ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘Mail’ मध्ये ड्राफ्ट जतन करणे

तुम्ही नंतर पूर्ण करण्यासाठी ड्राफ्ट जतन करू शकता किंवा नवीन ईमेल संदेश लिहिताना अस्तित्वात असलेला संदेश पाहू शकता.

नंतरच्या काळासाठी ड्राफ्ट जतन करणे

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. तुम्ही लिहित असलेल्या संदेशामध्ये, ’रद्द करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’ड्राफ्ट जतन करा’ वर टॅप करा.

    तुम्ही ड्राफ्ट म्हणून जतन केलेल्या संदेशावर काम पुन्हा सुरू करण्यासाठी, लिहा बटण ला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ड्राफ्ट सिलेक्ट करा.

टिप : तुम्ही तुमच्या iPad आणि तुमच्या Mac दरम्यान अपूर्ण राहिलेले ईमेलदेखील हाताळू शकता. iPad आणि तुमच्या इतर डिव्हाइसेस दरम्यान टास्क हॅण्ड ऑफ करणे पहा.

तुम्ही संदेश लिहित असताना दुसरा संदेश बघणे

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. तुम्ही लिहित असलेल्या संदेशाच्या वरच्या बाजूला ‘मल्टीटास्किंग कंट्रोल’ बटण वर टॅप करा.

  3. तुमचा इनबॉक्स पाहण्यासाठी ड्राफ्ट बाजूला मूव्ह करण्यासाठी ‘Slide Over’ वर टॅप करा.

  4. तुम्ही एका बाजूला तुमचा ड्राफ्ट संपादित करणे चालू ठेवू शकता किंवा तुमच्या ड्राफ्टच्या वरच्या बाजूला ‘मल्टीटास्किंग कंट्रोल’ बटण वर टॅप करू शकता, नंतर संदेश मध्यभागी आणण्यासाठी 'फुल स्क्रीन' वर टॅप करा.

जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त संदेश अपूर्ण असतील, तर ते सर्व पाहण्यासाठी स्क्रीनच्या तळाशी टॅप करा.

तुमचे सध्याचे सर्व संदेश ड्राफ्ट बघणे

तुमच्याकडे अनेक ईमेल अकाउंट असल्यास, तुम्ही तुमचे सर्व संदेश ड्राफ्ट्स ॲक्सेस करण्यासाठी ’सर्व ड्राफ्ट’ मेलबॉक्सचा वापर करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील Mail ॲपवर जा.

  2. वरच्या डाव्या कोपऱ्यातील ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा.

  3. यादीच्या शीर्षस्थानी ’संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’सर्व ड्राफ्ट’ मेलबॉक्स सुरू करा.

टिप : तुम्ही ड्राफ्टवर काम करत असताना तुम्हाला वेगळा ड्राफ्ट संपादित करायचा असल्यास, अधिक बटण होल्ड करा आणि खाली स्वाइप करा. ड्राफ्ट उघडण्यासाठी कोणत्याही थंबनेलवर टॅप करा, त्यानंतर संपादन चालू ठेवा.

डावीकडे दर्शवलेली प्राथमिक संदेश यादी आणि स्क्रीनच्या तळाशी ड्राफ्टचे पाच थंबनेल्स दर्शविणारी Mail विंडो.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.