ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर कॅल्क्युलेटर ॲपसह सुरुवात करणे

कॅल्क्युलेटर ॲपमध्ये एकके रूपांतरित करा आणि गणिते सोडवा. मूलभूत किंवा सायंटिफिक मोड वापरा किंवा ‘गणितीय नोट्स’ वापरून आलेख काढा आणि तुमची गणिते सोडवा. तुम्ही तुमचे मागील कॅल्क्युलेशन्स देखील रिव्ह्यू करू शकता.

चलन रुपांतरणासह मूलभूत कॅल्क्युलेटर.

एकके सहजपणे रूपांतरित करणे

‘मैल’ चे ‘मिलिमीटर’ मध्ये? ‘येन’ चे ‘युरो’ मध्ये? एकक रुपांतरण मोडसह लांबी, वजन, शक्ती, दाब, वेग, चलन आणि बरीच एकके बदला. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, त्यानंतर 'रुपांतरण करा' सुरू करा.

iPad मेमरी, एक्स्पोनेन्शियल, लॉगॅरिदमिक आणि त्रिकोणमितीय फंक्शन्ससह सायंटिफिक कॅल्क्युलेटर दाखवत आहे.

तुमच्या सायंटिफिक कॅल्क्युलेटरच्या क्षमतांचा सराव करणे

सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये अपूर्णांक, घात, मूळ, घातांक, लॉगॅरिदम, त्रिकोणमिती आणि बरेच काही समाविष्ट असलेली ॲडव्हान्स्ड कॅल्क्युलेशन्स करा. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, ’सायंटिफिक’ वर टॅप करा आणि तुमची पदावली प्रविष्ट करणे सुरू करा. पुन्हा सुरू करण्यासाठी ’सर्व क्लिअर करा’ (AC) ‘की’ वर टॅप करा किंवा ‘हटवा’ की वर टच आणि होल्ड करा.

घोषित चले, समीकरण आणि आलेख दाखवणाऱ्या iPad वरील कॅल्क्युलेटरमधील गणितीय नोट्स.

तुमची पदावली आलेखासह व्हिज्युअलाइज करणे

‘गणितीय नोट्स’ मध्ये पदावल्यांचे मूल्य काढा, चले असाइन करा आणि आलेख काढा. ‘कॅल्क्युलेटर मोड’ बटण वर टॅप करा, 'गणितीय नोट्स' वर टॅप करा, त्यानंतर दोन चलांसह समीकरण लिहा. तुमचा आलेख डिझाइन करण्यासाठी समीकरणाच्या बरोबर चिन्हावर टॅप करा.

iPad वर कॅल्क्युलेटर ॲपच्या डावीकडील कॅल्क्युलेशन हिस्ट्री.

तुमची उत्तरे पुन्हा बघणे

मूलभूत किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये मागील कॅल्क्युलेशन्सचा मागोवा घेण्यासाठी, ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर लिस्टिंग रीलोड करण्यासाठी त्यावर टॅप करा. तुम्ही पदावली किंवा उत्तर कॉपी करण्यासाठी यादीतील उत्तरावर टच आणि होल्ड देखील करू शकता आणि कॅल्क्युलेटर किंवा इतर ॲप्समध्ये पुन्हा ते वापरू शकता.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.