ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPad वर Apple Intelligence वापरणे

Apple Intelligence फीचर Mac, iPad आणि iPhone वर डिस्प्ले केले गेले.

Apple Intelligence* ही iPadOS 18 मधील बिल्ट इन केलेली वैयक्तिक इंटेलिजन्स सिस्टीम आहे. हे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करताना, उपयुक्त आणि संबंधित इंटेलिजन्स डिलिव्हर करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक संदर्भातील समजुतीसह जनरेटिव्ह मॉडेलच्या सामर्थ्याला एकत्रित करते.

नोट : Apple Intelligence सर्व iPad मॉडेल्सवर किंवा सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही.** सर्वात अलीकडील उपलब्ध फीचर्स ॲक्सेस करण्यासाठी, तुम्ही iPadOS चे नवीनतम व्हर्जन वापरत असल्याची खात्री करा.

Apple Intelligence सुरू करणे

जर Apple Intelligence बंद असेल, तर तुम्ही ते सुरू करू शकता. सेटिंग > 'Apple Intelligence व Siri' वर जा, नंतर पुढीलपैकी एक करा :

  • Apple Intelligence च्या पुढील बटणावर टॅप करा.

  • ‘Apple Intelligence सुरू करा’ वर टॅप करा.

    तुम्हाला दिसणारा पर्याय तुमच्याकडे असलेल्या iPadOS च्या व्हर्जनवर आणि तुम्ही पूर्वी Apple Intelligence सेट अप केले आहे का ह्यावर आधारित आहे.

नोट्स ॲपमध्ये व्यवस्थापित केलेला टेक्स्ट टेबलमध्ये दाखवणारा iPad.

परिपूर्ण शब्द शोधणे

टेक्स्ट सारांशित करू शकणारे, तुमचे काम प्रूफरीड करू शकणारे आणि तुम्हाला योग्य शब्द आणि टोन शोधण्यात मदत करणारी लेखन साधने वापरून तुमची संवाद साधण्याची पद्धत रूपांतरित करा.

लेखनाची साधने कशी वापरायची

Image Playground ॲप विंडो सुपरहिरोच्या वेशातील व्यक्तीची तयार केलेली इमेज दाखवते.

अद्वितीय इमेजेस आणि तुमचा स्वतःचा इमोजी तयार करणे

नोट्स ॲपमध्ये Image Playground ॲप किंवा ’इमेज वॉण्ड’ वापरून काही सेकंदात मजेदार, मूळ इमेजेस तयार करा. तुम्ही वर्णनातून कस्टम इमोजी देखील बनवू शकता ज्याला Genmoji म्हणतात.

मूळ इमेजेस कशा तयार कराव्यात

तुमचे स्वतःचे इमोजी कसे तयार करावे

इमेज वॉण्ड कशी वापरावी

लॉक स्क्रीनवर कीबोर्ड दाखवणारा iPad. Siri विनंती स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसते.

Siri सह बरेच काही करा

Siri साठी विनंती टाइप करा, तुमच्या Apple उत्पादनांविषयीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा, ChatGPT चा उत्तम परिणामांसाठी वापर करा आणि बरेच काही करा.

Siri सह Apple Intelligence कसे वापरावे

नोट्स ॲपमध्ये लिहिली जाणारी स्टोरी दाखवणारे iPad. स्क्रीनच्या उजवीकडे ’लेखन साधनांसह लिहा’ असा संवाद आहे ज्यामध्ये बदलाचे वर्णन करण्यासाठी, ChatGPT सूचना निवडण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी पर्याय समाविष्ट आहेत.

अखंडपणे इंटिग्रेट केलेले ChatGPT

Siri आणि लेखन साधनांबरोबर इंटिग्रेट होत असलेले ChatGPT एक्सटेंशन सुरू करा, ज्यामुळे स्क्रॅचमधून टेक्स्ट लिहिण्याच्या क्षमतेसह आणखी अधिक कौशल्य मिळवता येईल.

Apple Intelligence सह ChatGPT कसे वापरावे

‘लॉक स्क्रीन’ वर ’व्यत्यय कमी करा फोकस’ चालू केलेला, वेळ संवेदनशील नोटिफिकेशन्स दर्शविणारा iPad.

नॉइज आणि फोकस कमी करणे

Apple Intellingence नोटिफिकेशन्स सारांशित आणि प्राधान्यकृत करू शकते आणि व्यत्यय कमी करू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती दाखवली जाते.

नोटिफिकेशन्स सारांशित आणि प्राधान्यकृत कसे करायचे आणि व्यत्यय कमी कसा करायचा

ॲप्ससह Apple Intelligence वापरणे

Mail

तुमचे सर्वात तातडीचे ईमेल बघा, स्मार्ट रिप्लाय ॲपसह त्वरित ईमेल प्रतिसाद तयार करा आणि मोठे ईमेल सारांशित करा.

Mail मध्ये Apple Intelligence वापरा

संदेश

न वाचलेल्या ‘संदेश’ संभाषणांचे सारांश पहा आणि ‘स्मार्ट रिप्लाय’ द्वारे जलद प्रतिसाद तयार करा.

‘संदेश’ मध्ये Apple Intelligence वापरा

नोट्स

तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड केल्यानंतर, ट्रान्सक्रिप्टचा सारांश तयार करण्यासाठी Apple Intelligence चा वापर करा.

Apple Intelligence सह ऑडिओ रेकॉर्डिंगचा सारांश मिळवा

छायाचित्र

वर्धित सर्चसह छायाचित्रे शोधा, आठवणींचे चित्रपट तयार करा आणि ’क्लीन अप’ चा वापर करून विचलित करणारे ऑब्जेक्ट्स काढून टाका.

‘छायाचित्र’ मध्ये Apple Intelligence वापरा

Safari

Safari ॲपमध्ये वेबपृष्ठाचा सारांश उत्पन्न करण्यासाठी Apple Intelligence चा वापर करा.

Apple Intelligence सह वेबपृष्ठ सारांश मिळवा

आणि बरेच काही…

फीचर्स, सपोर्ट करणारी डिव्हाइसेस आणि भाषांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence संकेतस्थळ तपासा.

Apple Intelligence बंद करणे

सेटिंग > ‘Apple Intelligence व Siri’ वर जा, नंतर Apple Intelligence च्या पुढील बटणावर टॅप करा.

*Apple Intelligence जनरेटिव्ह मॉडेल्सचा वापर करते, आणि आउटपुट चुकीचे, अनपेक्षित किंवा आक्षेपार्ह असू शकतात. अचूकतेसाठी महत्वाची माहिती तपासा.
**Apple Intelligence हे iPad mini (A17 Pro) आणि M1 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या तसेच Siri आणि डिव्हाइस भाषा चीनी (सरलीकृत), इंग्रजी (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, यू.के. किंवा यू.एस.), फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, पोर्तुगीज (ब्राझील) किंवा स्पॅनिशवर सेट केलेल्या iPad मॉडेल्सवर बीटामध्ये उपलब्ध आहे. काही फीचर्स कदाचित सर्व प्रदेश किंवा भाषांमध्ये उपलब्ध नसतील. अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.