ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

Apple Pencil वापरून बरेच काही करणे

Apple Pencil संपूर्ण नवीन iPad अनुभव प्रदान करते, ज्यात तुम्ही दैनंदिन वापरात येणाऱ्या ॲपमध्ये ॲनोटेशन, रेखाटन, मार्कअप आणि संपादन करू शकता.

Keynote डॉक्युमेंटच्या तळाशी उजवीकडे ‘क्विक नोट’ उघडलेली आहे.

क्विक नोट लिहिणे

तुमच्या iPad वर तुम्ही काहीही करत असलात तरी, ‘क्विक नोट’ द्वारे तुम्ही कल्पना लिहून ठेवू शकता आणि लिंक समाविष्ट करू शकता. iPad च्या तळाशी उजव्या कोपऱ्यातून Apple Pencil स्वाइप करा, नोटवर टॅप करा, नंतर लिहिणे सुरू करा.

वनस्पतींची रेखाचित्रे असलेला आणि तळाशी ड्रॉईंग टूल असलेला Freeform बोर्ड.

Freeform मध्ये कल्पना संकलित करणे

Freeform ॲप लवचिक कॅनव्हास प्रदान करते जिथे तुम्ही तुमच्या सर्व कल्पना एकाच ठिकाणी पाहू आणि शेअर करू शकता. तुम्ही नवीन प्रकल्प रेखाटू शकता, तुमच्या पुढच्या मोठ्या कल्पनेवर विचारमंथन करू शकता किंवा FaceTime वर फ्रेंडबरोबर रेखाटन करू शकता. बोर्ड तयार करण्यासाठी, ‘नवीन बोर्ड’ बटण वर टॅप करा, त्यानंतर Apple Pencil ने रेखाटन सुरू करा. बोर्डवर तुमच्या कल्पना व्यक्त करण्यासाठी वॉटरकलर ब्रश, कॅलिग्राफी पेन आणि हायलाइटर ह्यासारख्या साधनांचा वापर करा—केवळ तुमची कल्पनाशक्ती मर्यादित आहे.

Keynote स्लाइडमध्ये शीर्षक समाविष्ट केले जात आहे. टेक्स्ट Apple Pencil वापरून हस्तलिखित केला जात असल्याने शब्द टाइप केलेल्या टेक्स्टमध्ये बदलतात.

हस्ताक्षर टाइप केलेल्या टेक्स्टमध्ये बदलणे

तुम्ही कोणत्याही टेक्स्ट क्षेत्रामध्ये Apple Pencil सह लिहू शकता आणि तुमचे शब्द ऑटोमॅटिकली टाइप केलेल्या टेक्स्टमध्ये रूपांतरित होतात. तुमचे हस्तलेखन तुमच्या iPad वर थेट टेक्स्टमध्ये रूपांतरित केले जाते, त्यामुळे तुमचे लेखन गोपनीय राहते. सेटिंग ॲपवर  जा, 'Apple Pencil' वर टॅप करा, नंतर 'स्क्रिबल' सुरू करा.

निळ्या मार्कर टूलचा वापर करून लिहिलेल्या टिप्पणीसह Keynote डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट.

स्क्रीनशॉट मार्कअप करणे

त्वरित स्क्रीनशॉट घ्या आणि मार्कअप करा जेणेकरून तुम्ही टीम प्रोजेक्टवर स्पष्ट फीडबॅक देऊ शकाल. स्क्रीनशॉट घेण्यासाठी, iPad च्या तळाशी डाव्या कोपऱ्यातून Apple Pencil स्वाइप करा, नंतर तुमचे विचार समाविष्ट करण्यासाठी ड्रॉइंग टूल्स वापरा. तुमचा फीडबॅक शेअर करण्यासाठी शेअर बटण वर टॅप करा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

फीचरची उपलब्धता तुमची भाषा आणि देश किंवा प्रदेशानुसार बदलू शकते.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.