ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘छायाचित्र’ मध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा सुट्ट्यांना कमी वेळा दाखवणे

छायाचित्र ॲप तुमच्या आठवणींमध्ये, वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रांमध्ये आणि ‘छायाचित्र’ विजेटमध्ये विशिष्ट लोक, दिवस आणि सुट्ट्या कमी वेळा दाखवू शकते किंवा अजिबात न दाखवणे असे करू शकते. तुम्ही तुमच्या iPad ‘होम स्क्रीन’ वरील विजेट आणि छायाचित्र ॲपमध्ये आठवणी आणि वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे देखील बंद करू शकता.

एखादी व्यक्ती कमी वेळा दाखवणे किंवा अजिबात न दाखवणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. जी व्यक्ती तुम्हाला कमी वेळ दाखवायची आहे त्या व्यक्तीचे छायाचित्र उघडा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ह्या व्यक्तीला कमी फीचर करा’ वर टॅप करा.

  4. ‘ह्या व्यक्तीला कमी फीचर करा’ निवडा, त्यानंतर पर्याय निवडा.

  5. ‘पुष्टी करा’ वर टॅप करा.

सुट्टीच्या आठवणी बंद करणे

तुम्ही तुमच्या मायदेशात किंवा प्रदेशात सुट्टीचे इव्हेंट दाखवणाऱ्या सर्व आठवणी बंद करू शकता.

  1. सेटिंग  > ॲप > ‘छायाचित्र’ वर जा.

  2. ’सुट्टीचे इव्हेंट दाखवा’ बंद करा.

‘आठवणी’ आणि ‘वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र’ बंद करणे

तुम्ही छायाचित्र ॲप आणि छायाचित्र विजेटच्या ‘तुमच्यासाठी’ विभागामध्ये ’आठवणी’ आणि ‘वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र’ बंद करू शकता.

  1. सेटिंग  > ॲप > ‘छायाचित्र’ वर जा.

  2. ‘वैशिष्ट्यपूर्ण कॉण्टेंट दाखवा’ बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.