ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर FaceTime व्हिडिओ सेटिंग बदलणे

FaceTime ॲपमध्ये कॉल दरम्यान, तुम्ही 'पोर्ट्रेट' मोड, 'स्टुडिओ लाइट' आणि 'सेंटर स्टेज’ सुरू किंवा बंद करू शकता, कॅमेऱ्यांमध्ये स्विच करू शकता किंवा तुमचा कॅमेरा सुरू किंवा बंद करू शकता.

पोर्ट्रेट मोड वापरून बॅकग्राउंड ब्लर करणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सवर, तुम्ही 'पोर्ट्रेट' मोड सुरू करू शकता, ज्याने बॅकग्राउंड ऑटोमॅटिकली अस्पष्ट केली जाते आणि ‘कॅमेरा’ मधील ‘पोर्ट्रेट’ मोड प्रमाणेच तुमच्यावर व्हिज्युअल फोकस ठेवला जातो.

  1. तुमच्या iPad वर FaceTime ॲपमध्ये कॉल दरम्यान, तुमच्या टाइलवर टॅप करा. जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ‘व्हिडिओ’ ॲपमध्ये कॉलवर असाल, तेव्हा ’कंट्रोल सेंटर’ उघडा, नंतर ॲपच्या नावावर टॅप करा.

  2. ’पोर्ट्रेट’ वर टॅप करा.

    ‘पोर्ट्रेट मोड’ बंद करण्यासाठी, बटणावर पुन्हा टॅप करा.

‘पोर्ट्रेट’ मोडमध्ये बॅकग्राउंड ब्लरचे प्रमाण ॲडजस्ट करण्यासाठी, ’कंट्रोल सेंटर’ उघडा, FaceTime (किंवा थर्ड पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपचे नाव) वर टॅप करा, नंतर ‘पोर्ट्रेट’ स्लायडर वापरा.

तुमचा चेहरा हायलाइट करणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुम्ही 'स्टुडिओ लाइट' चालू करू शकता, ज्याने बॅकग्राउंड डिम केले जाते आणि तुमचा चेहरा उजळतो.

  1. तुमच्या iPad वर FaceTime ॲपमध्ये कॉल दरम्यान, तुमच्या टाइलवर टॅप करा. जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ‘व्हिडिओ’ ॲपमध्ये कॉलवर असाल, तेव्हा ’कंट्रोल सेंटर’ उघडा, नंतर ॲपच्या नावावर टॅप करा.

  2. ‘स्टुडिओ लाइट’ वर टॅप करा.

    ‘स्टुडिओ लाइट’ मोड बंद करण्यासाठी, बटणावर पुन्हा टॅप करा.

‘स्टुडिओ लाइट’ मोडमध्ये प्रकाशाची तीव्रता ॲडजस्ट करण्यासाठी, ’कंट्रोल सेंटर’ उघडा, FaceTime (किंवा थर्ड पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपचे नाव) वर टॅप करा, नंतर ‘स्टुडिओ लाइट’ स्लायडर वापरा.

‘सेंटर स्टेज’ बंद किंवा सुरू करणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुम्ही सेंटर स्टेज वापरू शकता, ज्याने तुम्ही FaceTime कॉलच्या दरम्यान ‘फिल्ड ऑफ व्ह्यू' मध्ये फिरत असताना तुम्हाला फ्रेम करण्यासाठी तुमचा फ्रंट कॅमेरा ऑटोमॅटिकली ॲडजस्ट केला जातो.

  1. तुमच्या iPad वर FaceTime ॲपमध्ये कॉल दरम्यान, तुमच्या टाइलवर टॅप करा. जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ‘व्हिडिओ’ ॲपमध्ये कॉलवर असाल, तेव्हा ’कंट्रोल सेंटर’ उघडा, नंतर ॲपच्या नावावर टॅप करा.

  2. ‘सेंटर स्टेज’ डिफॉल्टनुसार सुरू असते. ‘सेंटर स्टेज’ बंद करण्यासाठी त्यावर टॅप करा.

    ‘सेंटर स्टेज’ सुरू करण्यासाठी, त्यावर पुन्हा टॅप करा.

काही iPad मॉडेलवर, ‘सेंटर स्टेज’ बटण तुमच्या टाइलमध्ये दिसते. ‘सेंटर स्टेज’ चालू करण्यासाठी, तुम्ही तुमच्या टाइलवर टॅप करू शकता, त्यानंतर ‘सेंटर स्टेज’ बटण वर टॅप करा.

रिअर कॅमेऱ्यावर स्विच करणे

  1. तुमच्या iPad वर FaceTime ॲपमध्ये कॉल दरम्यान, तुमच्या टाइलवर टॅप करा.

  2. ‘फ्लिप करा’ वर टॅप करा.

फ्रंट कॅमेऱ्यावर परत स्विच करण्यासाठी, ‘फ्लिप करा’ वर पुन्हा टॅप करा.

नोट : तुम्ही रिअर कॅमेरा वापरत असताना, तुम्ही ‘1x’ वर टॅप करून इमेज मोठी करू शकता. त्यावर पुन्हा टॅप केल्याने इमेज नेहमीच्या आकारात परत येते.

तुमचा कॅमेरा बंद करणे

  1. तुमच्या iPad वर FaceTime ॲपमध्ये कॉलच्या दरम्यान, FaceTime कंट्रोल्स दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा (जर ते दृश्यमान नसतील तर).

  2. ’कॅमेरा स्विच’ बटण वर टॅप करा.

    कॅमेरा परत सुरू करण्यासाठी ’कॅमेरा स्विच’ बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.