ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Apple News+ मध्ये कोडी शोधणे

जर तुम्ही Apple News+ ची सदस्यता घेतली, तर तुम्ही दैनंदिन आणि संग्रहित क्रॉसवर्ड, क्रॉसवर्ड मिनी, क्वार्टाइल्स, इमोजी गेम आणि सुडोकू कोडी ॲक्सेस करू शकता. काही कोडी सदस्यतेशिवाय उपलब्ध असू शकतात.

नोट : Apple News, Apple News+, आणि कोडी सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

‘कोडी’ फीड बघणे

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • साइडबारमध्ये ‘कोडी’ वर टॅप करा.

      तुम्हाला साइडबार दिसत नसल्यास, वरच्या डाव्या कोपऱ्यात साइडबार बटण वर किंवा टॅब बारमध्ये साइडबार बटण वर टॅप करा.

    • साइडबार किंवा टॅब बारमध्ये ‘आज’ वर टॅप करा, खाली स्क्रोल करा, त्यानंतर ‘कोडी’ गटावर टॅप करा.

कोड्याच्या प्रकारासाठी फीड फॉलो करणे

जर तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या कोड्यांचा (क्रॉसवर्ड, क्रॉसवर्ड मिनी, क्वार्टाइल्स, इमोजी गेम किंवा सुडोकू) त्वरित ॲक्सेस हवा असेल, तर तुम्ही तो प्रकार फॉलो करू शकता.

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. ‘कोडी’ फीड उघडा.

  3. क्रॉसवर्ड, मिनी, क्वार्टाइल्स, इमोजी गेम किंवा सुडोकू वर टॅप करा.

  4. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘फॉलो करा’ वर टॅप करा.

साइडबारमध्ये ‘कोडी’ श्रेणी दिसून येते, ज्यात कोड्याचे प्रकार खाली दिसत आहेत. त्यांना ‘आवडते’ बनवण्यासाठी, ‘संपादित करा’ वर टॅप करा, कोड्याच्या प्रकाराच्या पुढे ‘आवडते समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

नोट : जर तुम्ही Apple News+ ची सदस्यता घेतली, तर तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये खेळण्यासाठी ‘कोडी’ फीड आणि ‘कोड्याचे प्रकार’ फीडमध्ये ऑटोमॅटिकली कोडी डाउनलोड करू शकता.

कोडे निवडणे

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. कोडे शोधण्यासाठी पुढीलपैकी एका भागात जा :

    • ’आज’ चे फीड

    • ‘कोडी’ फीड

    • कोड्याच्या प्रकारासाठी फीड (क्रॉसवर्ड, क्रॉसवर्ड मिनी, क्वार्टाइल्स, इमोजी गेम किंवा सुडोकू)

  3. कोडे उघडण्यासाठी त्यावर टॅप करा.

क्रॉसवर्ड आणि सुडोकू कोड्यांचे काठिण्य मानांकन असते—सोपे, मध्यम किंवा आव्हानात्मक.

तुम्ही संपूर्ण ‘कोडे संग्रहण’ मध्ये मागील आणखी कोडी पाहू शकता. ‘संग्रहण’ च्या पुढे ‘उजवीकडे निर्देशित ॲरो’ बटण वर टॅप करा.

टिप : कोडे संग्रहण सॉर्ट करण्यासाठी किंवा फिल्टर करण्यासाठी, फिल्टर बटण वर टॅप करा.

कोड्याची आकडेवारी आणि स्ट्रीक बघणे

प्रत्येक कोडे फीडमध्ये तुम्हाला ‘स्कोअरबोर्ड’ सापडेल. ह्यामध्ये समाविष्ट आहे :

  • प्रत्येक कोडे प्रकारासाठी आकडेवारी—उदाहरणार्थ, सोडवलेली कोडी

  • तुमची सध्याची स्ट्रीक—तुम्ही दैनंदिन कोडे सोडवलेल्या सलग दिवसांची संख्या

  • तुमची सर्वात मोठी स्ट्रीक

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. कोडे प्रकारासाठी फीड निवडा, नंतर वर स्वाइप करा.

आकडेवारीला प्रभावित करणाऱ्या अटींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :

  • जर तुम्ही कोड्याचे सर्व भाग किंवा एखादा भाग दाखवण्यासाठी ‘उघड करा’ कमांडचा वापर केला, तर कोडे तुमच्या आकडेवारीनुसार गणले जाणार नाही आणि कोडे पूर्ण केल्यास स्ट्रीक सुरू होणार नाही किंवा चालू राहणार नाही.

