iPad यूझर गाइड वाचणे आणि बुकमार्क करणे

जेव्हा तुम्ही Safari ॲपमध्ये iPad यूझर गाइड बघता, तेव्हा तुम्ही भाषा आणि देश किंवा प्रदेश बदलू शकता, बुकमार्क समाविष्ट करू शकता किंवा होम स्क्रीनवर शॉर्टकट म्हणून जतन करू शकता. तुम्ही टिप्स ॲपमध्ये देखील गाइड बघू शकता.

Safari मध्ये iPad यूझर गाइड बघणे आणि बुकमार्क करणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. https://support.apple.com/guide/ipad वर जा.

  3. यूझर गाइड वेगळ्या भाषेत बघण्यासाठी, पृष्ठाच्या तळाशी स्क्रोल करा, देश किंवा प्रदेशाच्या लिंकवर टॅप करा (उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्स), त्यानंतर देश किंवा प्रदेश निवडा.

  4. त्वरित ॲक्सेससाठी ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर खालीलपैकी कोणतेही एक निवडा :

    • होम स्क्रीनमध्ये समाविष्ट करा : शॉर्टकट होम स्क्रीनवर नवीन आयकॉन म्हणून दिसते.

    • बुकमार्क समाविष्ट करा : तुम्ही ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप केल्यानंतर Safari मध्ये 'बुकमार्क' वर टॅप करता तेव्हा बुकमार्क दिसतो.

‘टिप्स’ मध्ये iPad यूझर गाइड बघणे

  1. तुमच्या iPad वर टिप्स ॲपवर जा.

  2. टिप्स कलेक्शन दिसेपर्यंत ‘साइडबार दाखवा’ बटण किंवा ’टिप्स संग्रह’ चे बॅक बटण वर टॅप करा, नंतर iPad ('यूझर गाइड' च्या खाली) वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.