ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Touch ID सेट अप करणे

iPad वर होम बटणासह, iPad (दहावे जनरेशन आणि नंतरचे व्हर्जन), iPad Air (चौथे जनरेशन आणि नंतरचे व्हर्जन), iPad mini (सहावे जनरेशन) किंवा iPad mini (A17 Pro), तुम्ही iPad अनलॉक करण्यासाठी, खरेदी आणि पेमेंट अधिकृत करण्यासाठी आणि अनेक थर्ड पार्टी ॲप्समध्ये साइन इन करण्यासाठी सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे Touch ID वापरू शकता.

Touch ID वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या iPad वर पासकोड सेट करावा लागेल.

Touch ID चालू करणे

  1. सेटिंग  > ‘Touch ID व पासकोड’ वर जा.

  2. Touch ID वापरण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांपेकी कोणताही पर्याय चालू करा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

तुम्ही ‘iTunes व App Store’ चालू केल्यास, जेव्हा तुम्ही App Store, Apple Books किंवा iTunes Store वरून प्रथम खरेदी करता तेव्हा तुम्हाला तुमच्या Apple अकाउंट चा पासवर्ड विचारला जातो. जेव्हा तुम्ही पुढील खरेदी करता, तेव्हा तुम्हाला Touch ID वापरण्यास सांगितले जाते.

नोट : तुम्ही तुमचा बोटाचा ठसा समाविष्ट करू शकत नसल्यास किंवा Touch ID वापरून iPad अनलॉक करू शकत नसल्यास, तुमच्या iPhone किंवा iPad वर Touch ID काम करत नसल्यास काय करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Touch ID कधी वापरायचा ते निवडणे

तुमचा iPad अनलॉक करण्यासाठी, पेमेंट अधिकृत करण्यासाठी, पासवर्ड ऑटोमॅटिकली फिल करण्यासाठी, आणि पासवर्ड संरक्षित ॲप उघडण्यासाठी तुम्ही Touch ID वापरू शकता.

सेटिंग  > ‘Touch ID व पासकोड’ वर जा, नंतर ‘Touch ID वापरा’ खालील पर्याय चालू करा.

बोटाचा ठसा समाविष्ट करणे

तुम्ही अनेक बोटांचे ठसे समाविष्ट करू शकता (उदाहरणार्थ, तुमचे दोन्ही अंगठे आणि तर्जनी).

  1. सेटिंग  > ‘Touch ID व पासकोड’ वर जा.

  2. बोटाचा ठसा समाविष्ट करण्यासाठी टॅप करा.

  3. ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

बोटाच्या ठशाला नाव देणे किंवा हटवणे

  1. सेटिंग  > ‘Touch ID व पासकोड’ वर जा.

    तुम्ही एकापेक्षा जास्त बोटाचे ठसे समाविष्ट केलेले असल्यास, त्याची प्रिंट ओळखण्यासाठी पुढीलपैकी एक करा :

    • होम बटणासह iPad वर : होम बटणावर बोट ठेवा.

    • iPad (दहावे जनरेशन आणि नंतरचे व्हर्जन), iPad mini (सहावे जनरेशन), iPad mini (A17 Pro), आणि iPad Air (चौथे जनरेशन आणि नंतरचे व्हर्जन) वर : शीर्ष बटणावर बोट ठेवा.

  2. ‘बोटाचा ठसा’ वर टॅप करा, नंतर नाव प्रविष्ट करा (जसे की “अंगठा”) किंवा ‘बोटाचा ठसा’ हटवा वर टॅप करा.

Touch ID बंद करणे

सेटिंग  > ‘Touch ID व पासकोड’ वर जा, नंतर एक किंवा अधिक पर्याय बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.