ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Apple Pay सेट अप करणे

Apple Pay ला सपोर्ट करणाऱ्या अॅप्समध्ये आणि संकेतस्थळांवर सुरक्षित पेमेंट करण्यासाठी Apple Pay सेट अप करा. (काही देश आणि प्रदेशात उपलब्ध; Apple Pay ला सपोर्ट करणारे देश आणि प्रदेश पहा.)

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड समाविष्ट करणे

  1. सेटिंग  > ‘वॉलेट व Apple Pay’ वर जा.

  2. ‘कार्ड समाविष्ट करा’ वर टॅप करा. तुम्हाला तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करण्यास सांगितले जाऊ शकते.

  3. पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची कार्ड समाविष्ट करा :

    • नवीन कार्ड : ‘डेबिट कार्ड’ किंवा ‘क्रेडिट कार्ड’ वर टॅप करा, त्यानंतर ‘चालू ठेवा’ वर टॅप करा, त्यानंतर तुमचे कार्ड फ्रेममध्ये दिसेल अशा प्रकारे धरा किंवा कार्डचे तपशील मॅन्युअली प्रविष्ट करा.

    • Apple Card : iPad वर Apple Card वापरणे पहा.

    • तुमची मागील कार्ड : ‘मागील कार्ड’ वर टॅप करा, नंतर तुम्ही पूर्वी वापरलेले कोणतेही कार्ड निवडा. ह्या कार्डांमध्ये तुमच्या Apple अकाउंटशी संलग्न केलेले कार्ड, तुमच्या इतर डिव्हाइसवर Apple Pay सह तुम्ही वापरत असलेले कार्ड, तुम्ही ’Safari ऑटोफिल’ मध्ये समाविष्ट केलेले कार्ड, किंवा ‘वॉलेट’ मधून तुम्ही काढून टाकलेले कार्ड समाविष्ट असू शकतात. ‘चालू ठेवा’ वर टॅप करा, Face ID किंवा Touch ID ने ऑथेंटिकेट करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    • सपोर्ट करणाऱ्या ॲपचे कार्ड : “तुमच्या iPad वरील ॲपमधून” च्या खाली तुमची बँक किंवा कार्ड जारीकर्ता यांच्या ॲपवर टॅप करा.

  4. तुमची बँक किंवा कार्ड जारीकर्ता ह्यांच्याकडील तुमच्या माहितीची पडताळणी करा. Apple Pay सह वापरासाठी तुमचे कार्ड मंजूर करण्यापूर्वी ते तुम्हाला अधिक माहिती प्रदान करण्यास किंवा ॲप डाउनलोड करण्यास सांगू शकतात.

तुम्ही Apple Pay सह वापरण्यासाठी Apple वॉलेट मध्ये कार्ड समाविष्ट करू शकत नसल्यास काय करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

डिफॉल्ट कार्ड सेट करणे

तुम्ही समाविष्ट केलेले पहिले कार्ड, पेमेंटसाठी तुमचे डिफॉल्ट कार्ड बनते. तुम्ही कधीही डिफॉल्ट म्हणून वेगळे कार्ड सेट करू शकता.

सेटिंग  > ‘वॉलेट & Apple Pay’ वर जा, ‘डिफॉल्ट कार्ड’ वर टॅप करा, नंतर कार्ड निवडा.

कार्डचे तपशील बघणे आणि मॅनेज करणे

  1. सेटिंग  > ‘वॉलेट व Apple Pay’ वर जा.

  2. ‘कार्ड’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमची अलिकडील हिस्ट्री बघण्यासाठी ‘व्यवहार’ वर टॅप करा. ही माहिती लपवण्यासाठी, ‘हिस्ट्री दाखवा’ बंद करा. तुमच्या सर्व Apple Pay ॲक्टिव्हिटी बघण्यासाठी, तुमच्या कार्ड जारीकर्ता ह्यांच्याकडील स्टेटमेंट पहा.

    • कार्ड नंबर आणि ‘डिव्हाइस अकाउंट नंबर’ चे शेवटचे चार अंक बघा—मर्चंटला पाठवलेला नंबर.

    • बिलिंग पत्ता बदला.

    • Apple Pay मधून कार्ड काढून टाका.

नोट : Apple Pay ची उपलब्धता आणि त्याचे फीचर देश किंवा प्रदेशानुसार बदलतात. Apple Pay ला सपोर्ट करणारे देश आणि प्रदेश ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.