ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘शोधाशोध’ मधून AirTag, Apple Pencil Pro, किंवा इतर आयटम काढून टाकणे

तुमच्या Apple अकाउंटमधून AirTag, Apple Pencil Pro किंवा थर्ड पार्टी आयटम काढून टाकण्यासाठी तुम्ही शोधाशोध ॲप वापरू शकता जेणेकरून इतर कोणालातरी त्याची नोंदणी करता येऊ शकेल.

  AirTag , Apple Pencil Pro , किंवा थर्ड पार्टी आयटम नोंदणी कशी करावी हे जाणून घ्या.

AirTag किंवा इतर आयटम काढून टाकणे

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या ‘आयटम’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला काढून टाकायचे असलेल्या आयटमवर टॅप करा.

  3. आयटम तुमच्या iPad च्या जवळ आणा.

    जरी आयटम तुमच्या डिव्हाइसच्या जवळ नसेल, तरीही तुम्ही तो तुमच्या अकाउंटमधून काढून टाकू शकता. तथापि, कोणालाही त्यांच्या Apple अकाउंटवर आयटम नोंदविता येण्याकरिता तो आधी रीसेट करणे आवश्यक आहे.

  4. ‘आयटम काढून टाका’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

Apple Pencil Pro काढून टाकणे

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ‘डिव्हाइसेस’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला हटवायचे असलेल्या ‘Apple Pencil Pro’ वर टॅप करा.

  3. खाली स्क्रोल करा आणि ‘हे डिव्हाइस काढून टाका’ वर टॅप करा.

    Apple Pencil Pro काढून टाकल्याने ‘शोधाशोध’ लॉक काढून टाकले जाते ज्यामुळे दुसरे Apple अकाउंट त्यांच्या iPad वर ‘शोधाशोध’ मध्ये Apple Pencil Pro समाविष्ट करू शकते.

नोट : आयटम रीसेट करण्यासाठी उत्पादकाचा सूचनांचे पालन करा. AirTag साठी, तुमचे AirTag कसे रीसेट करायचेह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.