ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील दुसऱ्या ब्राउझरवर Safari डेटा एक्सपोर्ट करणे

iPadOS 18.2 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनमध्ये, तुम्ही Safari मधून सिलेक्ट केलेला डेटा एक्सपोर्ट करू शकता आणि नंतर तो डेटा दुसऱ्या ब्राउझरमध्ये इम्पोर्ट करू शकता.

Safari मधून तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, अशा डेटामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत :

  • बुकमार्क

  • हिस्ट्री

  • एक्सटेंशन

  • क्रेडिट कार्ड

  • पासवर्ड

चेतावणी : तुमचा एक्सपोर्ट केलेला डेटा एनक्रिप्ट केलेला नाही आणि फाइल ॲक्सेस करू शकणाऱ्या कोणालाही तो दिसतो. तुम्ही डेटा दुसऱ्या ब्राउझरमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर, तुम्ही एक्सपोर्ट केलेली फाइल हटवा.

Safari वरून दुसऱ्या ब्राउझरवर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता असा डेटा दाखवणारी एक्सपोर्ट ब्राउझिंग डेटा स्क्रीन.
  1. सेटिंग  > ॲप > Safari वर जा.

  2. ‘हिस्ट्री आणि संकेतस्थळ डेटा’ च्या खाली, ’एक्सपोर्ट करा’ वर टॅप करा.

  3. एक्सपोर्ट करण्यासाठी डेटा सिलेक्ट करा.

    जर तुम्ही Safari मध्ये तुमच्या ब्राउझिंगसाठी प्रोफाइल तयार केल्या असतील, तर तुम्हाला ज्या प्रोफाइलमधून डेटा एक्सपोर्ट करायचा आहे ते प्रोफाइल निवडा किंवा ‘सर्व प्रोफाइल’ निवडा.

    प्रत्येक प्रोफाइलची स्वतःची हिस्ट्री आणि एक्सटेंशन डेटा असतो. सर्व प्रोफाइलमध्ये बुकमार्क, क्रेडिट कार्ड आणि पासवर्डचा डेटा एकसारखाच असतो.

  4. डाउनलोड करण्यासाठी ‘जतन करा’ वर टॅप करा.

  5. 'पूर्ण' वर टॅप करा.

एक्सपोर्ट केलेला डेटा तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये .zip फाइल म्हणून जतन केला जातो.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.