ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

फाइल बेसिक

फाइल ॲपमध्ये, तुम्ही तुमची फाइल शोधू शकता आणि बघू शकता, त्यांना फोल्डरमध्ये व्यवस्थापित आणि पुनर्रचना करू शकता, कॉम्प्रेस करू शकता, नाव बदलू शकता आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करू शकता, त्यांना iCloud Drive आणि इतर स्थानांवर ट्रान्सफर करू शकता आणि त्यामधून इतर ठिकाणी ट्रान्सफर करू शकता आणि बरेच काही करू शकता.

  1. तुमच्या iPad वर फाइल ॲपवर जा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • ईमेल किंवा इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या फाइल बघा : स्क्रीनच्या शीर्षस्थानी साइडबार बटण वर टॅप करा, नंतर साइडबारमध्ये 'डाउनलोड्स' वर टॅप करा. तुमच्या डाउनलोड केलेल्या फाइल्स शोधणे पहा.

      नोट : तुम्हाला साइडबार बटण दिसत नसल्यास, ’साइडबार लपवा’ बटण वर टॅप करा.

    • iCloud Drive वर तुमच्या फाइल ब्राउझ करा : स्क्रीनच्या शीर्षस्थानी साइडबार बटण वर टॅप करा. iCloud Drive ब्राऊझ करणे पहा.

    • तुम्ही अलीकडेच उघडलेल्या फाइल बघा : स्क्रीनच्या शीर्षस्थानी साइडबार बटण वर टॅप करा, नंतर साइडबारच्या शीर्षस्थानी ’अलीकडील’ वर टॅप करा.

    • शेअर केलेल्या फाइल बघा : स्क्रीनच्या शीर्षस्थानी साइडबार बटण वर टॅप करा, नंतर साइडबारमध्ये 'शेअर केलेले' वर टॅप करा.

    • फाइल किंवा फोल्डर कॉपी करा, मूव्ह करा, शेअर करा किंवा हटवा : फाइल किंवा फोल्डर शोधा, त्यावर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘कॉपी करा’, ‘मूव्ह करा’, ‘शेअर करा’ किंवा ‘हटवा’ वर टॅप करा. 'फाइल’ मध्ये फाइल आणि फोल्डर सुधारित करण्यासाठी पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.