ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘कॅल्क्युलेटर’ मध्ये गणितीय नोट्ससह गणित सोडवणे

तुम्ही गणितीय पदावल्या सोडवू शकता, ‘चल’ असलेली किंवा आलेख समीकरणे तयार करू शकता आणि वापरू शकता—उदाहरणार्थ, वर्गात नवीन संकल्पना शिकताना दैनंदिन बजेट तयार करणे, इव्हेंटचे नियोजन करणे, घराचे नूतनीकरण करणे आणि बरेच काही.

नोट : गणितीय नोट्स सायंटिफिक कॅल्क्युलेटर सारखेच ऑपरेशन असलेली सामान्य गणितीय चिन्हे वापरतात आणि सिलेक्ट केलेल्या न्यूमरिक सिस्टीममधील अंक वापरतात. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ वर अधिक जाणून घ्या.

घोषित चले, समीकरणे आणि रेखाटन दाखवणाऱ्या iPad वरील कॅल्क्युलेटरमधील गणितीय नोट्स.

पदावल्या सोडवा

  1. तुमच्या iPad वरील कॅल्क्युलेटर ॲपवर जा.

  2. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘गणितीय नोट्स’ वर टॅप करा.

  3. मागील गणितीय नोट उघडण्यासाठी टॅप करा किंवा नवीन नोट सुरू करण्यासाठी ‘नवीन नोट’ बटण वर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • गणितीय पदावली टाइप करा, त्यानंतर बरोबरचे चिन्ह समाविष्ट करा.

    • ‘मार्कअप’ बटण वर टॅप करा, गणितीय पदावली आडव्या ओळीत लिहा, नंतर ‘बरोबर’ चिन्ह समाविष्ट करा.

    • ‘मार्कअप’ बटण वर टॅप करा, संख्यांचा संच लिहा, नंतर संचामध्ये संख्या समाविष्ट करण्यासाठी संख्यांच्या खाली आडवी रेषा काढा. तुम्हाला वेगळी क्रिया हवी असल्यास प्रत्येक अंकाच्या डाव्या बाजूला वेगळे चिन्ह लिहा.

  5. तुम्ही लिहिलेल्यापैकी गणितीय नोट्सना काय समजले हे पाहण्यासाठी ‘बरोबर’ चिन्हावर टॅप करा. चुका दुरुस्त करण्यासाठी, तुम्ही खालीलपैकी कोणत्याही गोष्टी दुरुस्त करू शकता :

    • ओळखता न येणारे गणित आणि सोडवता न येणाऱ्या पदावल्या : त्रुटीविषयी तपशील पाहण्यासाठी कोणत्याही डॉटेड लाल रेषांवर टॅप करा.

    • अनिश्चित वर्ण : तुम्ही काय लिहिले हे स्पष्ट करण्यासाठी कोणत्याही डॉटेड निळ्या रेषांवर टॅप करा.

अधिक जाणून घेण्यासाठी गणितीय नोट्समधील त्रुटी कशा हाताळायच्या हा Apple सपोर्ट लेख पहा.

गणितीय नोट्स आडव्या पदावलीमध्ये ऑपरेशनचा मानक क्रम वापरते. उदाहरणार्थ, बेरीज आणि वजाबाकीपूर्वी गुणाकार पूर्ण केला जातो. जी पदावली तुम्हाला प्रथम सोडवायची आहे त्याभोवती कंस समाविष्ट करा. उभ्या पद्धतीने मांडलेल्या गणितामध्ये, ‘गणितीय नोट्स’ वरून खाली अशी पदावली सोडवते.

‘गणितीय नोट्स’ पदावलीमध्ये वापरलेली कोणतीही एकके आणि चलन ऑटोमॅटिकली रुपांतरित करते. तुम्ही वेगवेगळ्या सिस्टीम एकत्रही करू शकता—उदाहरणार्थ, 42 मीटर + 143 फूट. उपलब्ध एकके आणि चलन मूलभूत किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेटरच्या ‘रुपांतरण मोड’ शी जुळतात. एकके किंवा चलन रुपांतरित करा पहा.

मूल्य अपडेट करा

  1. तुमच्या iPad वरील कॅल्क्युलेटर ॲपवर जा.

  2. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, ‘गणितीय नोट्स’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या नोटवर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • नंबर इरेझ करा, नंतर नवीन मूल्य प्रविष्ट करा.

