iPad वर इनकमिंग कॉल्सला उत्तर देणे किंवा नाकारणे

तुम्ही इनकमिंग कॉलला उत्तर देऊ शकता, सायलेंट करू शकता किंवा नाकारू शकता. तुम्ही कॉल नाकारल्यास, तो व्हॉइसमेलमध्ये जातो. तुम्ही कॉलला टेक्स्टद्वारे देखील प्रतिसाद देऊ शकता.

कॉलला उत्तर देणे

पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • ‘कॉलला उत्तर द्या’ बटण वर टॅप करा.

  • तुमचा iPad लॉक असल्यास, स्लायडर ड्रॅग करा.

टिप : तुम्ही इनकमिंग कॉलबद्दल घोषणा करणे ह्यासाठी Siri वापरू शकता, जो तुम्ही तुमच्या आवाजाचा वापर करून स्वीकारू किंवा नाकारू शकता.

कॉल सायलेंट करणे

जेव्हा एखादा कॉल येत असेल तेव्हा साइड बटण किंवा कोणतेही एक व्हॉल्यूम बटण दाबा.

व्हॉइसमेलमध्ये जाईपर्यंत तुम्ही सायलेंट केलेल्या कॉलला उत्तर देऊ शकता.

नोट : तुम्ही अज्ञात नंबर्सवरून येणारे कॉल्स ऑटोमॅटिकली स्क्रीन आणि सायलेंट देखील करू शकता. अज्ञात नंबर्सना स्क्रीन किंवा सायलेंट करणे पहा.

कॉल नाकारणे आणि तो थेट व्हॉइसमेलवर पाठवणे

इनकमिंग कॉलसाठी पुढीलपैकी एक करा :

  • साझड बटण त्वरित दोन वेळा दाबा.

  • ‘कॉल नाकारा’ बटण वर टॅप करा.

  • कॉल बॅनरवर वरच्या बाजूस स्वाइप करा.

अधिक पर्यायांसाठी तुम्ही कॉल बॅनरवर खाली स्वाइप देखील करू शकता. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

  • ’मला आठवण करून द्या’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला जेव्हा कॉल परत करण्यासाठी रिमाइंडर हवा असेल तेव्हा तो निवडा.

  • ‘संदेश’ वर टॅप करा, नंतर डिफॉल्ट उत्तर निवडा किंवा कस्टमवर टॅप करा.

    तुमची स्वतःची डिफॉल्ट उत्तरे तयार करण्यासाठी, सेटिंग  > ॲप > फोन > ‘टेक्स्टसह प्रतिसाद द्या’ वर जा, ‘ह्यासह प्रतिसाद द्या’ खालील कोणत्याही फील्डवर टॅप करा, त्यानंतर तुमचे स्वतःचे उत्तर टाइप करा.

नोट : काही देश किंवा प्रदेशात, नाकारलेले कॉल व्हॉइसमेलवर न पाठवता डिस्कनेक्ट केले जातात.

कॉलला उत्तर न देता कॉलरला अधिक माहितीसाठी विचारा

तुम्हाला कॉल आल्यावर, तुम्ही उत्तर द्यायचे की नाही हे ठरवण्यापूर्वी कॉलरला अधिक माहिती विचारणारा संदेश टाइप करू शकता.

‘उत्तर देण्यासाठी टाइप करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला तुमच्या iPad ने कॉलरला सांगायचा असलेला संदेश टाइप करा. त्यांचे उत्तर तुमच्या स्क्रीनवर टेक्स्ट म्हणून दिसेल.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.