iPad वर ’संगीत’ ॲपमध्ये फोल्डर्समध्ये प्लेलिस्टस् व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमच्या प्लेलिस्टस् व्यवस्थित ठेवण्यासाठी फोल्डर्स तयार करू शकता.

iPad वर ‘संगीत’ ॲप उघडते, ज्यामध्ये डावीकडे साइडबार असतो आणि उजवीकडे प्लेलिस्ट्सची यादी असते. शीर्षस्थानी नवीन प्लेलिस्ट तयार करण्यासाठी किंवा नवीन फोल्डर तयार करण्यासाठी बटणे आहेत. ’वर्क फोकस’ नावाच्या प्लेलिस्ट फोल्डरकडे संकेत करणारा निळा ॲरो.

नवीन प्लेलिस्ट फोल्डर तयार करणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, ’सर्व प्लेलिस्ट्स’ वर टॅप करा.

  3. वरच्या उजव्या बाजूला अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’नवीन फोल्डर’ वर टॅप करा.

  4. फोल्डरसाठी नाव टाइप करा, त्यानंतर ’तयार करा’ वर टॅप करा.

    फोल्डरचे नाव बदलण्यासाठी, वरच्या उजव्या बाजूला असलेल्या अधिक बटण वर टॅप करा, ’नाव बदला’ वर टॅप करा, त्यानंतर नवीन नाव टाइप करा.

प्लेलिस्ट फोल्डरमध्ये आयटम्स ‘समाविष्ट करणे’ किंवा त्यामधून ‘काढून टाकणे’

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, प्लेलिस्ट किंवा फोल्डरवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘ह्यामध्ये मूव्ह करा’ वर टॅप करा.

    टिप : तुम्ही प्लेलिस्ट किंवा फोल्डर दुसऱ्या फोल्डरमध्ये देखील ड्रॅग करू शकता.

  3. ‘फोल्डर’ वर टॅप करा, त्यानंतर ’मूव्ह करा’ वर टॅप करा.

    जर प्लेलिस्ट आधीपासूनच फोल्डरमध्ये असल्यास आणि तुम्हाला ती पुन्हा मुख्य ‘प्लेलिस्ट’ मध्ये मूव्ह करायची असल्यास, ‘फोल्डर’ सिलेक्ट करू नका—फक्त ‘मूव्ह करा’ वर टॅप करा.

टिप : तुम्ही नवीन फोल्डर तयार करू शकता आणि प्लेलिस्ट त्यामध्ये मूव्ह करू शकता—तुमच्या लायब्ररीमध्ये प्लेलिस्टवर फक्त टच आणि होल्ड करा, ‘ह्यावर मूव्ह करा’ वर टॅप करा, नंतर ‘नवीन फोल्डर’ वर टॅप करा.

तुम्ही तुमच्या प्लेलिस्ट फोल्डर्समध्ये केलेले बदल ‘लायब्ररी सिंक करा’ सुरू केलेले असताना तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर अपडेट केले जातात (सेटिंग  > ॲप्स > ‘संगीत’ वर जा, त्यानंतर ‘लायब्ररी सिंक करा’ सुरू करा). तुम्ही Apple Music चे सदस्य नसल्यास, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या संगणकासह सिंक कराल तेव्हा तुमच्या संगीत लायब्ररीमध्ये बदल दिसून येतील.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.