ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमच्याबद्दल Siri ला सांगणे

अधिक वैयक्तिकृत अनुभवासाठी तुम्ही Siri ला माहिती प्रदान करू शकता, ज्यात तुमचे घर आणि कार्यस्थळाचे पत्ते आणि तुमचे नातेसंबंध समाविष्ट आहेत, जेणेकरून तुम्ही “Give me driving directions home” आणि “FaceTime mom.” असे काहीतरी म्हणू शकता.

तुम्ही कोण आहात ते Siri ला सांगणे

  1. संपर्क उघडा, नंतर तुमची संपर्क माहिती भरा.

  2. सेटिंग  > 'Siri' (किंवा 'Apple Intelligence व Siri') > ’माझी माहिती’ वर जा, नंतर तुमच्या नावावर टॅप करा.

तुमचे नाव कसे बोलायचे ते Siri ला सांगणे

  1. संपर्क उघडा, त्यानंतर तुमच्या संपर्क कार्डवर टॅप करा.

  2. ‘संपादित करा’ वर टॅप करा, खाली स्क्रोल करा आणि “फील्ड समाविष्ट करा” वर टॅप करा, उच्चाराच्या नावाची फील्ड सिलेक्ट करा, नंतर तुमचे नाव कसे म्हणायचे ते टाइप करा.

तुम्ही ‘संपर्क’ मध्ये इतर कोणत्याही संपर्क कार्डसाठी उच्चारण देखील समाविष्ट करू शकता. संपर्क संपादित करा पहा.

संबंधाबद्दल Siri ला सांगणे

“Hey Siri, Eliza Block is my wife” किंवा “Hey Siri, Ashley Kamin is my mom.” असे काहीतरी म्हणा

तुमच्या Apple डिव्हाइसेसवर Siri ला तुमच्याबद्दल जे माहीत आहे ते अद्ययावत ठेवणे

प्रत्येक डिव्हाइसवर, सेटिंग वर जा, नंतर त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन करा.

जर तुम्ही iCloud वापरत असाल, तर तुमचे Siri सेटिंग तुमच्या Apple डिव्हाइसवर एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन वापरून अद्ययावत राहतात.

जर तुम्हाला Siri वैयक्तिकरणाला iPad आणि तुमच्या इतर डिव्हाइसेसवर अद्ययावत ठेवायचे नसेल, तर तुम्ही iCloud सेटिंगमध्ये ‘Siri’ बंद करू शकता.

  1. सेटिंग  > [तुमचे नाव] > ‘iCloud’ वर जा.

  2. ‘सर्व पहा’ वर टॅप करा, नंतर Siri बंद करा.

नोट : तुम्ही ‘स्थान सेवा’ चालू केलेल्या असल्यास, तुम्ही विनंती करता त्यावेळी तुमच्या डिव्हाइसचे स्थान तुमच्या विनंत्यांच्या उत्तराची अचूकता सुधारण्यात Siri ला मदत करण्यासाठी Apple ला देखील पाठवले जाते. संबंधित प्रतिसाद प्रदान करण्यासाठी, Apple तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा IP ॲड्रेस भौगोलिक प्रदेशाशी जुळवून तुमच्या स्थानाचा अंदाज बांधण्यासाठी वापरू शकते. तुम्ही शेअर करत असलेली स्थान माहिती नियंत्रित करा पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.