ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर नकाशा ॲपमध्ये तुमच्या आगमनाची अंदाजित वेळ शेअर करणे

ड्राइव्हिंग, सायकलिंग आणि वॉकिंगचे दिशानिर्देश फॉलो करताना तुम्ही तुमच्या आगमनाची अंदाजित वेळ (ETA) इतरांबरोबर शेअर करू शकता जेणेकरून तुम्ही केव्हा येण्याची शक्यता आहे हे फ्रेंड्सना आणि कुटुंबातील सदस्यांना कळू शकेल. जास्त विलंब झाल्यास तुमचे ETA ऑटोमॅटिकली अपडेट होते, त्यामुळे तुम्हाला वाटेत फॉलो अप संदेश पाठवावे लागणार नाहीत.

नोट : सिलेक्ट केलेल्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. देश आणि प्रदेशानुसार फीचर बदलत असतात.

तुमच्या आगमनाची अंदाजित वेळ (ETA) शेअर करणे

Siri : असे काहीतरी म्हणा : “Share my ETA.” Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

किंवा Siri चा वापर न करता :

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण सर्च करा, त्यानंतर ‘जा’ वर टॅप करा.

  3. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ‘मार्गिका कार्ड’ वर टॅप करा, नंतर ‘ETA शेअर करा’ वर टॅप करा.

    जर तुम्हाला ’ETA शेअर करा’ दिसत नसेल, तर तुम्ही ते सेटिंग  > ॲप > नकाशा मध्ये चालू केले असल्याची खात्री करा.

  4. एक किंवा अधिक सुचवलेले संपर्क निवडा किंवा संपर्क शोधण्यासाठी ‘संपर्क उघडा’ वर टॅप करा.

  5. तुमचा ETA अधिक संपर्कांबरोबर शेअर करण्यासाठी, स्क्रीनच्या तळाशी “ह्याबरोबर शेअर करा” वर टॅप करा, नंतर ‘संपर्क समाविष्ट करा’ वर टॅप करा.

तुम्ही तुमचे स्थान इतरांबरोबर शेअर करण्यासाठी ‘संदेश’, ’शोधाशोध’ आणि संपर्क ॲपचा देखील वापर करू शकता. ’संदेश’ मध्ये तुमचे स्थान शेअर करा, ’शोधाशोध’ मध्ये तुमचे स्थान शेअर करा किंवा ’संपर्क’ संपादित करा पहा.

तुमचा ETA शेअर करणे थांबवणे

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. प्रवास सुरु असतानाच्या सहलीसाठी रूट कार्ड उघडा.

  3. स्क्रीनच्या तळाशी “सोबत शेअर करा” वर टॅप करा, नंतर प्रत्येक संपर्क नावाच्या खाली ‘ETA शेअर करणे थांबवा’ वर टॅप करा.

तुमचा ETA पिनवर ऑटोमॅटिकली शेअर करणे

जेव्हा तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये पिन केलेल्या ठिकाणामध्ये संपर्क समाविष्ट करता, तेव्हा जेव्हा कधी तुम्ही त्या स्थानाच्या दिशेने टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन सुरू करता तेव्हा त्या संपर्काला ऑटोमॅटिकली तुमचा ETA प्राप्त होतो.

  1. तुमच्या iPad वर नकाशा ॲपवर जा.

  2. पिनला टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘तपशील संपादित करा’ वर टॅप करा.

  3. ’व्यक्ती समाविष्ट करा’ वर टॅप करा, संपर्क सर्च करा, नंतर त्यांना समाविष्ट करण्यासाठी टॅप करा.

  4. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

  5. पिन केलेल्या स्थानावर टॅप करा, त्यानंतर तुमचे ETA शेअर करणे सुरू करण्यासाठी ’जा’ वर टॅप करा.

तुम्ही पोहोचेपर्यंत तुमचे स्थान, मार्ग, आणि ETA पाहण्यायोग्य आहेत.

‘ETA शेअर करणे’ बंद करणे

  1. सेटिंग  > ॲप > ‘नकाशा’ वर जा.

  2. खाली स्क्रोल करा, नंतर ‘ETA शेअर करा’ बंद करा.

नोट : ‘Wi-Fi + Cellular’ सह iPad मॉडेलवरील काही ‘नकाशा’ फीचरसाठी मोबाइल डेटा प्लॅन आणि मोबाइल डेटा, सेटिंग > ॲप > ‘नकाशा’ मध्ये चालू असणे आवश्यक आहे. मानक नेटवर्क प्रोव्हायडर डेटा आणि टेक्स्टचे दर लागू होऊ शकतात. तुमचे मोबाइल डेटा अकाउंट बघणे किंवा बदलणे पहा.

iOS 13.1, iPadOS 13.1 किंवा नंतरच्या आवृत्तीचा वापर करणाऱ्या लोकांना तुमच्या ETA द्वारे नकाशा नोटिफिकेशन प्राप्त होते आणि ते नकाशा वापरून तुमच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात. आधीचे व्हर्जन वापरणारे लोक iMessage च्या माध्यमातून नोटिफिकेशन प्राप्त करतात. इतर मोबाइल डिव्हाइसेसचा वापर करणाऱ्या लोकांना SMS संदेश प्राप्त होतो.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.