  • iOS 17.5, iPadOS 17.5, macOS 14.5 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या डिव्हाइसवर तुम्ही पूर्ण केलेल्या कोड्यांची गणना तुमच्या आकडेवारीनुसार केली जाते. जुन्या OS व्हर्जनवर तुम्ही खेळलेल्या कोणत्याही कोड्यांची तुमच्या आकडेवारीनुसार गणना केली जात नाहीत.

  • तुम्ही iOS 17.5, iPadOS 17.5, macOS 14.5, किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या डिव्हाइसवर News ॲप उघडल्यानंतर, OS चे जुने व्हर्जन असलेल्या डिव्हाइसवर तुम्ही पूर्ण केलेली कोणतीही दैनंदिन कोडी तुमच्या स्ट्रीकमध्ये समाविष्ट केली जातात. उदाहरणार्थ, जर तुम्ही iOS 17.5 असलेल्या तुमच्या iPhone वर सोमवारचे क्रॉसवर्ड आणि मंगळवारचे क्रॉसवर्ड पूर्ण केले आणि नंतर iPadOS 17.4 असलेल्या तुमच्या iPad वर बुधवारचे क्रॉसवर्ड सोडवले, तर तुमची स्ट्रीक वाढवली जाईल.

  • कॉन्टिनेंटल यू. एस. आणि कॅनडामधील युझरने त्याच्या प्रकाशनाच्या 24 तासांच्या आत कोडे पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याची स्ट्रीकमध्ये गणना केली जाऊ शकेल. अलास्का आणि हवाईमधील यूझरना अतिरिक्त एक दोन तास मिळतात; त्यांना दिवसाचे कोडे स्थानिक वेळेनुसार मध्यरात्रीपूर्वी पूर्ण करावे लागते.

  • सुडोकू स्ट्रीक सुरू करण्यासाठी किंवा राखण्यासाठी, सध्याच्या दिवसातील कोणत्याही काठिण्य पातळीच्या सुडोकू कोड्यांपैकी किमान एक कोडे उत्तरे उघड न करता सोडवा.

तुमची आकडेवारी आणि स्ट्रीक्स तुमच्या Apple डिव्हाइसेसवर अद्ययावत राहतात, जेथे तुम्ही त्याच Apple अकाउंटवर साइन इन केलेले आहे. सेटिंग  > [तुमचे नाव] > iCloud > 'सर्व पहा' वर जा, (iCloud विभागात 'जतन केलेले’ मध्ये), त्यानंतर 'News' चालू करा.

इतरांशी स्पर्धा करा

Game Center मधील फ्रेंड्स आणि इतर कोडी सोडवणाऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठी, तुम्हाला ‘News’ मध्ये Game Center देखील सुरू करावे लागेल.

  1. सेटिंग  > ॲप > ‘News’ वर जा.

  2. ‘Game Center’ चालू करणे.

Game Center मधील प्रत्येक कोडे प्रकारासाठी तुमचे स्कोअर्स लीडरबोर्डवर दिसतात. ‘सुडोकू’ मध्ये प्रत्येक काठिण्य पातळीसाठी लीडरबोर्ड आहे.

फ्रेंड्सबरोबर खेळण्यासाठी Game Center वापरा पहा.

कोडे शेअर करणे

तुम्ही दुसऱ्या Apple News+ सदस्याला लिंक पाठवू शकता जेणेकरून ते देखील कोडे सोडवू शकतील.

  1. तुमच्या iPad वर News ॲपवर जा.

  2. कोडे उघडा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, ‘शेअर करा’ वर टॅप करा, नंतर ‘संदेश’, ‘Mail’ किंवा दुसरा शेअरिंग पर्याय निवडा.

तुमची उत्तरे दाखवली जात नाहीत आणि पूर्ण केलेल्या कोड्यांसाठी पुढील माहिती शेअर केली जाते :

  • क्रॉसवर्ड, क्रॉसवर्ड मिनी आणि सुडोकू : कोडे सोडवण्यासाठी तुम्हाला लागलेला वेळ

  • क्वार्टाइल्स : तुमचा रॅंक

  • इमोजी गेम : कोडे सोडवण्यासाठी तुम्ही वापरलेल्या मूव्हची संख्या

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.