करा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.