ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर गट FaceTime कॉल करणे

FaceTime ॲपमध्ये , गटाच्या FaceTime कॉलमध्ये तुम्ही एकावेळी जास्तीत जास्त 32 सहभागींना समाविष्ट करू शकता (सर्व देश किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही).

गटाचा FaceTime कॉल सुरू करणे

  1. FaceTime मध्ये, स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘नवीन FaceTime’ वर टॅप करा.

  2. तुम्हाला ज्यांना कॉल करायचा आहे त्यांची नावे किंवा नंबर शीर्षस्थानी असलेल्या नोंद फील्डमध्ये टाइप करा.

    ‘संपर्क’ उघडण्यासाठी आणि तेथील लोकांना समाविष्ट करण्यासाठी तुम्ही ‘संपर्क समाविष्ट करा’ बटण वर टॅप देखील करू शकता. किंवा ‘सुचवलेले संपर्क’ वर टॅप करा.

  3. व्हिडिओ कॉल करण्यासाठी FaceTime बटण वर टॅप करा किंवा FaceTime ऑडिओ कॉल करण्यासाठी कॉल बटण वर टॅप करा.

प्रत्येक सहभागी स्क्रीनवरील टाइलमध्ये दिसतात. जेव्हा एखादा सहभागी बोलतो (तोंडी किंवा सांकेतिक भाषा वापरून) किंवा तुम्ही ‘टाइल’ वर टॅप करता, तेव्हा ती टाइल हायलाइट होते किंवा अधिक ठळक होते. स्क्रीनवर फिट होऊ शकत नाहीत अशा टाइल सर्वात खाली एका ओळीत दिसतात. तुम्हाला दिसत नसलेला सहभागी शोधण्यासाठी, ओळीमध्ये स्वाइप करा. (इमेज उपलब्ध नसल्यास सहभागीची आद्याक्षरे टाइलमध्ये दिसू शकतात.)

नोट : ग्रिडमध्ये व्यवस्थापित केलेल्या सहभागींच्या इमेज पाहण्यासाठी, iPad वर FaceTime मध्ये सहभागी ग्रिडमध्ये बघणे पहा.

गटाच्या FaceTime कॉलदरम्यान, बोलणाऱ्या व्यक्तीची टाइल अधिक ठळक होणे टाळण्यासाठी, सेटिंग  > ॲप > ‘FaceTime’ वर जा, त्यानंतर ‘ऑटोमॅटिक प्रामुख्य’ च्या खाली ‘बोलणारे’ बंद करा.

नोट : सांकेतिक भाषा ओळखण्यासाठी प्रस्तूतकर्त्यासाठी सपोर्ट केलेले मॉडेल आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, सादरकर्ते आणि सहभागी व्यक्ती या दोहोंकडे iOS 14, iPadOS 14, macOS 11 किंवा त्यानंतरचे व्हर्जन असणे आवश्यक आहें.

गट संदेश संभाषणातून गटाचा FaceTime कॉल सुरू करणे

गटाच्या iMessage संभाषणात, तुम्ही ‘संदेश’ मध्ये चॅट करत असलेल्या सर्व लोकांबरोबर गटाचा FaceTime कॉल सुरू करू शकता.

  1. iMessage संभाषणाच्या वरच्या उजव्या बाजूला FaceTime बटण वर टॅप करा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • ‘FaceTime ऑडिओ’ वर टॅप करा.

    • ‘FaceTime व्हिडिओ’ वर टॅप करा.

कॉलमध्ये दुसऱ्या व्यक्तीला समाविष्ट करणे

FaceTime कॉल दरम्यान कोणीही सहभागी कोणत्याही क्षणी दुसऱ्या व्यक्तीला समाविष्ट करू शकतो.

  1. FaceTime व्हिडिओ कॉलदरम्यान, FaceTime कंट्रोल (ते दिसत नसल्यास) दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा, कंट्रोलच्या वरच्या बाजूला ‘अधिक माहिती’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘लोकांना समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  2. तुम्हाला समाविष्ट करायच्या असलेल्या व्यक्तीचे नाव, Apple अकाउंट किंवा फोन नंबर शीर्षस्थानी असलेल्या नोंद फिल्डमध्ये टाइप करा.

    किंवा ‘संपर्क’ मधून एखाद्या व्यक्तीला समाविष्ट करण्यासाठी ‘संपर्क समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  3. ‘लोक समाविष्ट करा’ वर टॅप करा.

गटाचा FaceTime कॉल जॉइन करणे

तुम्हाला कुणीतरी गटाचा FaceTime कॉल जॉइन करण्यासाठी आमंत्रित केल्यास, तुम्हाला इनकमिंग कॉलसंबंधी नोटिफिकेशन मिळते—तुम्ही तो जॉइन करू शकता किंवा नाकारू शकता. FaceTime कॉलला उत्तर देणे पहा.

गटाच्या FaceTime कॉलमधून बाहेर पडणे

गटाचा कॉल कोणत्याही वेळी सोडण्यासाठी, ’सोडा’ वर टॅप करा.

एक किंवा अधिक सहभागी राहिल्यास कॉल सक्रिय राहतो.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.