ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर iCloud दिनदर्शिका शेअर करणे

दिनदर्शिका ॲपमध्ये, तुम्ही इतर iCloud यूझरबरोबर iCloud दिनदर्शिका शेअर करू शकता. जेव्हा तुम्ही दिनदर्शिका शेअर करता, तेव्हा इतर लोक ती पाहू शकतात आणि तुम्ही त्यांना इव्हेंट समाविष्ट करू किंवा बदलू देऊ शकता. तुम्ही रीड ओन्ली व्हर्जन देखील शेअर करू शकता जे कोणीही पाहू शकते पण बदलू शकत नाही.

iCloud दिनदर्शिका तयार करणे

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी डाव्या बाजूला दिनदर्शिका बटण वर टॅप करा.

  3. ‘दिनदर्शिका समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. ’दिनदर्शिका समाविष्ट करा’ वर टॅप करा, नवीन दिनदर्शिकेसाठी नाव प्रविष्ट करा, त्यानंतर ’पूर्ण’ वर टॅप करा.

    iCloud तुमची डिफॉल्ट दिनदर्शिका नसल्यास, ‘अकाउंट’ वर टॅप करा, नंतर ‘iCloud’ वर टॅप करा. तुमच्या दिनदर्शिकेचे सेटिंग बदला पहा.

iCloud दिनदर्शिका शेअर करणे

तुम्ही iCloud मध्ये एक किंवा अधिक लोकांबरोबर दिनदर्शिका शेअर करू शकता. तुम्ही ज्यांना आमंत्रित करता त्यांना दिनदर्शिकेमध्ये जॉइन होण्याचे आमंत्रण प्राप्त होते.

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी डाव्या बाजूला दिनदर्शिका बटण वर टॅप करा.

  3. तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या iCloud दिनदर्शिकेच्या पुढे माहिती बटण वर टॅप करा.

  4. ’व्यक्ती समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर नाव किंवा ईमेल ॲड्रेस प्रविष्ट करा किंवा तुमचे संपर्क ब्राउझ करण्यासाठी ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

    नोट : iCloud दिनदर्शिका शेअर करण्यासाठी तुमच्या संपर्कांकडे ईमेल ॲड्रेस असणे आवश्यक आहे. संपर्क माहिती समाविष्ट करा आणि वापरा पहा.

  5. ‘समाविष्ट करा’ वर टॅप करा.

शेअर केलेल्या दिनदर्शिकेचा व्यक्तीला दिलेला ॲक्सेस बदलणे

तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमची दिनदर्शिका शेअर करण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर, तुम्ही दिनदर्शिका संपादित करण्याची त्यांची क्षमता चालू किंवा बंद करू शकता किंवा त्या व्यक्तीबरोबर दिनदर्शिका शेअर करणे थांबवू शकता.

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. दिनदर्शिका बटण वर टॅप करा, ‘दिनदर्शिका शेअर करा’ च्या पुढे माहिती बटण वर टॅप करा, नंतर त्या व्यक्तीवर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • ‘संपादन करण्याची अनुमती द्या’ चालू किंवा बंद करा.

    • ‘शेअर करणे थांबवा’ वर टॅप करा.

शेअर केलेल्या दिनदर्शिकेसाठी नोटिफिकेशन बंद करणे

तुम्ही शेअर करत असलेली दिनदर्शिका एखाद्या व्यक्तीने बदलल्यावर, तुम्हाला बदल सूचित केला जातो. तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त करायचे नसल्यास, तुम्ही शेअर केलेल्या दिनदर्शिकेसाठी त्या बंद करू शकता.

  1. सेटिंग  > नोटिफिकेशन > दिनदर्शिका > ‘नोटिफिकेशन कस्टमाइझ करा’ वर जा.

  2. ‘शेअर केलेले दिनदर्शिका बदल’ बंद करा.

फक्त वाचण्यासाठी असलेली ‘दिनदर्शिका’ कोणत्याही व्यक्तीबरोबर शेअर करणे

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. दिनदर्शिका बटण वर टॅप करा, नंतर तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या iCloud दिनदर्शिकेच्या पुढे माहिती बटण वर टॅप करा.

  3. ‘सार्वजनिक दिनदर्शिका’ चालू करा, त्यानंतर तुमच्या दिनदर्शिकेसाठी URL कॉपी करण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी ‘लिंक शेअर करा’ वर टॅप करा.

  4. URL—‘संदेश’, Mail आणि बरेच काही पाठवण्यासाठी पद्धत निवडा.

macOS साठी ‘दिनदर्शिका’ ह्यासारख्या सुसंगत ॲपचा वापर करून तुम्ही URL पाठवलेल्या कोणत्याही व्यक्तीला तो वापरुन ‘दिनदर्शिका’ ची सदस्यता घेता येते.

दिनदर्शिका हटवणे

  1. तुमच्या iPad वर दिनदर्शिका ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी डाव्या बाजूला दिनदर्शिका बटण वर टॅप करा.

  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या iCloud दिनदर्शिकेच्या पुढे माहिती बटण वर टॅप करा.

  4. यादीच्या खालील बाजूस असलेल्या ‘दिनदर्शिका हटवा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.