ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

ड्रॅग आणि ड्रॉपने iPad वर आयटम मूव्ह आणि कॉपी करणे

ड्रॅग आणि ड्रॉपने तुम्ही ॲपमध्ये टेक्स्ट आणि आयटम मूव्ह करण्यासाठी आणि आयटम एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये कॉपी करण्यासाठी बोट वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही ‘नोट्स’ मधील इमेज ईमेलमध्ये ड्रॅग करू शकता. (सर्व थर्ड पार्टी ॲप ड्रॅग आणि ड्रॉपला सपोर्ट करत नाहीत.)

आयटम मूव्ह करणे

  1. तुम्हाला जो आयटम मूव्ह करायचा आहे तो शोधा.

  2. आयटम ‘वर’ जाईपर्यंत त्यावर टच आणि होल्ड करा (तो टेक्स्ट असल्यास, तो आधी सिलेक्ट करा).

  3. ॲपच्या आत दुसऱ्या स्थानावर ड्रॅग करा.

    तुम्ही मोठ्या डॉक्युमेंटच्या तळाशी किंवा वर ड्रॅग केल्यास, ते ऑटोमॅटिकली स्क्रोल होते.

उघडलेल्या ॲपमध्ये आयटम कॉपी करणे

  1. Split View मध्ये किंवा Slide Over मध्ये दोन ॲप उघडा, नंतर आयटम वर येईपर्यंत टच आणि होल्ड करा (तो टेक्स्ट असल्यास, तो आधी सिलेक्ट करा).

  2. ते दुसऱ्या ॲपवर ड्रॅग करा.

    तुम्ही ड्रॅग करत असताना, जिथे तुम्ही आयटम ड्रॉप करू शकता तिथे इन्सर्ट आयकॉन दिसते. तुम्ही मोठ्या डॉक्युमेंटच्या तळाशी किंवा वर ड्रॅग केल्यास, डॉक्युमेंट ऑटोमॅटिकली स्क्रोल होते.

    टिप : तुम्हाला आयटम नवीन नोट किंवा ईमेलवर ड्रॅग करायचा असल्यास, पहिले नवीन नोट किंवा ईमेल उघडा जेणेकरून तुम्ही थेट आयटमवर ड्रॅग करू शकाल.

Split View ज्यामध्ये डावीकडे नोट्स उघडलेले आहे आणि उजवीकडे ईमेल उघडलेला आहे. नोट्समधील छायाचित्र ईमेलमध्ये ड्रॅग केले जाते.

Split View किंवा Slide Over विंडोवर लिंक ड्रॅग करणे

लिंक वर जाईपर्यंत टच आणि होल्ड करा, नंतर पुढीलपैकी एक करा :

  • Split View किंवा Slide Over विंडोला लिंकच्या गंतव्यस्थानासह बदली करा : लिंक विंडोवर ड्रॅग करा.

  • Split View किंवा Slide Over विंडोमध्ये लिंकचे गंतव्यस्थान उघडा : जेव्हा कोणताही Split View किंवा Slide Over विंडो दिसत नसेल, तेव्हा Split View मध्ये गंतव्यस्थान उघडण्यासाठी स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला लिंक ड्रॅग करा किंवा Slide Over मध्ये उघडण्यासाठी लिंक कडेजवळ ड्रॅग करा.

होम स्क्रीनवर किंवा Dock मध्ये ॲपसाठी आयटम कॉपी करणे

  1. तुम्हाला कॉपी करायचा असलेला आयटम शोधा (तो टेक्स्ट असल्यास, तो सिलेक्ट करा).

  2. ‘वर’ जाईपर्यंत तो ‘आयटम’ ला टच आणि होल्ड करा.

  3. आयटम होल्ड करणे चालू असताना, स्क्रीनच्या खालच्या कडेवरून ‘वर’ स्वाइप करण्यासाठी दुसरे बोट वापरा, नंतर Dock उघड करण्यासाठी एकतर पॉज करा किंवा होम बटण दाबा (iPad वर होम बटणासह).

  4. ते उघडण्यासाठी आयटम दुसऱ्या ॲपवर ड्रॅग करा (ड्रॅग करताना आयटमची घोस्ट इमेज तुमच्या बोटाखाली दिसते).

    तुम्हाला आयटम जिथे ड्रॅग करायचा आहे त्या ठिकाणी नॅव्हिगेट करण्यासाठी तुम्ही ॲपमधील आयटम ड्रॅग ओव्हर करू शकता (तुम्ही ड्रॅग केल्यावर, जिथे तुम्ही आयटम ड्रॉप करू शकता तिथे इन्सर्ट आयकॉन दिसते). उदाहरणार्थ, तुम्हाला जिथे आयटम ड्रॉप करायचा आहे ती नोट उघडण्यासाठी तुम्ही नोट्स यादीवर ड्रॅग करू शकता किंवा जिथे तुम्ही आयटम ड्रॉप करू शकता तिथे तुम्ही नवीन नोट उघडण्यासाठी दुसरे बोट वापरू शकता.

आयटम मूव्ह करण्याविषयी तुम्ही तुमचा विचार बदलल्यास, ड्रॅग करण्यापूर्वी तुमचे बोट उचला किंवा स्क्रीनवरून आयटम ड्रॅग करा.

मूव्ह करण्यासाठी अनेक आयटम सिलेक्ट करणे

  1. तुम्हाला जो आयटम मूव्ह करायचा आहे तो शोधा आणि सिलेक्ट करा.

  2. पहिल्या सिलेक्ट केलेल्या आयटमवर टच आणि होल्ड करा, त्याला किंचित ड्रॅग करा आणि होल्ड करून ठेवा.

  3. पहिला आयटम होल्ड करत असताना, दुसऱ्या बोटाने अतिरिक्त आयटमवर टॅप करा. बॅज सिलेक्ट केलेल्या आयटमची संख्या दर्शवतो.

  4. सर्व आयटम एकत्र ड्रॅग करा.

आयटम मूव्ह करण्याविषयी तुम्ही तुमचा विचार बदलल्यास, ड्रॅग करण्यापूर्वी तुमचे बोट उचला, किंवा स्क्रीनवरून आयटम ड्रॅग करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.