ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘Mail’ ॲपमध्ये इनकमिंग ईमेल्स ऑटोमॅटिकली वर्गीकृत करणे

‘Mail’ ॲप तुमचे ईमेल संदेश श्रेणीमध्ये ऑटोमॅटिकली क्रमवार लावते, जेणेकरून तुम्हाला संदेश अधिक जलद शोधता येतील आणि मॅनेज करता येतील (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही).

  •  प्राथमिक : वैयक्तिक संदेश आणि वेळ संवेदनशील माहिती शोधा.

  •  व्यवहार : तुमची पुष्टीकरणे, पावत्या आणि शिपिंग सूचनांचा मागोवा घ्या.

  •  अपडेट्स : बातम्या, न्यूजलेटर्स आणि सोशल अपडेट्स पहा.

  •  प्रमोशन्स : तुमचे कूपन आणि विक्रीचे ईमेल ब्राउझ करा.

नोट : जेव्हा ‘व्यवहार’, ‘अपडेट’ किंवा ‘प्रमोशन’ संदेशामध्ये वेळ संवेदनशील माहिती समाविष्ट असते, तेव्हा ती ‘प्राथमिक’ संदेश यादीमध्ये देखील समाविष्ट केली जाईल.

‘व्यवहार’, ‘अपडेट’ किंवा ‘प्रमोशन’ च्या प्रेषकाने पाठवलेले सर्व संदेश बघणे

जेव्हा तुम्ही ‘व्यवहार’, ‘अपडेट’ किंवा ‘प्रमोशन’ संदेशावर टॅप करता, तेव्हा त्या प्रेषकाच्या संदेशांचा ‘डायजेस्ट व्ह्यू’ उघडतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर ‘व्यवहार’ संदेश उघडला, तर तुम्ही वर किंवा खाली स्क्रोल केल्यावर त्या प्रेषकाकडून प्राप्त झालेले इतर सर्व ‘व्यवहार’ संदेश दिसतील.

नोट : जेव्हा तुम्ही डायजेस्ट व्ह्यू उघडता तेव्हा तुम्ही प्रेषकाच्या सर्व संदेशांवर कृती करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. ‘व्यवहार’ , 'अपडेट' , किंवा 'प्रमोशन' संदेशावर टॅप करा.

    त्याच प्रेषकाकडून प्राप्त झालेले त्या श्रेणीतील तुमचे सर्व संदेश यादीमध्ये दिसतात.

  3. प्रेषकाकडून प्राप्त झालेले तुमचे सर्व संदेश बघण्यासाठी, प्रेषकाच्या संदेश यादीच्या शीर्षस्थानी ‘ॲक्शन मेन्यू’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’सर्व संदेश दाखवा’ निवडा.

नोट : ‘प्राथमिक’ संदेश प्रेषकाद्वारे गटबद्ध केले जात नाहीत.

स्क्रोल करताना केवळ एक ‘व्यवहार’, ‘अपडेट्स’ किंवा ‘प्रमोशन्स’ संदेश बघण्यासाठी, साइडबारमध्ये अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर 'प्रेषकानुसार गट बनवा' बंद करा.

प्रेषकाची श्रेणी बदलणे

तुम्ही प्रेषकाच्या संदेशांचे तुमच्या निवडीच्या श्रेणीमध्ये मॅन्युअली वर्गीकरण करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. संदेशावर टॅप करा, स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यातील अधिक मेनू वर टॅप करा, त्यानंतर 'प्रेषक वर्गीकृत करा' निवडा.

  3. श्रेणी निवडा, त्यानंतर ’चालू ठेवा’ वर टॅप करा.

    प्रेषकाकडून प्राप्त झालेले सध्याचे आणि भविष्यातील सर्व संदेश तुम्ही निवडलेल्या श्रेणीमध्ये दिसतील.

श्रेणी बंद करणे

टिप : ईमेल श्रेणी बघण्यावरून तुमचे सर्व ईमेल बघण्यावर त्वरित स्विच करण्यासाठी, तुम्ही सध्या बघत असलेल्या स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या श्रेणीवर टॅप करा.

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. इनबॉक्समध्ये, स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’यादी व्ह्यू’ निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.