ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

‘टॅब गट’ शेअर करणे आणि iPad वर Safari मध्ये सहयोगाने काम करणे

तुम्ही टॅब गट शेअर करू शकता आणि iCloud वापरणाऱ्या लोकांसह सहयोग करू शकता. तुम्ही कोणत्याही क्षणी टॅब गटात लोकांना समाविष्ट करू शकता आणि गटातून काढून टाकू शकता, आणि Safari मधून बाहेर न पडता संदेश संभाषण, फोन कॉल, किंवा FaceTime कॉलदेखील सुरू करू शकता. सहयोगी टॅब गटातून टॅब समाविष्ट करू शकतात आणि काढून टाकू शकतात, आणि प्रत्येकजण रिअल टाइममध्ये अपडेट पाहतो.

तुम्ही सहयोग करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असणे आवश्यक आहे, iCloud सेटिंगमध्ये Safari चालू केलेले असणे आवश्यक आहे आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केलेले असणे आवश्यक आहे.

टॅब गट शेअर करणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, टॅब गट ला टच आणि होल्ड करा, नंतर 'शेअर करा' वर टॅप करा.

  3. ‘संदेश’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्ती किंवा गटासह ते शेअर करायचे आहे ते प्रविष्ट करा.

    कोणी शेअर केलेल्या टॅब गटामध्ये बदल केल्यास, तुम्हाला 'संदेश' संभाषणामध्ये ॲक्टिव्हिटी अपडेट मिळतात.

शेअर केलेल्या टॅब गटामध्ये लोकांना समाविष्ट करणे आणि काढून टाकणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. ‘सहयोग करा’ बटण वर टॅप करा.

  3. ‘शेअर केलेला टॅब गट मॅनेज करा’ वर टॅप करा, त्यानंतर खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • एखाद्याला काढून टाका : नावावर टॅप करा, त्यानंतर ‘ॲक्सेस काढून टाका’ वर टॅप करा.

    • एखाद्याला समाविष्ट करा : ‘अधिक लोकांबरोबर शेअर करा’ वर टॅप करा, त्यानंतर त्यांना आमंत्रित करण्यासाठी ‘संदेश’ वर टॅप करा.

    • प्रत्येकाबरोबर शेअर करणे थांबवा : ‘शेअर करणे थांबवा’ वर टॅप करा.

Safari मधून संदेश, ऑडिओ, किंवा व्हिडिओ संभाषण सुरू करणे

तुम्ही संदेश, FaceTime ऑडिओ, किंवा FaceTime व्हिडिओचा वापर करून, टॅब गट शेअर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर Safari मधून बाहेर न पडता संभाषण सुरू करू शकता.

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. Safari मध्ये, ‘सहयोग करा’ बटण वर टॅप करा, नंतर संभाषण सुरू करण्यासाठी संदेश, व्हिडिओ किंवा ऑडिओवर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.