ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’आरोग्य’ मध्ये तुमचे ‘आरोग्य तपशील’ भरणे

तुमचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी, ‘आरोग्य तपशील’ मध्ये तुमचे नाव, जन्मदिनांक, लिंग आणि इतर मूलभूत माहिती समाविष्ट करा.

‘आरोग्य तपशील’ स्क्रीन भरणे

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ’आरोग्य’ उघडता, तेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दलची मूलभूत आरोग्य माहिती प्रदान करण्यास सांगितले जाते. तुम्ही विनंती केलेली सर्व माहिती प्रदान केली नसल्यास, तुम्ही ती नंतर ‘आरोग्य तपशील’ स्क्रीनवर समाविष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. वरच्या डाव्या बाजूला तुमच्या छायाचित्राच्या किंवा आद्याक्षरांच्या पुढे ‘प्रोफाइल’ वर टॅप करा.

  3. ‘आरोग्य तपशील’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

    ‘आरोग्य तपशील’ स्क्रीन, ज्यात नाव, जन्मदिनांक, रक्तगट आणि इतर माहितीसाठी फील्ड समाविष्ट आहेत.
  4. बदल करण्यासाठी, फील्डवर टॅप करा.

  5. तुमचे काम झाल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.