ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर संदेश नोटिफिकेशन्स थांबवा, म्यूट करा आणि बदला

तुम्हाला प्राप्त होणाऱ्या टेक्स्ट संदेशांविषयी तुम्हाला सूचित केले गेले आहे किंवा नाही आणि नोटिफिकेशन कसे दिसतात किंवा कसा आवाज करतात हे तुम्ही बदलू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही संदेश नोटिफिकेशनशन्स बंद करू शकता जेणेकरून तुम्ही मीटिंगमध्ये असताना किंवा इतर शांत जागी असताना नोटीफिकेशनच्या आवाजामुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही किंवा विशिष्ट संपर्कांसाठी विशेष आवाज असाइन करू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून आलेला संदेश कळेल.

सेटिंगमधील ‘संदेश’ नोटिफिकेशन सेटिंग.

सर्व नोटिफिकेशन थांबवणे

तुम्ही संदेश प्राप्त करणे चालू ठेवत असताना संदेश ॲपमध्ये ॲक्टिव्हिटीबद्दल सूचना मिळणे थांबवू शकता. जेव्हा तुम्ही ते वाचण्यास तयार असाल, तेव्हा नोटिफिकेशन बंद असताना तुम्ही मिस्ड टेक्स्ट पाहण्यासाठी तुम्ही ‘संदेश’ उघडू शकता आणि तुम्ही मिस्ड संदेश तपासू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘नोटिफिकेशन्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’संदेश’ ॲपवर टॅप करा.

  3. ’नोटिफिकेशनला अनुमती द्या’ बंद करा.

नोट : तुम्ही नोटिफिकेशन्स सायलेंट केलेले असल्याचे दर्शवणारी नोट प्रेषकांना प्राप्त होते.

तुम्ही त्यांचे संदेश वाचले आहेत हे लोकांना कळवण्यासाठी, तुम्ही ’वाचल्याच्या पावत्या’ चालू करू शकता.

जेव्हा तुम्हाला पुन्हा सुचित करायचे असेल, तेव्हा ’नोटिफिकेशनला अनुमती द्या’ चालू करा. जर तुम्हाला देखील ते ऐकायचे असतील, तर रिंग/सायलेंट स्विच सायलेंट मोड मध्ये नसल्याची आणि तुमचा व्हॉल्यूम ऐकण्यायोग्य असल्याची खात्री करा.

तुम्ही इतर Apple ॲप आणि थर्ड पार्टी ॲपमधूनही नोटिफिकेशन थांबवू शकता. नोटिफिकेशन सेटिंग बदला पहा.

तुमचा फोकस स्टेटस एका व्यक्तीबरोबर शेअर करणे थांबवणे

जेव्हा तुमचा फोकस नोटिफिकेशन्स थांबवते, तेव्हा तुमचे स्टेटस ‘संदेश’ ॲपमध्ये दिसते, जेणेकरून तुम्हाला संदेश मिळत नसल्याचे लोकांना कळू शकते. तुम्ही समोरासमोर संभाषण होत असताना हे बंद करू शकता.

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. संभाषणावर टॅप करा, नंतर संभाषणाच्या शीर्षस्थानी असलेल्या संपर्क आयकॉनवर टॅप करा.

  3. ’फोकस स्टेटस शेअर करा’ बंद करा.

पाठवलेल्या आणि प्राप्त झालेल्या संदेशांसाठी आवाज म्यूट करणे

जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता, तेव्हा स्वूश असा ध्वनी डिफॉल्टनुसार प्ले होतो. जेव्हा तुम्हाला संदेश प्राप्त होतो, तेव्हा टोन प्ले केला जातो. जर तुम्हाला हे ध्वनी ऐकायचे नसतील, तर तुम्ही तुमचा टेक्स्ट टोन ‘कोणतेही नाही’ वर सेट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘नोटिफिकेशन्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’संदेश’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘ध्वनी’ वर टॅप करा, त्यानंतर ‘कोणतेही नाही’ वर टॅप करा (‘अलर्ट टोन’ च्या खाली).

तुम्ही रिंग/सायलेंट स्विच सायलेंट मोड मध्ये देखील ठेवू शकता.

नोट : ‘काहीच नाही’ आणि ‘रिंग/सायलेंट स्विच’ सेटिंग इनकमिंग आणि आउटगोइंग दोन्ही ध्वनींवर परिणाम करते. (तुम्ही फक्त एक म्यूट करू शकत नाही.)

नोटिफिकेशनसाठी इंडिकेटर लाइट फ्लॅश करा हे देखील पहा.

नोटिफिकेशनसाठी ध्वनी बदलणे

तुम्ही अलर्ट्ससाठी ध्वनी व्हॉल्यूम सेट करू शकता आणि अलर्ट्ससाठी टोन किंवा ध्वनी ह्यामधून निवडू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’ध्वनी’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • नोटिफिकेशनचा आवाज कमी किंवा जास्त करा : स्लायडरसह व्हॉल्यूम समायोजित करा.

