ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर स्क्रीन टाइमसह शेड्यूल्स सेट करणे

तुम्ही स्क्रीनपासून दूर राहण्याचा वेळ शेड्यूल करू शकता, ॲपचा वापर आणि इतर गोष्टींसाठी वेळेच्या मर्यादा सेट करू शकता.

स्क्रीनपासून दूर रहाण्याचा वेळ शेड्यूल करणे

तुम्हाला तुमच्या डिव्हाइसपासून दूर राहण्यासाठी वेळ हवा असेल तेव्हा ॲप आणि नोटिफिकेशन ब्लॉक करा. उदाहरणार्थ, तुम्हाला जेवणाच्या वेळेला किंवा झोपेच्या वेळी डाउनटाइम शेड्यूल करायचा असू शकतो.

डाउनटाइमदरम्यान, कॉल, संदेश आणि तुम्ही अनुमतीसाठी निवडलेली ॲप उपलब्ध असतात. विशिष्ट ॲप्स आणि संपर्कांना अनुमती कशी द्यावी हे जाणून घेण्यासाठी, विशिष्ट संपर्कांकडून कॉल आणि संदेशांना अनुमती द्या किंवा ब्लॉक करणे आणि नेहमी अनुमती देण्यासाठी ॲप आणि संपर्क निवडणे पहा.

  1. सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ वर जा.

  2. ‘ॲप व संकेतस्थळ ॲक्टिव्हिटी’ वर टॅप करा, नंतर ‘ॲप व संकेतस्थळ ॲक्टिव्हिटी’ तुम्ही आधीच चालू केले नसेल तर ते चालू करा.

  3. ‘डाउनटाइम’ वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी एक कृती करा :

    • ‘उद्यापर्यंत डाउनटाइम चालू करा’ वर टॅप करा.

    • वेळेआधीच डाउनटाइम शेड्यूल करण्यासाठी ‘शेड्यूल केलेले’ वर टॅप करा.

    तुम्ही जेव्हा डाउनटाइम शेड्यूल करता, तेव्हा डाउनटाइम सुरू होण्याआधी 5 मिनिटे रिमाइंडर पाठवला जातो. तुम्ही रिमाइंडरकडे दुर्लक्ष करू शकता किंवा शेड्यूल केलेल्या डाउनटाइमच्या सुरूवातीपर्यंत डाउनटाइम चालू ठेवू शकता.

  4. ‘प्रतिदिन’ किंवा ‘दिवस कस्टमाइझ करा’ सिलेक्ट करा, नंतर सुरूवात आणि संपण्याच्या वेळा सेट करा.

तुम्ही ‘शेड्यूल केलेले’ बंद करून कोणत्याही वेळी डाउनटाइम शेड्यूल बंद करू शकता.

ॲपच्या वापरासाठी मर्यादा सेट करणे

ॲपच्या श्रेणीसाठी (उदाहरणार्थ, खेळ किंवा सोशल नेटवर्किंग) आणि स्वतंत्र ॲपसाठी वेळ मर्यादा सेट करा.

  1. सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ वर जा.

  2. ‘ॲप मर्यादा’ वर टॅप करा, त्यानंतर ’मर्यादा समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. एक किंवा अधिक ॲप श्रेणी सिलेक्ट करा.

    स्वतंत्र ॲपसाठी मर्यादा सेट करण्यासाठी, एखाद्या श्रेणीतील सर्व ॲप पाहण्यासाठी त्या श्रेणीच्या नावावर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला ज्या ॲपसाठी मर्यादा सेट करायची आहे, ती ॲप सिलेक्ट करा. तुम्ही अनेक श्रेणी किंवा ॲप सिलेक्ट केली, तर तुम्ही सेट केलेली वेळमर्यादा त्या सर्वांवर लागू होते.

  4. शीर्षस्थानी उजव्या बाजूला ‘पुढील’ वर टॅप करा, नंतर अनुमती असलेली वेळ सेट करा.

    प्रत्येक दिवसासाठी वेळ सेट करण्यासाठी, ’दिवस कस्टमाइझ करा’ वर टॅप करा, त्यानंतर विशिष्ट दिवसांसाठी मर्यादा सेट करा.

  5. तुम्ही मर्यादा सेट करणे पूर्ण केल्यावर, ’समाविष्ट करा’ वर टॅप करा.

नेहमी अनुमती देण्यासाठी ॲप आणि संपर्क निवडणे

कोणत्याही वेळी (उदाहरणार्थ, आपत्कालीन परिस्थितीतही), म्हणजेच डाउनटाइममध्येही, तुम्ही वापरू शकाल अशी ॲप आणि संभाषण करू शकाल असे संपर्क उल्लेखित करा.

  1. सेटिंग  > स्क्रीन टाइम > ‘नेहमीच अनुमती दिली आहे’ वर जा.

  2. तुम्हाला ज्या संपर्कांसह संभाषणाला अनुमती द्यायची आहे, ते संपर्क उल्लेखित करण्यासाठी, ‘संपर्क’ वर टॅप करा.

    तुम्ही ’संभाषण मर्यादा’ मध्ये सिलेक्ट केलेला पर्याय येथे दिसतो. तुम्ही हे सेटिंग ‘विशिष्ट संपर्क’ मध्ये बदलू शकता, नंतर पुढीलपैकी एक निवडा :

    • ‘माझे संपर्क’ मधून निवडा : संभाषणाला अनुमती द्यायची आहे, असे विशिष्ट लोक सिलेक्ट करण्यासाठी.

    • नवीन संपर्क समाविष्ट करा : नवीन संपर्क समाविष्ट करून त्या व्यक्तीशी संभाषणाला अनुमती देण्यासाठी.

  3. वरच्या डाव्या बाजूला मागे बटण वर टॅप करा, त्यानंतर ’अनुमती दिलेले ॲप्स’ च्या खाली ‘काढून टाका’ बटण वर टॅप करा किंवा ’ॲप्स निवडा’ च्या खाली ‘इन्सर्ट करा’ बटण वर टॅप करा.

  4. शीर्षस्थानी डाव्या बाजूला मागे बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.