ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘रिमाइंडर’ मध्ये तपशील समाविष्ट करणे

तुम्ही तुमच्या रिमाइंडरमध्ये नोट्स, लिंक, देय दिनांक आणि छायाचित्रांसारखे तपशील समाविष्ट करू शकता.

नोट : जेव्हा तुम्ही iCloud मधील अपडेट केलेले रिमाइंडर वापरता तेव्हा ह्या गाइडमध्ये वर्णन केलेले सर्व ‘रिमाइंडर’ फीचर उपलब्ध असतात. इतर अकाउंटचा वापर करताना काही फीचर उपलब्ध नसतात.

प्रत्येक रिमाइंडरमध्ये छायाचित्रे असलेली यादी दाखवणारे ’रिमाइंडर’ ॲप.

रिमाइंडरमध्ये नोट, URL आणि इतर तपशील समाविष्ट करणे

  1. तुमच्या iPad वरील रिमाइंडर ॲपवर जा.

  2. आयटमवर टॅप करा.

  3. ‘नोट समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर अधिक माहिती समाविष्ट करा.

  4. आयटमचे तपशील संपादित करण्यासाठी ‘तपशील संपादित करा’ बटण वर टॅप करा. उदाहरणार्थ, तुम्ही दिनांक आणि वेळ सेट करू शकता, स्थानावर आधारित रिमाइंडर सेट करू शकता, एखादा महत्त्वाचा आयटम फ्लॅग करू शकता किंवा छायाचित्र अटॅच करू शकता.

केव्हा आणि कुठे आठवण करून द्यायची ते सेट करणे

तुम्हाला विशिष्ट दिनांकाला, विशिष्ट वेळी किंवा स्थानावर किंवा तुम्ही ‘संदेश’ मध्ये एखाद्या व्यक्तीला संदेश पाठवत असताना आठवण करून दिली जाऊ शकते.

  1. तुमच्या iPad वरील रिमाइंडर ॲपवर जा.

  2. आयटमवर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • दिनांक आणि वेळ शेड्यूल करा : ‘दिनांक आणि वेळ’ बटण वर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.

      टिप : देय दिनांकासह असलेले रिमाइंडर ‘दिनदर्शिका’ मध्ये संपूर्ण दिवसातील इव्हेंट म्हणून दिसतात. ’दिनदर्शिका’ मध्ये ‘रिमाइंडर’ वापरा पहा.

    • रिमाइंडर तातडीचे म्हणून मार्क करा : ‘तपशील संपादित करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर रिमाइंडरची वेळ झाल्यावर गजर मिळवण्यासाठी ‘तातडीचे’ सुरू करा. जर दिनांक आणि वेळ आधीच सेट केले नसतील, तर ते पुढील तासासाठी डिफॉल्ट केले जातात. तुम्ही गजर कधी सक्रिय होईल हे बदलण्यासाठी दिनांक आणि वेळ संपादित करू शकता.

    • आवर्ती रिमाइंडर सेट करा : ‘तपशील संपादित करा’ बटण वर टॅप करा, दिनांक किंवा वेळ सुरू करा, ’पुन्हा करा’ वर टॅप करा, नंतर वारंवारता निवडा.

    • शेड्यूल केलेला दिनांक आणि वेळेपूर्वी लवकर रिमाइंडर मिळवा : ‘तपशील संपादित करा’ बटण वर टॅप करा, ‘लवकरचा रिमाइंडर’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला केव्हा आठवण करुन द्यायची आहे ते निवडा. उदाहरणार्थ, “5 मिनिटे आधी”, “2 दिवस आधी” किंवा इतर पर्याय.

    • स्थान समाविष्ट करा : स्थान बटण वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला कुठे आठवण करुन द्यायची ते निवडा—उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा किंवा तुमच्या iPad ला असलेल्या Bluetooth® कनेक्शनसह कारमध्ये बसता तेव्हा.

      नोट : ‘स्थान आधारित रिमाइंडर’ प्राप्त करण्याकरिता, तुम्हाला तुमचे अचूक स्थान वापरण्यासाठी ‘रिमाइंडर’ ला अनुमती द्यावी लागेल. सेटिंग  > गोपनीयता व सुरक्षा > ‘स्थान सेवा’ वर जा. ‘स्थान सेवा’ चालू करा, ‘रिमाइंडर’ वर टॅप करा, ‘ॲपचा वापर करताना’ निवडा, त्यानंतर ‘अचूक स्थान’ चालू करा.

    • ‘संदेश’ मध्ये रिमाइंडर प्राप्त करा : ‘तपशील संपादित करा’ बटण वर टॅप करा, ‘संदेश पाठवताना’ चालू करा, नंतर तुमच्या संपर्क यादीमधून एखादी व्यक्ती निवडा. तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा त्या व्यक्तीबरोबर ’संदेश’ मध्ये चॅट कराल तेव्हा रिमाइंडर दिसेल.

  3. पूर्ण बटण वर टॅप करा.

फ्लॅग आणि प्राधान्य सेट करणे

  1. तुमच्या iPad वरील रिमाइंडर ॲपवर जा.

  2. आयटमवर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • महत्त्वाचा आयटम ध्वजांकित करा : फ्लॅग बटण वर टॅप करा.

    • प्राधान्य सेट करा : ‘तपशील संपादित करा’ बटण वर टॅप करा, ‘प्राधान्य’ वर टॅप करा, त्यानंतर ‘कमी’, ‘मध्यम’ किंवा ‘उच्च’ निवडा.

छायाचित्र समाविष्ट करणे किंवा डॉक्युमेंट स्कॅन करणे

  1. तुमच्या iPad वरील रिमाइंडर ॲपवर जा.

  2. आयटमवर टॅप करा, नंतर ‘तपशील संपादित करा’ बटण वर टॅप करा.

  3. ‘इमेज समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी कोणतेही काम करा :

    • नवीन छायाचित्र घ्या.

    • डॉक्युमेंट स्कॅन करा.

    • तुमच्या छायाचित्र लायब्ररीमधून छायाचित्र निवडा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.