ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमची छायाचित्र लायब्ररी ब्राउझ करणे

तुमच्या छायाचित्रांचे आणि व्हिडिओजचे संपूर्ण संग्रह बघण्यासाठी ’छायाचित्र’ ॲपमध्ये लायब्ररी ब्राउझ करा.

‘छायाचित्र’ ॲप उघडलेले आहे आणि साइडबारमध्ये ’लायब्ररी’ टॅब सिलेक्ट केला आहे.

तुमची लायब्ररी बघणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ‘लायब्ररी’ वर टॅप करा.

  3. अधिक छायाचित्रे पाहण्यासाठी ‘खाली’ स्वाइप करा किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये विशिष्ट वेळेवर जाण्यासाठी ’वर्षे’ किंवा ’महिने’ वर टॅप करा.

  4. तुमच्या सर्वात अलीकडील छायाचित्रांवर परत जाण्यासाठी ‘लायब्ररी’ किंवा ‘सर्व’ वर टॅप करा.

तुमच्या लायब्ररीतील इमेजेसवर फोकस करण्यासाठी, साइडबार बंद करण्यासाठी ’साइडबार लपवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर नॅव्हिगेट करण्यासाठी ‘वर्षे’, ‘महिने’ आणि ‘सर्व’ बटणे वापरा. साइडबार पुन्हा दाखवण्यासाठी ’साइडबार टॉगल करा’ बटण वर टॅप करा.

लायब्ररीचा डिस्प्ले बदलणे

तुम्ही लायब्ररी फोटो ग्रिडमधील छायाचित्र थंबनेल्सचा आकार आणि दिखावट बदलू शकता आणि तुमच्या लायब्ररीमध्ये दिसणारा कॉण्टेण्ट मॅनेज करू शकता.

टिप : तुम्ही लायब्ररी बघत असताना, झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठी स्क्रीनवर पिंच करा.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ’पर्याय बघा’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • छायाचित्र आणि व्हिडिओ थंबनेल्सचा आकार मोठा करा : ’झूम इन करा’ वर टॅप करा.

    • एकाच वेळी जास्त पाहण्यासाठी छायाचित्र आणि व्हिडिओ थंबननेल्सचा आकार कमी करा : ’झूम आउट करा’ वर टॅप करा.

    • प्रत्येक छायाचित्र किंवा व्हिडिओ थंबनेल ते कॅप्चर केलेल्या डायमेन्शनमध्ये बघा : ’ॲस्पेक्ट रेशो ग्रिड’ वर टॅप करा. चौकोनी थंबनेलवर परत जाण्यासाठी, ‘चौकोनी छायाचित्र ग्रिड’ वर टॅप करा.

    • स्क्रीनशॉट्स लपवा : ’स्क्रीनशॉट्स’ वर टॅप करा.

    • थंबनेल्सवरील शेअर केलेल्या लायब्ररीचा बॅज लपवा : ‘शेअर केलेला लायब्ररी बॅज’ वर टॅप करा.

    • तुमच्याबरोबर शेअर केलेली छायाचित्रे आणि व्हिडिओज ‘संदेश’ ॲपमध्ये लपवा : ‘तुमच्याबरोबर शेअर केलेले’ वर टॅप करा.

    • तुमच्या Mac मधून तुम्ही मॅन्युअली समाविष्ट केलेली छायाचित्रे आणि व्हिडिओज लपवा : ’माझ्या Mac मधून’ वर टॅप करा.

तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये दाखवलेल्या कॉण्टेण्टचे अधिक कस्टमायझेशन्स करण्यासाठी, छायाचित्र लायब्ररी फिल्टर करा आणि क्रमवार लावा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.