ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘होम’ मध्ये HomePod सेट अप करणे

HomePod सेट अप करण्यासाठी आणि अनेक HomePod सेटिंग नियंत्रित करण्यासाठी तुम्ही होम ॲप वापरू शकता.

iPad आणि HomePod सह तुम्ही काय करू शकता हे जाणून घेण्यासाठी, HomePod यूझर गाइडमध्ये पुढील गोष्टी पहा :

नोट : HomePod सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही.

इंटरकॉम संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ‘होम’ वापरणे

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘होम सेटिंग’ वर टॅप करा.

  3. ‘इंटरकॉम’ वर टॅप करा, नंतर हे सेटिंग कॉन्फिगर करा :

    • तुम्ही इंटरकॉम संदेश केव्हा प्राप्त करू शकता

    • इंटरकॉम संदेश पाठवण्याची किंवा प्राप्त करण्याची अनुमती कुणाला आहे

    • कोणते HomePod स्पीकर इंटरकॉम वापरू शकतात

    नोट : इंटरकॉम संदेश केव्हा प्राप्त व्हावे हे ‘होम’ चा कोणताही सदस्य निवडू शकतो. इंटरकॉम संदेश कोण पाठवू किंवा प्राप्त करू शकतात आणि कोणते HomePod स्पीकर इंटरकॉम वापरू शकतात हे केवळ घरमालक किंवा ॲडमिनिस्ट्रेटर निवडू शकतात.

  4. ‘मागे’ वर टॅप करा, नंतर 'झाले' वर टॅप करा.

  5. इंटरकॉम बटण वर टॅप करा, “Who ate the last cookie?” असे काहीतरी म्हणा. त्यानंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    तुमचा इंटरकॉम संदेश तुमच्या घरातील सर्व HomePod स्पीकरना, आणि iOS, iPadOS, आणि watchOS डिव्हाइसवर तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या डिव्हाइसवर पाठवला जातो जे इंटरकॉम संदेश पाठवू आणि प्राप्त करू शकतात.

HomePod यूझर गाइडमध्ये HomePod इंटरकॉम स्वरूपात वापरा पहा.

अतिथींना घोषित करण्यासाठी HomePod आणि HomeKit सुरक्षित व्हिडिओ वापरणे

HomeKit सुरक्षित व्हिडिओ कॅमेरा किंवा डोअरबेलसह, HomePod तुमच्या ओळखीची व्यक्ती दरवाज्यात असेल तेव्हा तुम्हाला सूचित करू शकतो (किंवा ती व्यक्ती ओळखली नसल्यास तुम्हाला संदेश पाठवू शकतो).

नोट : पाहुण्यांबाबत घोषणा करण्यासाठी, प्रथम फेस रेकग्निशन चालू करा.

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. होम टॅबवर, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘होम सेटिंग’ वर टॅप करा.

  3. ‘कॅमेरा व डोअरबेल’ वर टॅप करा, त्यानंतर तुमचा कॅमेरा किंवा डोअरबेलवर टॅप करा.

  4. ‘डोअरबेल चाइम’ वर टॅप करा, त्यानंतर कोणते HomePod स्पीकर किंवा स्पीकर्स एनेबल करायचे ते निवडा

HomePod अलार्म आणि टायमर समाविष्ट आणि संपादित करण्यासाठी ‘होम’ वापरणे

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. HomePod टाइलच्या उजव्या बाजूला टॅप करा, वर स्वाइप करा, त्यानंतर खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • अलार्म समाविष्ट करा : ‘नवीन’ वर टॅप करा, अलार्म तयार करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    • अलार्म संपादित करा : ‘अलार्म’ वर टॅप करा, वेळ बदला, नंतर ‘झाले’ वर टॅप करा.

    • अलार्म चालू किंवा बंद करा : अलार्मच्या बाजूच्या स्विचवर टॅप करा.

    • अलार्म हटवा : गजरावर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘हटवा’ वर टॅप करा.

    • नवीन टायमर तयार करा : ‘नवीन टायमर’ वर टॅप करा, टायमर लेबल प्रविष्ट करा (ऐच्छिक), टायमरचा कालावधी निवडा, नंतर ‘सुरू करा’ वर टॅप करा.

    • टायमर पॉज आणि रीस्टार्ट करा : ‘पॉज करा’ बटण वर टॅप करा; टायमर रीस्टार्ट करण्यासाठी प्ले बटण वर टॅप करा.

    • टायमर काढून टाका : ‘हटवा’ बटण वर टॅप करा.

HomePod सेटिंग बदलणे

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. HomePod टाइलच्या उजव्या बाजूला टॅप करा.

  3. ‘सेटिंग’ बटण वर टॅप करा, त्यानंतर HomePod सेटिंग कॉन्फिगर करा.

    तुम्ही HomePod वेगळ्या खोलीमध्ये असाइन करू शकता, ऑटोमेशन समाविष्ट करू शकता, एकाच खोलीमध्ये एकाच प्रकारच्या दोन HomePod स्पीकरसह स्टिरिओ पेअर तयार करू शकता, आणि बरेच काही करू शकता.

अलार्म ध्वनी ऐकण्यासाठी HomePod वापरणे

तुमच्या घरात अलार्म ध्वनी आढळल्यास HomePod तुम्हाला सूचित करू शकतो.

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. HomePod टाइलच्या उजव्या बाजूला टॅप करा.

  3. ‘सेटिंग’ बटण वर टॅप करा, नंतर ‘साउंड रेकग्निशन’ वर टॅप करा.

  4. ‘धूर व CO अलार्म’ चालू करा, त्यानंतर कोणते HomePod अलार्म ऐकतील ते निवडा.

तुमचा HomePod विशिष्ट आवाज ऐकेल आणि अलार्मचे ध्वनी ओळखले जाऊ शकतील तेव्हा तुम्हाला सूचित करेल.

महत्त्वाचे : साउंड रेकग्निशनद्वारे धूर आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्मचे ध्वनी ओळखले जाऊ शकतात आणि ओळखल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवले जाऊ शकतात. तुम्हाला दुखापत किंवा इजा होऊ शकते अशा परिस्थितीत, किंवा उच्च जोखीम किंवा आपत्कालीन परिस्थितीत साउंड रेकग्निशनवर अवलंबून राहू नये. साउंड रेकग्निशनसाठी 'Apple होम' चे नवीन व्हर्जन आवश्यक आहे.

Siri द्वारे एनेबल केलेली ॲक्सेसरी समाविष्ट करणे

सुसंगत Apple Home ॲक्सेसरीजवर Siri एनेबल करून तुम्ही तुमच्या संपूर्ण होममध्ये HomePod चा ॲक्सेस वाढवू शकता. तुम्ही ह्या ॲक्सेसरीवर Siri एनेबल केल्यास, तुम्ही तुमच्या आवाजाने त्यांना नियंत्रित करू शकता, रोजच्या प्रश्नांसाठी किंवा टास्कसाठी मदत मिळवू शकता, आणि तुमचे आवडते संगीत आणि पॉडकास्ट प्ले करू शकता.

HomePod यूझर गाइडमध्ये Siri द्वारे एनेबल केलेली ॲक्सेसरी सेट अप करा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.