ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPad कॅमेऱ्याने पोर्ट्रेट मोडमध्ये सेल्फी घेणे

सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुम्ही फ्रंट कॅमेऱ्याने सेल्फी घेताना ‘पोर्ट्रेट’ मोड वापरू शकता. फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड सुंदरपणे ब्लर करत असताना हा इफेक्ट तुमचा चेहरा स्पष्ट ठेवतो. तुमच्या iPad मॉडेलनुसार, तुम्ही पोर्ट्रेट लाइटिंग इफेक्ट लागू करू शकता आणि बॅकग्राउंड ब्लरची पातळी ॲडजस्ट करू शकता.

पोर्ट्रेट मोडमध्ये सेल्फी घेणे

  1. तुमच्या iPad वर कॅमेरा कॅमेरा उघडा.

  2. पोर्ट्रेट मोड निवडा.

  3. तुमचा iPad तुमच्या समोर होल्ड करा, नंतर पोट्रेट बॉक्समध्ये स्वतःला फ्रेम करा.

  4. शॉट घेण्यासाठी शटर बटणावर टॅप करा.

पोर्ट्रेट लाइटिंग इफेक्ट बदलणे

पोर्ट्रेट लाइटिंगला सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये घेतलेल्या सेल्फीवर स्टुडिओ दर्जाचे लाइटिंग इफेक्ट लागू करू शकता.

  1. तुमच्या iPad वर कॅमेरा कॅमेरा उघडा.

  2. पोर्ट्रेट मोड निवडा.

  3. तुमचा iPad तुमच्या समोर होल्ड करा, नंतर पोट्रेट बॉक्समध्ये स्वतःला फ्रेम करा.

  4. लाइटिंग इफेक्ट निवडण्यासाठी पोर्ट्रेट लाइटिंग कंट्रोल ड्रॅग करा :

    • नैसर्गिक प्रकाश : अस्पष्ट बॅकग्राउंडच्या समोर चेहरा स्पष्ट फोकसमध्ये आहे.

    • स्टुडिओ लाइट : चेहरा चमकदार आहे आणि छायाचित्र एकंदरीत स्पष्ट दिसतो.

    • कॉन्टूर लाइट : चेहऱ्यावर हायलाइट आणि लो लाइटसह नाट्यमय छटा आहेत.

    • स्टेज लाइट : गडद काळ्या बॅकग्राउंडवर चेहरा स्पॉटलाइट केलेला आहे.

    • स्टेज लाइट मोनो : इफेक्ट ‘स्टेज लाइट’ सारखा आहे, परंतु छायाचित्र क्लासिक कृष्णधवल आहे.

    • हाय ‘की’ लाइट मोनो : फक्त पांढऱ्या बॅकग्राउंडवर ग्रेस्केल सब्जेक्ट तयार केला जातो—iPad Pro 11-इंच (दुसरे जनरेशन आणि नंतरचे व्हर्जन) आणि iPad Pro 12.9-inch (चौथे जनरेशन आणि नंतरचे व्हर्जन).

  5. शॉट घेण्यासाठी शटर बटणावर टॅप करा.

पोर्ट्रेट मोड सेल्फीमध्ये ‘डेप्थ कंट्रोल’ ॲडजस्ट करणे

’डेप्थ कंट्रोल’ ला सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये घेतलेल्या सेल्फीमधील बॅकग्राउंड ब्लरची पातळी ॲडजस्ट करण्यासाठी डेप्थ कंट्रोल स्लायडर वापरा.

  1. तुमच्या iPad वर कॅमेरा कॅमेरा उघडा.

  2. पोर्ट्रेट मोड निवडा.

  3. तुमचा iPad तुमच्या समोर होल्ड करा, नंतर पोट्रेट बॉक्समध्ये स्वतःला फ्रेम करा.

  4. स्क्रीनच्या उजव्या बाजूला ‘डेप्थ समायोजन’ बटण वर टॅप करा.

    ‘डेप्थ कंट्रोल’ स्लायडर उजवीकडे दिसेल.

  5. इफेक्ट ॲडजस्ट करण्यासाठी स्लायडर ‘वर’ किंवा ‘खाली’ ड्रॅग करा.

  6. शॉट घेण्यासाठी शटर बटणावर टॅप करा.

तुम्ही पोर्ट्रेट मोडमध्ये सेल्फी घेतल्यानंतर, बॅकग्राउंड ब्लरची पातळी आणखी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही छायाचित्र ॲपमध्ये ‘डेप्थ कंट्रोल’ स्लायडरचा वापर करू शकता. पोर्ट्रेटमध्ये बॅकग्राउंड अस्पष्ट करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.