    • टोन किंवा ध्वनी निवडा : ‘टेक्स्टचा टोन’ वर टॅप करा, नंतर अलर्ट टोनच्या खाली असलेल्या ध्वनीवर टॅप करा (किंवा तो डाउनलोड करण्यासाठी ‘टोन स्टोअर’ वर टॅप करा).

    टिप : तुम्ही निवडलेला टोन नोटिफिकेशन चालू असलेल्या संदेश ॲप आणि इतर ॲप, जसे की Mail, ‘फोन’ आणि इतर Apple किंवा थर्ड पार्टी ॲप ज्यात असतात अशा दोन्हीवर लागू होतो. फक्त ‘संदेश’ ॲपसाठी ते बदलण्यासाठी, सेटिंग  > नोटिफिकेशन > ‘संदेश’ वर जा, त्यानंतर ‘ध्वनी’ वर टॅप करा.

तुम्ही सेटिंग  > नोटिफिकेशन्स > संदेश > ‘नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करा’ मध्ये जाऊन नोटिफिकेशन किती वेळा रिपीट करायचे (‘कधीच नाही’ ते 10 वेळा) ते सेट करू शकता.

विशिष्ट लोकांसाठी नोटिफिकेशन ध्वनी बदलणे

जेव्हा तुम्हाला एका विशिष्ट संपर्काकडून संदेश मिळेल तेव्हा तुम्ही प्ले करण्यासाठी विशिष्ट ध्वनी निवडू शकता.

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. एका व्यक्तीबरोबरच्या संभाषणात, संभाषणाच्या शीर्षस्थानी असलेल्या संपर्क आयकॉनवर टॅप करा.

  3. ’माहिती’ वर टॅप करा, ’संपादित करा’ वर टॅप करा, ’संपर्क माहिती संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’टेक्स्ट टोन’ वर टॅप करा.

    तुम्हाला ‘संपादित करा’ दिसत नसल्यास, ’नवीन संपर्क तयार करा’ वर किंवा ’सध्याच्या संपर्कात समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • टोन किंवा ध्वनी उल्लेखित करा : अलर्ट टोनच्या खाली असलेल्या ध्वनीवर टॅप करा (किंवा तो डाउनलोड करण्यासाठी ‘टोन स्टोअर’ वर टॅप करा).

    • ध्वनी म्यूट करा : ‘अलर्ट टोन’ च्या खाली ‘कोणतेही नाही’ वर टॅप करा.

    • ह्या संभाषणासाठी नोटिफिकेशन म्यूट करा : हॅप्टिक्स आणि अलर्ट दोन्ही टोनच्या खाली ‘कोणतेही नाही’ वर टॅप करा.

ह्या संपर्काला फोकस ओव्हरराइड करण्याचा पर्याय देण्यासाठी, जेणेकरून कोणतेही महत्वाचे संदेश जाऊ शकतील, ‘आपत्कालीन बायपास’ चालू करा. उदाहरणार्थ, तुम्ही हे कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी, काळजीवाहू व्यक्तीसाठी किंवा सहकाऱ्यासाठी चालू करू शकता.

एक संभाषण म्यूट करणे

तुम्ही संभाषणासाठी नोटिफिकेशन मिळवणे थांबवू शकता, जरी तुम्ही त्याचे संदेश प्राप्त करणे चालू ठेवता.

  1. तुमच्या iPad वर संदेश ॲपवर जा.

  2. संभाषणाच्या यादीमध्ये, पुढीलपैकी एक कृती करा :

    • संभाषणावर डावीकडे स्वाइप करा, त्यानंतर म्यूट बटण वर टॅप करा.

    • संभाषणावर टॅप करा, संभाषणाच्या शीर्षस्थानी असलेल्या संपर्कावर किंवा आयकॉनवर टॅप करा, नंतर ‘अलर्ट्स लपवा’ सुरू करा.

नोट : तुम्ही नोटिफिकेशन्स सायलेंट केलेले असल्याचे दर्शवणारी नोट प्रेषकांना प्राप्त होते.

एका संभाषणासाठी संदेश मिळवणे पूर्णपणे थांबवण्यासाठी, तुम्ही विशिष्ट व्यक्ती किंवा नंबर ब्लॉक करू शकता किंवा गट संभाषणातून बाहेर पडू शकता.

संदेशांची घोषणा करणे

Siri तुमच्या iPad स्पीकरवर किंवा सपोर्ट करणाऱ्या हेडफोनवर संदेश घोषित करू शकते.

MFi श्रवण डिव्हाइसेसवर इनकमिंग संदेश ऐकण्यासाठी, विशिष्ट ॲपसाठी कॉल आणि नोटिफिकेशनची घोषणा करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.