iPad वर FaceTime ॲपमध्ये ऑडिओ कॉल टूल्स वापरणे

काही देश आणि प्रदेशात, तुम्ही कोणत्याही इतर व्यक्तीशी बोलत असताना तुम्ही FaceTime ऑडिओ कॉल रेकॉर्ड करू शकता आणि ‘नोट्स’ ॲपमध्ये कॉलचे ट्रान्सक्रिप्ट बघू शकता. Apple Intelligence* ला सपोर्ट करणाऱ्या iPad मॉडेल्सवर, तुम्ही ’नोट्स’ ॲपमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचा सारांश बघू शकता.

तुम्हाला होल्डवर ठेवलेले असताना लाइव्ह एजंट उपलब्ध झाल्यावर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी तुम्ही ’होल्ड असिस्ट’ चा देखील वापर करू शकता.

ऑडिओ कॉल रेकॉर्ड करणे

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, तुमच्या भाषेत आणि प्रदेशात कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे का हे पाहण्यासाठी iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ तपासा आणि इतर कॉल सहभागी रेकॉर्ड करायला तयार असल्याची खात्री करा.

  1. FaceTime ॲपमध्ये वन टू वन ऑडिओ कॉलदरम्यान, अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘कॉल रेकॉर्डिंग’ वर टॅप करा.

    दोन्ही कॉल सहभागींना कॉल रेकॉर्ड केला जात असल्याची ऑडिओ सूचना ऐकू येते.

  2. रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी, थांबवा बटण वर टॅप करा.

    जर थांबवा बटण दिसत नसेल, तर अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘कॉल रेकॉर्डिंग’ च्या पुढे ‘थांबवा’ वर टॅप करा. तुम्ही कॉल समाप्त करता तेव्हा कॉल रेकॉर्डिंगदेखील थांबते.

कॉल रेकॉर्डिंग नोट्स ॲपमधील ‘कॉल रेकॉर्डिंग’ फोल्डरमध्ये ऑटोमॅटिकली जतन केले जातात.

कॉल रेकॉर्डिंग प्ले करणे

  1. तुमच्या iPad वर नोट्स ॲपवर जा.

  2. ‘कॉल रेकॉर्डिंग्ज’ फोल्डरमध्ये नोट सिलेक्ट करा, त्यानंतर ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

कॉल ट्रान्सक्रिप्ट बघणे

निवडक प्रदेश आणि भाषांमध्ये, तुम्ही ‘नोट्स’ ॲपमध्ये रेकॉर्ड केलेल्या कॉलची ट्रान्सक्रिप्ट बघू शकता. ट्रान्सक्रिप्ट लगेच उपलब्ध नसेल—तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन सुरू असल्याचा संदेश दिसेल.

नोट : ट्रान्सक्रिप्शनवर अवलंबून राहण्यापूर्वी त्याच्या अचूकतेची पडताळणी करा. हे कदाचित संभाषणाचे परिपूर्ण प्रतिनिधित्व नसेल.

  1. तुमच्या iPad वर नोट्स ॲपवर जा.

  2. ‘कॉल रेकॉर्डिंग्ज’ फोल्डरमध्ये नोट सिलेक्ट करा, त्यानंतर अधिक बटण वर टॅप करा.

    नोट : सपोर्ट केलेल्या भाषांमध्ये बोललेले शब्द ऑटोमॅटिकली ट्रान्सक्राइब केले जातात. तुम्हाला ‘ट्रान्सक्रिप्ट’ दिसत नसल्यास, तुमचा iPad किमान आवश्यकता पूर्ण करत नाही किंवा सपोर्ट केलेली भाषा ओळखत नाही.

    ट्रान्सक्रिप्टमध्ये, प्रत्येक वाक्याचा स्पीकर ओळखला जातो.

  3. ट्रान्सक्रिप्ट बघत असताना, तुम्ही खालीलपैकी कोणतेही काम करू शकता :

    • विशिष्ट पॉइंटपासून ऑडिओ प्ले करा : तुम्हाला ऐकायचे असलेले टेक्स्ट सिलेक्ट करा.

    • ट्रान्सक्रिप्ट सर्च करा : अधिक बटण वर टॅप करा, नंतर 'ट्रान्सक्रिप्टमध्ये शोधा’ वर टॅप करा.

    • ट्रान्सक्रिप्ट कॉपी करा : अधिक बटण वर टॅप करा, नंतर 'ट्रान्सक्रिप्ट नोटमध्ये समाविष्ट करा’ किंवा 'ट्रान्सक्रिप्ट कॉपी करा' निवडा.

    • ऑडिओ रेकॉर्डिंग जतन करा किंवा हटवा : अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘ऑडिओ फाइल्स ॲपमध्ये जतन करा’ किंवा ‘हटवा’ निवडा.

      नोट : ऑडिओ रेकॉर्डिंग हटवल्याने ट्रान्सक्रिप्ट देखील हटवले जाते.

    • रेकॉर्डिंगचा वेव्हफॉर्म बघा : ’ट्रान्सक्रिप्ट लपवा’ बटण वर टॅप करा.

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही रेकॉर्ड केलेला FaceTime कॉल सारांशित करू शकता. ’नोट्स’ ॲपमध्ये Apple Intelligence वापरा पहा.

कॉल रेकॉर्डिंग बंद करणे

‘कॉल रेकॉर्डिंग’ डिफॉल्टनुसार चालू केले जाते, परंतु तुम्ही ते बंद करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ’ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’फोन’ वर टॅप करा.

  3. ’ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग’ वर टॅप करा, त्यानंतर ‘ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग’ बंद करा.

होल्ड असिस्ट वापरणे

जेव्हा तुम्हाला FaceTime ऑडिओ कॉल दरम्यान होल्डवर ठेवले जाते, तेव्हा लाइव्ह एजंट उपलब्ध असताना तुम्हाला सूचित करण्यासाठी तुम्ही ‘होल्ड असिस्ट’ वापरू शकता. तुम्ही ह्यापुढे होल्डवर नसल्यास नोटिफिकेशन प्राप्त करा पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.