ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘आरोग्य’ डेटाची प्रस्तावना

आरोग्य ॲप iPhone, iPad आणि Apple Watch, तसेच सुसंगत थर्ड पार्टी ॲप आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसमधील तुमची आरोग्य माहिती सुरक्षितपणे संग्रहित करते. तुम्ही शरीराची मोजमापे, लक्षणे, ऋतुचक्राची माहिती आणि बऱ्याच माहितीसाठी देखील मॅन्युअली डेटा प्रविष्ट करू शकता.

Siri : सपोर्ट केलेल्या मॉडेल वर, असे काहीतरी म्हणा : “What’s my heart rate?” किंवा “How far have I walked today?” सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

‘आरोग्य’ मधील सारांश स्क्रीन. ॲक्टिव्हिटी, मनाची स्थिती, जीवनावश्यक, झोप, हृदयाची गती आणि दिवसाच्या प्रकाशातील वेळेची माहिती ‘पिन केलेले’ च्या खाली दिसते.

iPad मधील आरोग्य डेटा

iPad महत्वाचा आरोग्य डेटा ऑटोमॅटिकली संग्रहित आणि विश्लेषित करते, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे :

  • हेडफोन ऑडिओ पातळी : कनेक्ट केलेले AirPods, EarPods किंवा इतर सुसंगत हेडफोनमधील ऑडिओ पातळीची मोजमापे ’आरोग्य’ मध्ये ऑटोमॅटिकली संग्रहित केली जातात. तुमच्या हेडफोन ऐकण्याच्या सवयी समजून घेण्यात मदत करण्यासाठी तुम्ही हा डेटा ‘श्रवण’ श्रेणीमध्ये रिव्ह्यू करू शकता.

  • झोपेची हिस्ट्री : जर तुम्ही iPhone वर ’आरोग्य’ मध्ये झोपेचे शेड्यूल सेट अप केले, तर iPhone तुम्ही झोपेच्या उद्देशाने अंथरूणावर पडलेल्या कालावधीचा अंदाज लावतो. तुम्ही तुमची झोपेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी iPad वर झोपेच्या श्रेणीमध्ये हा डेटा रिव्ह्यू करू शकता.

  • तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याकडील आरोग्य नोंदी : तुम्ही सपोर्ट करणाऱ्या आरोग्य सेवा संस्थांकडून (सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही) तुमच्या ॲलर्जी, वैद्यकीय स्थिती, औषधे आणि इतर अनेक आरोग्य नोंदींचे ऑटोमॅटिक डाउनलोड सेट अप करू शकता. तुम्ही ’आरोग्य’ मध्ये ह्या नोंदी ब्राउझ करू शकता.

इतर ॲप आणि डिव्हाइसवरील आरोग्य डेटा

तुम्ही App Store मधून डाउनलोड केलेले आरोग्य आणि फिटनेस ॲप सेट अप करत असताना, त्यांच्या ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करून त्यांना ‘आरोग्य’ सह डेटा शेअर करण्याची अनुमती द्या.

रक्तदाब मॉनिटर आणि वजनमापक सारख्या डिव्हाइसमधून डेटा संग्रहित करण्यासाठी, त्यांच्या सेटअप सूचनांचे पालन करा. Bluetooth® डिव्हाइसेसला iPad सह पेअर करणे गरजेचे आहे.

नोट : तुम्ही कोणत्याही वेळी ॲप्स आणि डिव्हाइसेससाठी आरोग्य डेटा परवानग्या बदलू शकता.

तुम्ही मॅन्युअली समाविष्ट केलेला डेटा

तुम्ही तुमचे ऋतुचक्र, औषधे, शरीराची मोजमापे ह्याबद्दलचा आणि बराच डेटा मॅन्युअली प्रविष्ट करू शकता.

  • तुमच्या ऋतुचक्राची माहिती समाविष्ट करा : ऋतुचक्राची माहिती लॉग करून, तुम्ही मासिक पाळी आणि ‘गर्भधारणेसाठी योग्य काळ’ ह्याबद्दलचे अंदाज मिळवू शकता. ’आरोग्य’ मध्ये ऋतुचक्राची माहिती लॉग करा पहा.

  • तुमची औषधे, जीवनसत्त्वे, आणि पूरके समाविष्ट करा : हे आयटम समाविष्ट केल्याने, तुम्ही त्यांना घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रिमाइंडर प्राप्त करू शकता. ’आरोग्य’ मध्ये तुमच्या औषधांचा मागोवा घ्या पहा.

  • इतर ‘आरोग्य’ श्रेणींमध्ये माहिती समाविष्ट करा : साइडबार बटण वर टॅप करा, श्रेणीवर टॅप करा, तुम्हाला अपडेट करायचे असलेल्या डेटासाठी तपशील बटण वर टॅप करा, नंतर वरच्या उजव्या बाजूला ‘डेटा समाविष्ट करा’ वर टॅप करा.

महत्त्वाचे : iPhone, iPad आणि Apple Watch हे वैद्यकीय डिव्हाइसेस नाहीत. iPad साठी महत्त्वाची सुरक्षा माहिती पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.