ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर होममध्ये दृश्ये तयार करणे आणि वापरणे

होम ॲपमध्ये, तुम्ही अशी दृश्ये तयार करू शकता जी तुम्हाला एकाच वेळी अनेक ॲक्सेसरी नियंत्रित करण्याची अनुमती देतात. उदाहरणार्थ, तुम्ही "वाचन" दृश्य निश्चित करू शकता जे लाइट समायोजित करते, HomePod वर सौम्य संगीत प्ले करते, पडदे बंद करते, आणि थर्मोस्टॅट समायोजित करते.

दृश्य तयार करणे

  1. तुमच्या iPad वर होम ॲपवर जा.

  2. होम टॅबवर, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘दृश्य समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. ‘कस्टम’ वर टॅप करा, दृश्यासाठी नाव प्रविष्ट करा (जसे की "डिनर पार्टी" किंवा "TV पाहणे"), त्यानंतर ‘ॲक्सेसरी समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. हे दृश्य समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या ॲक्सेसरी सिलेक्ट करा, त्यानंतर ‘झाले’ वर टॅप करा.

    तुम्ही निवडलेली पहिली ॲक्सेसरी दृश्याला असाइन केलेली खोली निश्चित करते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या बेडरूमचा दिवा प्रथम सिलेक्ट केल्यास, दृश्य तुमच्या बेडरूमला असाइन केले जाते.

  5. जेव्हा तुम्ही दृश्य रन करता तेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या स्थितीत प्रत्येक ॲक्सेसरी सेट करा.

    उदाहरणार्थ, वाचन दृश्यासाठी, तुम्ही बेडरुमचे लाइट 100 टक्क्यांवर सेट करू शकता, पडदे लावू शकता, HomePod साठी कमी आवाज निवडू शकता, आणि थर्मोस्टॅट 68 डिग्रीवर सेट करू शकता.

  6. दृश्य तपासा आणि ते होम टॅबवर दाखवायचे की नाही हे निवडा (डिफॉल्टनुसार दृश्ये होम टॅबवर दिसतात), त्यानंतर ‘झाले’ वर टॅप करा.

दृश्य वापरणे

खालीलपैकी कोणतेही एक करा :

  • दृश्य चालवा : होम टॅबवरील दृश्यावर टॅप करा.

    जर तुम्ही होम टॅबवर दृश्य न दाखवण्याचा निर्णय घेतला असेल, तर अधिक बटण वर टॅप करा, दृश्यासाठी असाइन केलेली खोली निवडा, त्यानंतर दृश्यावर टॅप करा.

  • दृश्य संपादित करा : दृश्य टच आणि होल्ड करा, त्यानंतर दृश्य संपादित करा वर टॅप करा.

    तुम्ही दृश्याचे नाव बदलू शकता, दृश्य तपासू शकता, ॲक्सेसरी समाविष्ट करू शकता किंवा काढून टाकू शकता, आणि बरेच काही करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.