ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPadOS 26 सह सुसंगत असलेले iPad मॉडेल

हे गाइड तुम्हाला iPad वापरणे सुरू करण्यात आणि iPadOS 26.4 सह करता येऊ शकणाऱ्या सर्व विलक्षण गोष्टी शोधण्यात मदत करते, जे पुढील मॉडेल्सशी सुसंगत आहे :

तुमचे फीचर आणि ॲप तुमच्या iPad चे मॉडेल, प्रदेश, भाषा आणि नेटवर्क प्रोव्हायडरनुसार बदलू शकतात. तुमच्या प्रदेशात कोणते फीचर सपोर्ट केलेले आहेत हे शोधण्यासाठी, iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

नोट : मोबाइल नेटवर्कवर डेटा पाठवणाऱ्या किंवा प्राप्त करणाऱ्या किंवा इनकमिंग कॉलचे उत्तर देणाऱ्या ॲप आणि सेवांसाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते. तुमचा सेवा प्लॅन आणि शुल्काविषयीच्या माहितीसाठी तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

तुमचे iPad मॉडेल आणि iPadOS व्हर्जन ओळखणे

सेटिंग  > सामान्य > ‘विषयी माहिती’ वर जा. तुमच्या iPad विषयी माहिती प्राप्त करणे पहा.

प्रत्यक्ष तपशीलांवरून तुमचे iPad मॉडेल निश्चित करण्यासाठी, तुमचे iPad मॉडेल ओळखा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

iPadOS अपडेट प्राप्त करणे

तुमचा iPad तुमच्या मॉडेलसह सुसंगत असणाऱ्या नवीनतम iPadOS सॉफ्टवेअरवर अपडेट करण्यासाठी, सेटिंग  > सामान्य > ‘सॉफ्टवेअर अपडेट’ वर जा. iPadOS अपडेट करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.