ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘नोट्स’ मध्ये अकाउंट समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे

नोट्स ॲपमध्ये , तुम्ही iCloud, एन्टरप्राइझने मॅनेज केलेले iCloud, Microsoft Exchange, Google, आणि Yahoo ह्यासारखे अनेक अकाउंट वापरू शकता आणि तुमच्या सर्व नोट्स एकाच ठिकाणी ठेवू शकता. समान अकाउंट वापरणाऱ्या तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमच्या नोट्स अद्ययावत राहतात. तुम्ही केवळ ह्या डिव्हाइसवर ठेवलेल्या नोट्ससाठी ‘माझ्या iPad वर’ अकाउंट देखील तयार करू शकता.

नोट : जेव्हा तुम्ही iCloud आणि ‘माझ्या iPad वर’ अकाउंटचा वापर करता तेव्हा ह्या गाइडमध्ये वर्णन केलेली सर्व ‘नोट्स’ फीचर उपलब्ध असतात. इतर अकाउंटचा वापर करताना काही फीचर उपलब्ध नसतात.

iCloud सह तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमच्या नोट्स अद्ययावत ठेवणे

तुमच्या iCloud नोट्स आणि तुम्ही त्यामध्ये केलेले कोणतेही बदल तुमच्या iPhone, iPad, आणि Mac वर दिसतील, जेथे तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असेल.

  1. सेटिंग  > [ तुमचे नाव] > iCloud वर जा.

  2. नोट्स सुरू करा.

इतर अकाउंट समाविष्ट करणे

  1. सेटिंग  > ॲप > ‘नोट्स’ वर जा.

  2. नोट्स अकाउंटवर टॅप करा, नंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • अकाउंट प्रदाता निवडा, नंतर तुमच्या अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

    • तुमचा अकाउंट प्रदाता यादीमध्ये नसल्यास, ‘इतर’ वर टॅप करा, ‘Mail अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा, तुमची ईमेल अकाउंट माहिती प्रविष्ट करा, नंतर त्या अकाउंटसाठी ‘नोट्स’ चालू करा.

‘माझ्या iPad वर’ अकाउंट सेट अप करा

ह्या अकाउंटमधील नोट्स फक्त तुमच्या iPad वर दिसतात आणि त्या तुमच्या iPad बॅकअपमध्ये iCloud मध्ये समाविष्ट केल्या जातात.

  1. सेटिंग  > ॲप > ‘नोट्स’ वर जा.

  2. “माझ्या iPad वर” अकाउंट चालू करा.

अकाउंट काढून टाकणे

जेव्हा तुम्ही अकाउंट काढून टाकता किंवा हटवता, तेव्हा त्या अकाउंटमधील नोट्स ह्यापुढे तुमच्या iPad वर दिसणार नाहीत. नोट्स तुमच्या इंटरनेट अकाउंटमध्ये (उदाहरणार्थ, iCloud.com किंवा Google) आणि तुम्ही आधी सेट अप केलेल्या इतर कोणत्याही डिव्हाइसमध्ये राहतात.

  1. सेटिंग  > ॲप > ‘नोट्स’ वर जा.

  2. नोट्स अकाउंटवर टॅप करा, नंतर तुम्हाला काढून टाकायचे असलेल्या अकाउंटवर टॅप करा.

  3. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • अकाउंटवर नोट्स वापरणे थांबवा : नोट्स बंद करा.

      तुम्ही Mail सारख्या इतर सेवांसाठी अकाउंटचा वापर चालू ठेवू शकता.

    • अकाउंटवर सर्व सेवा वापरणे थांबवा : ‘साइन आउट’ वर टॅप करा (iCloud अकाउंटसाठी) किंवा अकाउंट हटवा (इतर अकाउंटसाठी).

      तुम्हाला ‘साइन आउट करणे’ किंवा ‘अकाउंट हटवणे’ दिसत नसल्यास, तुमचे अकाउंट तुमच्या संस्थेद्वारे मॅनेज केलेले असू शकते. काढून टाकण्याच्या सूचनांसाठी ॲडमिनिस्ट्रेटर पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.