    • नंबरवर टॅप करा, नंतर नंबरच्या वर दिसणाऱ्या स्क्रबरचा वापर करून मूल्य ॲडजस्ट करण्यासाठी डावीकडे आणि उजवीकडे स्लाइड करा.

    • Apple Pencil वापरून, तुम्हाला स्क्रबर दिसेपर्यंत नंबरवर हॉवर करा, नंतर मूल्य ॲडजस्ट करण्यासाठी डावीकडे आणि उजवीकडे स्लाइड करा.

मूल्यांचा वापर करणारे कोणतेही आलेख ऑटोमॅटिकली अपडेट होतात. जर एखाद्या चलाला मूल्य असाइन केले गेले असेल, तर चलाचा वापर करणाऱ्या कोणत्याही समीकरणाचे परिणाम किंवा आलेखदेखील ऑटोमॅटिकली अपडेट केले जातात.

पदावल्या आणि समीकरणांमध्ये ‘चल’ वापरा

  1. तुमच्या iPad वरील कॅल्क्युलेटर ॲपवर जा.

  2. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘गणितीय नोट्स’ वर टॅप करा.

  3. साइडबारमध्ये गणितीय नोट उघडण्यासाठी टॅप करा किंवा नवीन सुरू करण्यासाठी ‘नवीन नोट’ बटण वर टॅप करा.

  4. चल घोषित करण्यासाठी, चल म्हणून वापरण्यासाठी अक्षर किंवा शब्द टाइप करा किंवा लिहा, त्यानंतर ‘बरोबर’ चिन्ह लिहा.

  5. चलाला मूल्य असाइन करण्यासाठी ‘बरोबर’ चिन्हानंतर मूल्य किंवा पदावली टाइप करा किंवा लिहा.

  6. चलाचे नाव वापरण्यासाठी पदावली किंवा समीकरणामध्ये ते टाइप करा किंवा लिहा.

नोट : ‘गणितीय नोट्स’ वरच्या डाव्या बाजूपासून खालच्या उजव्या बाजूपर्यंतच्या एण्ट्री वाचते. तुम्ही पदावली (उदाहरणार्थ x + 10 =) मध्ये वापरण्यापूर्वी ‘चल’ (उदाहरणार्थ, x = 5) घोषित करणे आवश्यक आहे. ‘चल’ प्रथम घोषित न करता पदावली लिहिण्यामुळे त्रुटी निर्माण होते. चलाच्या नावांमध्ये केवळ लॅटिन वर्णमालेतील वर्ण असणे आवश्यक आहे. उभ्या गणितामध्ये चलाचा वापर केला जाऊ शकत नाही.

तुम्ही आलेख तयार करण्यासाठी दोन चल असलेली समीकरणे वापरू शकता.

परिणाम ऑटोमॅटिकली किंवा सूचना म्हणून दाखवा

तुम्ही गणितीय नोट्समध्ये प्रविष्ट केलेल्या गणितांना तुमच्या iPad ने कसा प्रतिसाद द्यावा असे तुम्हाला वाटते, ते तुम्ही निवडू शकता.

  1. तुमच्या iPad वरील कॅल्क्युलेटर ॲपवर जा.

  2. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘गणितीय नोट्स’ वर टॅप करा.

  3. ‘अधिक’ बटण वर टॅप करा, नंतर ‘गणिताचे परिणाम’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक कृती करा :

    • जर तुम्हाला गणिते सोडवायची असतील तर : ‘परिणाम इन्सर्ट करा’ निवडा. तुम्ही सोडवता येण्याजोगे गणित टाइप करता किंवा लिहिता, तेव्हा उत्तरे ऑटोमॅटिकली दिसतात.

    • तुम्हाला सूचना दिसाव्यात असे वाटत असल्यास : ‘परिणाम सुचवा’ निवडा. जेव्हा तुम्ही ‘बरोबर‘ चिन्ह टाइप करता किंवा लिहिता किंवा सोडवता येणारे गणित सिलेक्ट करता, तेव्हा ‘गणित सोडवा’ बटण दिसेल, त्याच्यावर टॅप केल्यावर उत्तर समाविष्ट केले जाते.

    • जर तुम्हाला गणिताचे कोणतेही परिणाम नको असतील : ‘ऑफ करा’ निवडा. जेव्हा तुम्ही पदावलीनंतर ‘बरोबर’ चिन्ह लिहिता किंवा टाइप करता, तेव्हा उत्तरे दिसत नाहीत.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.