ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ॲपच्या अनेक विंडोज उघडणे आणि बघणे

ॲपमध्ये नवीन विंडो उघडणे

  1. मेन्यू दिसत नाही तोपर्यंत अनेक विंडोजना सपोर्ट करणाऱ्या ॲपसाठी (उदाहरणार्थ, Mail, नोट्स, Safari, फाइल आणि इतर) ‘ॲप आयकॉन’ वर टच आणि होल्ड करा.

  2. मेन्यूमधून ’नवीन विंडो’ निवडा.

    Freeform ॲप मेन्यूसह उघडी असलेली iPad ची होम स्क्रीन, तुम्ही निवडू शकणाऱ्या कृतींची यादी दाखवत आहे, ज्यामध्ये ॲपमध्ये नवीन विंडो उघडणे, नवीन बोर्ड तयार करणे, उघड्या असलेल्या सर्व विंडोज दाखवणे आणि अश्या इतर बऱ्याच कृतींचा समावेश होतो.

नोट : ह्या व्यतिरिक्त, ॲपमध्ये नवीन विंडो उघडण्यासाठी, तुम्ही Dock मधून ॲप आयकॉन त्याच ॲपच्या दुसऱ्या विंडोच्या वर ड्रॅग करू शकता, किंवा ॲप विंडोच्या बाहेर किंवा iPad च्या कडांपर्यंत कॉण्टेण्ट (उदाहरणार्थ, नोट किंवा Mail संदेश) ड्रॅग करून फक्त त्या कॉण्टेण्टसाठी विंडो उघडू शकता.

ॲपच्या उघडलेल्या विंडो बघणे

तुम्ही ॲपमध्ये अनेक विंडोज उघडल्यास, तुम्ही ॲप Exposé सह विशिष्ट ॲपच्या सर्व उघडलेल्या विंडोज एकाच वेळी बघू शकता.

  1. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • Dock उघडण्यासाठी स्क्रीनच्या खालच्या कडेवरून ‘वर’ स्वाइप करा.

    • होम स्क्रीनवर जा.

  2. ‘होम स्क्रीन’ वर किंवा ‘Dock’ मध्ये, तुम्हाला बघायच्या असलेल्या विंडोजसह ॲपवर टच आणि होल्ड करा, नंतर ‘सर्व विंडोज दाखवा’ वर टॅप करा किंवा ‘ओपन विंडोज’ खाली दिलेल्या यादीतील विशिष्ट विंडोवर टॅप करा.

    नोट : तुम्ही ‘होम स्क्रीन’ वरील ॲपला जास्त वेळ टच आणि होल्ड केल्यास, सर्व ॲप्स हलायला लागतात. वरच्या उजव्या बाजूला ’पूर्ण’ वर टॅप करा, त्यानंतर पुन्हा प्रयत्न करा.

    Mail ॲपसाठी उघडलेल्या विंडोजसह iPad स्क्रीन आणि अनेक विंडोजपैकी एका विंडोमध्ये ॲपसाठी ॲप मेन्यू दाखवते.

    टिप : ॲपच्या उघडलेल्या विंडोज बघण्याचा आणखी एक मार्ग येथे आहे : स्क्रीनच्या तळापासून ‘वर’ स्वाइप करा, Exposé उघडण्यासाठी मध्यभागी पॉज करा, त्यानंतर त्या ॲपसाठी ‘ॲप Exposé’ उघडण्यासाठी ॲप आयकॉन्सपैकी एकावर टॅप करा.

iPad वर ॲप्समध्ये स्विच करणे पहा.

ॲपसाठी लपवलेल्या विंडोज बघणे

जेव्हा तुम्ही लपवलेल्या विंडोजसह (मिनिमाइज केलेल्या, फुल स्क्रीन केलेल्या किंवा दुसऱ्या ॲपच्या मागे असलेल्या) ॲपवर स्विच करता, तेव्हा ॲपच्या सर्व उघडलेल्या विंडोज बघण्यासाठी तुम्ही टॅप करू शकता असे अंडाकृती आकाराचे बटण दिसते.

दोन ॲप्स उघडलेली iPad स्क्रीन आणि अंडाकृती आकाराचे ‘सर्व विंडोज दाखवा’ बटण, ज्यावर टॅप केल्यावर, टार्गेट ॲपमधील सर्व उघडलेल्या विंडोज दाखवल्या जातात.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.