ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ॲप्स, ॲप डाउनलोड्स, संकेतस्थळे आणि खरेदी ब्लॉक करणे

तुम्ही iTunes आणि App Store खरेदी व्यतिरिक्त ॲप्स, फीचर्स आणि संकेतस्थळांचा ॲक्सेस प्रतिबंधित करू शकता.

कॉण्टेण्ट ब्लॉक करणे आणि iTunes व App Store; खरेदी प्रतिबंधित करणे

अयोग्य कॉण्टेण्ट ब्लॉक करण्यासाठी ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ सेट करा आणि iTunes Store आणि App Store खरेदीसाठी निर्बंध सेट करा.

  1. सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ वर जा.

  2. ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ वर टॅप करा, नंतर ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ चालू करा.

  3. पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • स्टोअर खरेदी आणि पुन्हा डाउनलोड करण्यासाठी निर्बंध सेट करा : ‘iTunes व App Store खरेदी’ वर टॅप करा.

    • होम स्क्रीनवरून ॲप किंवा फीचर काढून टाका : ‘अनुमती असलेली ॲप्स व फीचर’ वर टॅप करा.

    • App Store, मीडिया, ‘वेब व Game Center’ साठी कॉण्टेण्ट मानांकने आणि इतर निर्बंध सेट करा : ‘App Store, मीडिया, वेब व गेम्स’ टॅप करा.

    • Apple Intelligence, Siri, आणि गणिताचे परिणाम ह्यांचे ॲक्सेस प्रतिबंधित करा : ‘इंटेलिजन्स व Siri’ वर टॅप करा. ( स्क्रीन टाइम मध्ये Apple Intelligence फिचर्सचा ॲक्सेस ब्लॉक करा पहा.)

    • विशिष्ट फीचर, ॲप्स किंवा मीडियामध्ये गोपनीयता सेटिंग बदलण्याची अनुमती द्या : ‘गोपनीयता’ च्या खाली असलेल्या पर्यायावर टॅप करा, नंतर ‘बदलांना अनुमती द्या’ किंवा ‘बदलांना अनुमती देऊ नका’ वर टॅप करा.

    • इतर सेटिंग बदलण्याची अनुमती द्या : खाली असलेल्या ‘ह्यामध्ये बदलांना अनुमती द्या’ या पर्यायावर टॅप करा, नंतर ‘अनुमती द्या’ किंवा ’अनुमती देऊ नका’ वर टॅप करा.

इमेज निर्मिती फीचर्स, लेखन साधने आणि ChatGPT एक्सटेंशन ह्यांना ॲक्सेसची अनुमती देण्यासाठी, स्क्रीन टाइम मधील Apple Intelligence फीचर्सचा ॲक्सेस ब्लॉक करा पहा.

बिल्ट इन ॲप आणि फीचर चालू किंवा बंद करणे

तुम्ही बिल्ट इन ॲप किंवा फीचरचा वापर प्रतिबंधित करू शकता. तुम्ही ॲप बंद केल्यास, ते हटवले जात नाही; तुम्ही ते परत चालू करेपर्यंत ते तुमच्या होम स्क्रीनवरून तात्पुरते लपवलेले असते.

  1. सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ वर जा.

  2. ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ वर टॅप करा, नंतर ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ चालू करा.

  3. ‘अनुमती असलेली ॲप व फीचर’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्ही प्रतिबंधित करू इच्छित असलेली ॲप किंवा फीचर बंद करा.

संकेतस्थळे ब्लॉक करणे

तुम्ही URL नुसार विशिष्ट संकेतस्थळे ब्लॉक करू शकता.

  1. सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ वर जा.

  2. ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ वर टॅप करा, नंतर ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’ चालू करा.

  3. ‘App Store, मिडिया, वेब व गेम्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘वेब कॉण्टेण्ट’ वर टॅप करा.

  4. ‘प्रौढांसाठीची संकेतस्थळे मर्यादित करा’ सिलेक्ट करा, ‘कधीही अनुमती देऊ नका’ च्या खाली ‘संकेतस्थळ समाविष्ट करा’ वर टॅप करा आणि तुम्हाला ब्लॉक करायच्या असलेल्या संकेतस्थळांच्या URL प्रविष्ट करा

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.