ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad सह कीबोर्डमध्ये स्विच करणे

Apple बाह्य कीबोर्डसह, तुम्ही तुमच्या प्रदेशासाठी भाषा कीबोर्ड, इमोजी कीबोर्ड, तुम्ही समाविष्ट केलेले इतर भाषा कीबोर्ड आणि ऑनस्क्रीन कीबोर्डमध्ये स्विच करू शकता.

भाषा कीबोर्ड आणि ऑनस्क्रीन इमोजी कीबोर्डमध्ये स्विच करणे

  1. बाह्य कीबोर्डवर ‘कंट्रोल’ की दाबा आणि होल्ड करा.

  2. तुमच्या प्रदेशातील भाषा कीबोर्ड, इमोजी कीबोर्ड आणि तुम्ही समाविष्ट केलेले इतर भाषा कीबोर्ड्स ह्यादरम्यान जाण्यासाठी 'स्पेस बार' दाबा.

    जेव्हा तुम्ही इमोजी कीबोर्ड सिलेक्ट करता, तेव्हा तुम्ही पुढील गोष्टी करू शकता :

    • इमोजी सर्च करणे : इमोजी कीबोर्डच्या वर सर्च फील्डमध्ये सामान्यतः वापरलेला शब्द किंवा वाक्यांश प्रविष्ट करा—जसे की “हार्ट” किंवा “स्माइली फेस”.

    • इमोजी प्रविष्ट करणे : त्यावर टॅप करा; किंवा ते सिलेक्ट करण्यासाठी बाह्य कीबोर्डवरील ‘ॲरो की’ वापरा, त्यानंतर ‘परत जा’ दाबा.

टिप : इमोजी कीबोर्डवर त्वरित स्विच करण्यासाठी, iPad साठी Magic Keyboard किंवा Smart Keyboard वर स्विच कीबोर्ड ‘की’-E दाबा.

iPad साठी Magic Keyboard आणि Smart Keyboard सह, कीबोर्डमध्ये निवड करण्यासाठी तुम्ही स्विच कीबोर्ड ‘की’ देखील दाबू शकता. जर तुम्हाला भाषा बदलण्याऐवजी फक्त इमोजी कीबोर्ड दाखवण्यासाठी स्विच कीबोर्ड ‘की’ चा वापर करायचा असल्यास, सेटिंग  > सामान्य > कीबोर्ड > ‘हार्डवेअर कीबोर्ड’ वर जा, नंतर ‘इमोजीसाठी स्विच कीबोर्ड ‘की’ दाबा’ चालू करा.

टिप : जर तुम्ही चिनी, कोरियन, जपानी किंवा हिब्रू कीबोर्ड समाविष्ट केलेला असेल, तर तुम्ही लॅटिन स्क्रिप्ट आणि तुम्ही वापरत असलेल्या इतर कीबोर्डमध्ये बदल करण्यासाठी ‘कॅप्स लॉक’ की दाबू शकता. भाषा स्विच करण्यासाठी ‘कॅप्स लॉक’ की वापरण्यापासून रोखण्यासाठी, सेटिंग > सामान्य > कीबोर्ड > ‘हार्डवेअर कीबोर्ड’ वर जा, नंतर ‘कॅप्स लॉक वापरून भाषा स्विच करा’ बंद करा.

ऑनस्क्रीन कीबोर्डवर स्विच करणे

  1. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • ‘शॉर्टकट’ बारमध्ये (स्क्रीनच्या तळाशी असलेल्या) ‘कीबोर्ड शॉर्टकट’ बटण वर टॅप करा.

    • तुम्ही अतिरिक्त भाषा कीबोर्ड इन्स्टॉल केल्यास, प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट सूचनांच्या पुढील (शॉर्टकट बारमधील ‘श्रुतलेखन’ बटण च्या समोर) भाषा बटणावर टॅप करा.

  2. ‘कीबोर्ड दाखवा’ वर टॅप करा.

ऑनस्क्रीन कीबोर्ड लपवण्यासाठी, ‘कीबोर्ड लपवा’ बटण वर टॅप करा.

नोट : iPad साठी Magic Keyboard आणि Smart Keyboard सह, तुम्ही भाषा स्विच करण्याऐवजी फक्त इमोजी कीबोर्ड दाखवण्यासाठी स्विच कीबोर्ड ‘की’ वापरू शकता. सेटिंग  > सामान्य > कीबोर्ड > ‘हार्डवेअर कीबोर्ड’ वर जा, नंतर ‘इमोजीसाठी स्विच कीबोर्ड ‘की’ दाबा’ चालू करा. इतर भाषेच्या कीबोर्डमध्ये स्विच करण्यासाठी, ‘कंट्रोल की’ दाबा आणि होल्ड करा, नंतर ‘स्पेस बार’ दाबा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.