ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ऑफलाइन नकाशे डाउनलोड करणे

तुम्ही एखाद्या क्षेत्राचा नकाशा जतन करू शकता आणि तुमचा iPad ऑफलाइन असताना त्याचा वापर करू शकता.

जरी तुम्ही Wi-Fi किंवा मोबाइल सेवा ॲक्सेस करू शकत नसाल, तरीही तुम्ही प्लेस कार्डवर तास आणि मानांकन ह्यासारखी माहिती पाहू शकता, ड्रायव्हिंग, वॉकिंग, सायकलिंग किंवा सार्वजनिक प्रवासासाठी टर्न-बाय-टर्न दिशानिर्देश मिळवू शकता आणि तुमच्या पोहचण्याची अंदाजित वेळ पाहू शकता.

नोट : निवडक भागांमध्ये ऑफलाइन नकाशे उपलब्ध आहेत. देश आणि प्रदेशानुसार फीचर बदलत असतात. डिफॉल्टनुसार ‘ऑटोमॅटिक अपडेट’ चालू आहेत.

राष्ट्रीय उद्यानाचा नकाशा असलेला iPad. उद्यान हॅन्डलसह आयताकृती फ्रेम केलेले आहे, जे डाउनलोड करण्यासाठी नकाशाचा आकार बदलण्यासाठी मूव्ह करता येतात. सिलेक्ट केलेल्या नकाशाचा डाउनलोड आकार नकाशाच्या तळाशी दर्शविला आहे. रद्द करा आणि डाउनलोड बटणे स्क्रीनच्या तळाशी आहेत.

नकाशे डाउनलोड करणे

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • पिन मार्कर दिसेपर्यंत नकाशावर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘डाउनलोड करा’ वर टॅप करा.

    • सर्च फील्डच्या पुढे तुमच्या छायाचित्रावर किंवा आद्याक्षरांवर वर टॅप करा, ‘ऑफलाइन नकाशे’ वर टॅप करा, ‘नवीन’ वर टॅप करा, त्यानंतर सर्च फील्डमध्ये स्थान प्रविष्ट करा किंवा ‘सध्याचे स्थान’ वर टॅप करा.

  3. सिलेक्ट केलेले क्षेत्र ॲडजस्ट करा, नंतर ‘डाउनलोड करा’ वर टॅप करा.

    तुम्ही डाउनलोड केलेल्या नकाशाचा आकार कमी करण्यासाठी, लहान क्षेत्र सिलेक्ट करा.

जोपर्यंत तुम्ही तुमचे सेटिंग बदलत नाही, तोपर्यंत डाउनलोड केलेले नकाशे ऑटोमॅटिकली अपडेट केले जातात.

तुम्ही डाउनलोड केलेला नकाशा उघडणे किंवा संपादित करणे

ऑफलाइन वापरण्यासाठी डाउनलोड केलेले कोणतेही नकाशे तुमच्या ऑफलाइन नकाशाच्या यादीमध्ये दिसतात.

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. सर्च फील्डच्या पुढे तुमच्या छायाचित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा, त्यानंतर ‘ऑफलाइन नकाशा’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक काम करा :

    • नकाशा उघडा : त्याच्या नावावर टॅप करा.

    • नकाशाचे नाव बदलणे : नकाशावर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘नाव बदलणे’ वर टॅप करा.

    • नकाशाद्वारे व्यापलेले क्षेत्र बदला : नकाशाच्या नावावर टॅप करा, त्यानंतर नकाशाच्या इमेजवरील ‘आकार बदलणे’ वर टॅप करा.

नकाशा डेटा डाउनलोड नियंत्रित करणे

तुमच्या डेटा स्टोरेजच्या गरजा आणि प्राधान्यांनुसार तुम्ही तुमची सेटिंग बदलू शकता—जसे की नकाशा कधी डाउनलोड किंवा अपडेट करायचा.

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. सर्च फील्डच्या पुढे तुमच्या छायाचित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा, त्यानंतर ‘ऑफलाइन नकाशा’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक काम करा :

    • मोबाइल नेटवर्कवरुन डाउनलोड करा : केवळ ‘Wi-Fi’ वर टॅप करा, त्यानंतर ‘Wi-Fi + Cellular’ सिलेक्ट करण्यासाठी टॅप करा.

    • सर्व नकाशे ऑटोमॅटिकली अपडेट करा : ‘ऑटोमॅटिक अपडेट’ चालू करा.

    • न वापरलेले नकाशे ऑटोमॅटिकली हटवा : ‘स्टोरेज ऑप्टिमाइझ करा’ चालू करा.

    • ऑनलाइन नकाशा वापरा : ’केवळ ऑफलाईन नकाशा वापरा’ बंद करा.

डाउनलोड केलेले नकाशे काढून टाकणे

तुमच्या iPad वर स्टोरेजची स्पेस मोकळी करण्यासाठी तुम्ही डाउनलोड केलेले नकाशे काढून टाकू शकता.

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. सर्च फील्डच्या पुढे तुमच्या छायाचित्रावर किंवा आद्याक्षरांवर टॅप करा, त्यानंतर ‘ऑफलाइन नकाशा’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • नकाशा मॅन्युअली काढून टाका : नकाशावर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘हटवा’ वर टॅप करा.

    • न वापरलेले नकाशे ऑटोमॅटिकली हटवा : ‘स्टोरेज ऑप्टिमाइझ करा’ चालू करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.