ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर स्टॉक तपासणे

मार्केट ॲक्टिव्हिटीचा मागोवा घेण्यासाठी आणि तुम्ही फॉलो करत असलेल्या स्टॉकची कामगिरी बघण्यासाठी स्टॉक ॲप वापरा.

Siri : असे काहीतरी म्हणा: “How are the markets doing?” किंवा “How’s Apple stock today?” Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

स्टॉक तपासणे

  1. तुमच्या iPad वर स्टॉक ॲपवर जा.

  2. विशिष्ट स्टॉक शोधण्यासाठी, स्क्रीनच्या शीर्षस्थानी सर्च फील्डमध्ये टिकर सिम्बल, कंपनीचे नाव, निधीचे नाव किंवा अनुक्रमणिका प्रविष्ट करा, त्यानंतर सर्च परिणामांमधील सिम्बलवर टॅप करा.

  3. अधिक तपशीलांसाठी ’माझे सिम्बल’ वॉचलिस्टमधील टिकर सिम्बलवर टॅप करा.

चार्ट, तपशील आणि बातम्या बघणे पहा.

‘माझे सिम्बल’ वॉचलिस्टमध्ये सिम्बल मॅनेज करणे

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टॉक ॲप उघडता, तेव्हा स्क्रीनवर टिकर सिम्बलची यादी दिसते; ह्यास ’माझे सिम्बल’ वॉचलिस्ट म्हणतात. तुम्ही ‘माझे सिम्बल’ वॉचलिस्ट अपडेट आणि मॅनेज करु शकता आणि तुमची स्वतःची वॉचलिस्ट तयार करू शकता.

  1. तुमच्या iPad वर स्टॉक ॲपवर जा.

  2. सर्वात अलीकडील किंमत, दैनंदिन टक्केवारीतील बदल, मार्केट कॅपिटलायझेशन मूल्य आणि बरेच काही बघण्यासाठी सिम्बलवर टॅप करा.

  3. ‘माझे सिम्बल’ वॉचलिस्टमध्ये बदल करण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • सिम्बल समाविष्ट करा : सर्च फील्डमध्ये, टिकर सिम्बल, कंपनीचे नाव, निधीचे नाव किंवा अनुक्रमणिका प्रविष्ट करा. सर्च परिणामांमध्ये, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘झाले’ वर टॅप करा.

    • सिम्बल हटवा : तुमच्या वॉचलिस्टमधील सिम्बलवर डावीकडे स्वाइप करा.

      नोट : तुम्ही ‘माझे सिम्बल’ वॉचलिस्टमधील सिम्बल हटवल्यास, तो सिम्बल तुमच्या इतर वॉचलिस्टमधून देखील हटवला जाईल (अनेक वॉचलिस्ट मॅनेज करा पहा).

    • सिम्बल रीऑर्डर करा : तुमच्या वॉचलिस्टमधील सिम्बलवर टच आणि होल्ड करा, नंतर त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा.

    • चलन दाखवा : अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर स्टॉकचा व्यवहार केला जातो ते चलन डिस्प्ले करण्यासाठी ‘चलन दाखवा’ वर टॅप करा.

    • सिम्बल शेअर करा : तुमच्या वॉचलिस्टमधील सिम्बलवर डावीकडे स्वाइप करा, ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर संदेश किंवा Mail ह्यासारखा शेअर करण्याचा पर्याय निवडा.

चार्ट, तपशील आणि बातम्या बघणे

तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमधील टिकर सिम्बलसंबंधीचे संवादात्मक चार्ट, कामगिरीचे तपशील आणि संबंधित बातम्या आणि तुम्ही शोधत असलेले सिम्बल बघू शकता.

  1. तुमच्या iPad वर स्टॉक ॲपवर जा.

  2. ज्या सिम्बलबद्दल तुम्हाला अधिक तपशील पहायचे आहेत त्यावर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • वेळेनुसार कार्यक्षमता बघा : चार्टच्या शीर्षस्थानी असलेल्या टाइम रेंज सिलेक्शनमधील पर्याय टॅप करा.

    • विशिष्ट दिनांक किंवा वेळेचे मूल्य बघा : एका बोटाने चार्टवर टच आणि होल्ड करा.

    • कालांतराने मूल्यामधील फरक बघा : दोन बोटांनी चार्टवर टच आणि होल्ड करा.

    • अधिक तपशील बघा : चार्टच्या खाली, 52-आठवड्याचे कमाल आणि किमान, बीटा, EPS आणि सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूम ह्यासारखे स्टॉकचे अतिरिक्त तपशील पहा.

    • बातम्या वाचा : अतिरिक्त बातम्यांची स्टोरी पाहण्यासाठी ‘वर’ स्वाइप करा, नंतर स्टोरीवर टॅप करा.

टिप : सिम्बलच्या कामगिरीचा त्वरित व्ह्यू पाहण्यासाठी तुमच्या वॉचलिस्टमधील सिम्बलवर टच आणि होल्ड करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.