ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर छायाचित्रे आणि व्हिडिओ हटवणे किंवा लपवणे

छायाचित्र ॲपमध्ये, तुम्ही तुमच्या iPad मधील छायाचित्रे आणि व्हिडिओ हटवू शकता किंवा ते लपवू शकता. तुम्ही अलीकडे हटवलेली छायाचित्रे पुनर्प्राप्त देखील करू शकता. तुम्ही हटवलेली आणि लपवलेली छायाचित्रे ‘अलीकडे हटवलेले आणि लपवलेले’ मध्ये जतन केली जातात, जी तुम्ही Face ID, Touch ID, किंवा तुमचा पासकोड वापरून अनलॉक करता.

तुम्ही जेव्हा iCloud छायाचित्रे वापरता, तेव्हा तुम्ही हटवलेली किंवा लपवलेली छायाचित्रे तुमच्या सर्व डिव्हाइसवर हटवली किंवा लपवली जातात.

छायाचित्र किंवा व्हिडिओ हटवणे किंवा लपवणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. छायाचित्र किंवा व्हिडिओ बघताना, खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • हटवा : तुमच्या iPad आणि इतर डिव्हाइसमधून छायाचित्र हटवण्यासाठी हटवा बटण वर टॅप करा जिथे 'iCloud' छायाचित्रे चालू केलेले असेल आणि तुम्ही त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असेल.

      हटवलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ ‘अलीकडे हटवलेले’ मध्ये 30 दिवसांपर्यंत राहतील. त्या दरम्यान, तुम्ही त्यांना सर्व डिव्हाइसवरून पुनर्प्राप्त करू शकता किंवा कायमचे काढून टाकू शकता.

    • लपवा : ॲक्शन बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘लपवा’ वर टॅप करा.

      लपवलेली छायाचित्रे ‘लपवलेले’ संग्रहामध्ये मूव्ह केली जातात. तुम्ही त्यांना इतर कुठेही बघू शकत नाही.

      छायाचित्र ॲपमध्ये दिसू नये म्हणून लपवलेला संग्रह बंद करण्यासाठी, ’व्ह्यू’ मधून ’लपवलेले’ संग्रह लपवणे पहा.

अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ हटवणे किंवा लपवणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. पूर्ण छायाचित्र ग्रिड पाहण्यासाठी ‘खाली’ स्वाइप करा.

  3. ‘सिलेक्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला हटवायचे किंवा लपवायचे असलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओवर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • हटवा : तुमच्या iPad आणि इतर डिव्हाइसमधून आयटम हटवण्यासाठी हटवा बटण वर टॅप करा जिथे 'iCloud छायाचित्रे' चालू केलेले असेल आणि तुम्ही त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असेल.

      हटवलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ साइडबारमध्ये ‘युटिलिटी’ च्या खाली ‘अलीकडे हटवलेले’ मध्ये 30 दिवसांपर्यंत राहतील. त्या दरम्यान, तुम्ही त्यांना सर्व डिव्हाइसवरून पुनर्प्राप्त करू शकता किंवा कायमचे काढून टाकू शकता.

    • लपवा : अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘लपवा’ वर टॅप करा.

      लपवलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ साइडबारमध्ये ‘युटिलिटी’ च्या खाली ‘लपवलेले’ मध्ये ठेवले जातात.

छायाचित्रे लपवणे थांबवणे

तुम्ही ह्याआधी लपवलेले छायाचित्र तुम्ही उघड करू शकता, जेणेकरून ते तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये पुन्हा दिसेल.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. साइडबारमधील ‘युटिलिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ‘लपवलेले’ वर टॅप करा.

  3. तुम्हाला उघड करायचे असलेल्या छायाचित्रावर टॅप करा.

  4. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘उघड करा’ वर टॅप करा.

हटवलेली छायाचित्रे पुनर्प्राप्त करणे किंवा कायमचे हटवणे

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. साइडबारमधील ‘युटिलिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ‘अलीकडे हटविलेले’ वर टॅप करा.

  3. ‘सिलेक्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला पुनर्प्राप्त करायचे किंवा हटवायचे असलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओवर टॅप करा.

  4. स्क्रीनच्या तळाशी अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘पुनर्प्राप्त करा’ किंवा ‘हटवा’ वर टॅप करा.

नोट : जर तुम्ही शोधत असलेली छायाचित्रे ‘अलीकडे हटवलेले’ मध्ये दिसत नसतील, तर ते कदाचित ‘पुनर्प्राप्त केलेले’ मध्ये असतील. पुनर्प्राप्त केलेले आयटम शोधणे आणि त्यांना जतन करणे किंवा हटवणे पहा.

‘अलीकडे हटवलेले’ आणि ‘लपवलेले’ संग्रह लॉक आणि अनलॉक करणे

‘अलीकडे हटवलेले’ आणि ‘लपवलेले’ डिफॉल्टनुसार लॉक केलेले आहेत. Face ID, Touch ID किंवा तुमच्या पासकोडसह तुम्ही हे संग्रह अनलॉक करता.

डिफॉल्ट सेटिंग ‘लॉक केलेले’ वरून ‘अनलॉक केलेले’ वर बदलण्यासाठी, सेटिंग >  > ॲप > ‘छायाचित्र’ वर जा, त्यानंतर ‘Touch ID वापरा’, ‘Face ID वापरा’, किंवा ‘पासकोड वापरा’ बंद करा.

’व्ह्यू’ मधून ’लपवलेले’ संग्रह लपवणे

डिफॉल्टनुसार, ‘लपवलेले’ संग्रह लॉक केलेला आहे. त्याला व्ह्यूमधून काढून टाकून तुम्ही गोपनीयतेचा अतिरिक्त स्तर समाविष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या अकाउंटवर टॅप करा.

  3. ‘लपवलेले’ अल्बम बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.