iPad वर ‘प्रिव्ह्यू’ ॲपमध्ये PDF फॉर्म्स भरा आणि त्यावर स्वाक्षरी करा

तुम्ही ‘प्रिव्ह्यू’ ॲपमध्ये PDF फॉर्म्स भरून त्यावर स्वाक्षऱ्या करू शकता.

‘प्रिव्ह्यू’ ॲपमध्ये PDF फॉर्म दाखवणारी स्क्रीन, ज्यामध्ये भरण्यायोग्य फील्ड हायलाइट केलेले आहेत. स्क्रीनच्या तळाशी ’ॲनोटेशन समाविष्ट करा’, ’मार्कअप’, ’ऑटोफिल’, ’क्रॉप करा’ ,’माहिती’ ‘शेअर करा’ आणि ’सर्च करा’ बटणे आहेत. ’ऑटोफिल’ बटण सिलेक्ट केले गेले आहे.
  1. तुमच्या iPad वर ‘प्रिव्ह्यू’ ॲपवर जा.

  2. PDF फॉर्म उघडा.

  3. ’फॉर्म भरा’ बटण वर टॅप करा.

  4. निळ्या फील्डवर टॅप करा, त्यानंतर माहिती प्रविष्ट करा (किंवा ऑनस्क्रीन कीबोर्डच्या वर असलेल्या बारमध्ये संपर्क माहिती सिलेक्ट करा).

  5. स्वाक्षरी किंवा टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करण्यासाठी ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

    टिप : स्वाक्षरी तयार करण्यासाठी तुम्ही Apple Pencil (सुसंगत iPad सह) वापरू शकता किंवा तुमच्या बोटाने रेखाटू शकता. Apple Pencil ची iPad मॉडेल्सशी अनुरुपता पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.