ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘नकाशा’ मध्ये गाइडसह ठिकाणे एक्सप्लोअर करणे

तुम्हाला खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे, खरेदी आणि एक्सप्लोअर करण्यासाठी जगभरातील उत्तम ठिकाणे शोधण्यात मदत करण्यासाठी गाइड उपलब्ध आहेत. नवीन ठिकाणांचा समावेश केल्याबरोबर गाइड ऑटोमॅटिकली अपडेट केले जातात, त्यामुळे तुम्हाला नेहमी नवीनतम शिफारशी मिळतात.

गाइडसह जग एक्सप्लोअर करणे

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. ‘खाली’ स्क्रोल करा, त्यानंतर ‘गाइड एक्सप्लोअर करा’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणत्याही एकानुसार ब्राउझ करा :

    • शहर : स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘खाली जा’ बटण वर टॅप करा, किंवा ‘शहर श्रेणी’ वर खाली स्क्रोल करा.

    • आवडते : स्वारस्य असलेल्या अधिक गोष्टी पाहण्यासाठी उजवीकडे स्वाइप करा, त्यानंतर त्या गटातील गाइड ब्राउझ करण्यासाठी टॅप करा.

    • प्रकाशक : ‘प्रकाशकानुसार श्रेणी ब्राउझ करा’ मध्ये खाली स्क्रोल करा.

‘गाइड’ बघणे, शेअर करणे आणि जतन करणे

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. गाइड उघडण्यासाठी, त्याच्या कव्हरवर टॅप करा. त्याचा कॉण्टेण्ट बघण्यासाठी, ‘खाली’ स्क्रोल करा.

    तुम्ही पुढील गोष्टीदेखील करू शकता :

    • गाइड शेअर करा : ‘शेअर करा’ वर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.

    • गाइड जतन करा : ‘लायब्ररीमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • जतन केलेली गाइड पहा : ‘लायब्ररी’ च्या खाली, ठिकाण बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘गाइड’ वर टॅप करा. कस्टम गाइडमध्ये ठिकाणे व्यवस्थापित करा पहा.

    • गाइड बंद करा : ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

राष्ट्रीय उद्यानांमधील फीचरसाठी गाइड. मार्गदर्शकाद्वारे कव्हर केलेली उद्याने नकाशावर चिन्हांकित केली आहेत.

टिप : ॲप क्लिप बटणे शोधा. यामुळे तुम्हाला थेट गाइडकडून टेबल आरक्षित करण्यासारख्या गोष्टी करण्याची अनुमती मिळते.

जगभरातील अनेक शहरांमध्ये गाइड उपलब्ध आहेत. देश किंवा प्रदेशानुसार उपलब्धतेत बदल होऊ शकतो.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.