ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad सह AirPods वापरणे

तुम्ही iPad बरोबर AirPods पेअर केल्यानंतर (स्वतंत्रपणे विकले गेलेले), iPad वर प्ले होत असलेले ऑडिओ ऐकण्यासाठी, Facetime कॉल करण्यासाठी आणि कॉलला उत्तर देण्यासाठी, संदेश ऐकण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी, तुम्हाला गरज असेल तेव्हा रिमाइंडर ऐकण्यासाठी, गोंगाटाच्या वातावरणात संभाषण अधिक सहजपणे ऐकण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी तुम्ही AirPods वापरू शकता.

तुमच्या iPad बरोबर AirPods पेअर करणे

  1. iPad वर, सेटिंग  > ‘Bluetooth’ वर जा, नंतर Bluetooth चालू करा.

  2. तुमच्या iPad वरील होम स्क्रीनवर जा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • AirPods (पहिले, दुसरे आणि तिसरे जनरेशन) आणि AirPods Pro : तुमचे AirPods आत असताना केस उघडा, नंतर ते तुमच्या iPad च्या जवळ होल्ड करा.

    • AirPods Max : Smart Case मधून तुमचे AirPods Max बाहेर काढा, नंतर तुमच्या iPad च्या पुढे AirPods Max होल्ड करा.

  4. ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा, नंतर ‘झाले’ वर टॅप करा.

    नोट : तुमचा AirPods Max पेअर करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचना दिसत नसल्यास, ‘सेटिंग > Bluetooth’ वर जा, नंतर तुमचे AirPods Max सिलेक्ट करा. AirPods Max वर स्टेटस लाइट पांढरा फ्लॅश होत नसल्यास, तसे होईपर्यंत ‘गोंगाट नियंत्रण’ बटण दाबा आणि होल्ड करा.

तुम्ही एकाच Apple अकाउंटवर साइन इन केलेल्या सपोर्ट करणाऱ्या सर्व डिव्हाइसवर तुमचे AirPods ऑटोमॅटिकली पेअर केले जातात (iOS 10, iPadOS 13, macOS 10.12, watchOS 3 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक).

नोट : तुम्ही तुमचे AirPods पेअर करू शकत नसल्यास, Apple सपोर्ट लेख तुमचे AirPods कनेक्ट होत नसल्यास काय करावे पहा.

AirPods आणि तुमच्या iPad सह बरेच काही करणे

तुमच्या AirPods चा अधिक चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल ह्याच्या तपशीलवार सूचनांसाठी AirPods यूझर गाइड पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.