ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘स्टेज मॅनेजर’ सह विंडोज व्यवस्थापित करणे

तुम्ही मल्टीटास्किंग करण्यासाठी आणि गोष्टी सहजतेने पूर्ण करण्यासाठी ‘स्टेज मॅनेजर’ वापरू शकता. तुम्ही विशिष्ट कार्ये किंवा प्रोजेक्ट्ससाठी ॲप्सचे गट तयार करू शकता आणि विंडोज व्यवस्थापित करू शकता, त्यांचा आकार बदलू शकता आणि त्यांना ओव्हरलॅप करू शकता.

स्टेज मॅनेजर चालू किंवा बंद करणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’मल्टीटास्किंग व जेस्चर्स’ वर टॅप करा, नंतर ’स्टेज मॅनेजर’ सिलेक्ट करा.

    तुम्ही एकाच वेळी अनेक ॲप्समध्ये काम करण्यासाठी निवडू शकता असे ‘मल्टीटास्किंग व जेस्चर्स’ पर्याय दाखवणारे iPad सेटिंग ॲप.

जेव्हा तुम्ही ‘स्टेज मॅनेजर’ चालू करता, तेव्हा तुम्ही काम करत असलेली ॲप्स पुढच्या बाजूला मूव्ह होतात आणि इतर सर्व उघडलेली ॲप्स स्क्रीनच्या डाव्या बाजूला ‘अलीकडील’ ॲप्सची यादी तयार करतात.

‘स्टेज मॅनेजर’ सह iPad डिस्प्ले चालू आहे. सध्याची विंडो पुढे आहे आणि इतर अलीकडील ॲप्स स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या यादीत आहे.

‘स्टेज मॅनेजर’ मधील ॲप्समध्ये स्विच करणे

‘स्टेज मॅनेजर’ च्या मदतीने तुम्ही अलीकडील ॲप्सच्या यादीतील दुसऱ्या ॲपवर टॅप करून किंवा Dock मधील आयकॉनवर टॅप करून ॲप्स स्विच करू शकता.

जेव्हा तुम्ही दुसऱ्या ॲपवर स्विच करता, तेव्हा तुम्ही काम करत असलेले ॲप किंवा गट ‘अलीकडील’ ॲप्सच्या यादीमध्ये डावीकडे मूव्ह केले जातात आणि तुम्ही टॅप केलेल्या ॲपने बदलले जाते.

तुम्ही ॲप्स स्विच करण्यासाठी पुढीलपैकी काहीही करू शकता :

  • स्क्रीनच्या तळापासून वर स्वाइप करा, नंतर अलीकडील ॲप आणि गट पाहण्यासाठी स्क्रीनच्या मध्यभागी पॉज करा.

  • स्क्रीनच्या खालच्या कडेला एका बोटाने डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा. (होम बटणसह iPad वर, हे जेस्चर थोड्याशा आर्कसह करा.)

  • चार किंवा पाच बोटांनी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.

iPad वर ॲप्समध्ये स्विच करणे पहा.

‘स्टेज मॅनेजर’ मध्ये ॲप्सना गटांमध्ये व्यवस्थापित करणे

तुम्ही ‘अलीकडील’ ॲप्सच्या यादीमधून ॲप विंडोजना स्क्रीनच्या मध्यभागी ड्रॅग करून विशिष्ट कार्ये किंवा प्रोजेक्ट्ससाठी विंडोजचे गट तयार करू शकता. तुम्ही ॲप आयकॉन्सना गटामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांना ‘Dock’ मधून स्क्रीनच्या मध्यभागी ड्रॅग करू शकता.

तुम्ही विंडोला डावीकडे ड्रॅग करून ‘अलीकडील’ ॲप्सच्या यादीमध्ये परत आणू शकता. तुम्ही ॲपच्या गटातील विंडो लहान केल्यास, ॲप विंडो गटामधून काढून टाकली जाते आणि ‘अलीकडील’ ॲप्सच्या यादीमध्ये परत आणली जाते.

अलीकडील ॲप्सची यादी लपवणे किंवा दाखवणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’मल्टीटास्किंग व जेस्चर्स’ वर टॅप करा, नंतर ’स्टेज मॅनेजर’ साठी चेकबॉक्स सिलेक्ट किंवा डीसिलेक्ट करा.

टिप : जेव्हा तुम्ही विंडो खूप जवळ मूव्ह करता तेव्हा अलीकडील ॲप्सची यादी लपवली गेल्यास, तुम्ही स्क्रीनच्या डाव्या कडेवरून स्वाइप करून ती पुन्हा प्रदर्शित करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.