ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ॲप्समध्ये टेक्स्टचे भाषांतर करणे

iPad वर, ‘कॅमेरा’, ‘छायाचित्र’, ‘Safari’, ‘संदेश’, ‘Mail’, सपोर्ट असलेली थर्ड पार्टी ॲप आणि इतर ॲपमध्ये तुम्ही टेक्स्टचे भाषांतर करू शकता.

नोट : सपोर्ट असलेल्या भाषांसाठी भाषांतर उपलब्ध आहे. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

ॲपमध्ये टेक्स्टचे भाषांतर करणे

Safari, संदेश, Mail, सपोर्ट असलेली थर्ड पार्टी ॲप आणि इतर ॲपमध्ये भाषांतर करण्यासाठी तुम्ही कोणतेही टेक्स्ट सिलेक्ट करू शकता. तुम्ही तुमच्या iPad वर टेक्स्ट प्रविष्ट करता, तेव्हा तुम्ही जे लिहिले ते तुम्ही भाषांतराने बदलूही शकता.

  1. तुमच्या iPad वर Safari, संदेश किंवा Mail ह्यासारख्या ॲपवर जा.

  2. तुम्हाला भाषांतरित करायचे असलेले टेक्स्ट सिलेक्ट करा, नंतर ‘भाषांतर करा’ वर टॅप करा.

    तुम्हाला ‘भाषांतर करा’ दिसत नसल्यास, अधिक पर्याय पाहण्यासाठी ’अधिक आयटम दाखवा’ बटण वर टॅप करा.

  3. तुम्ही सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचे तुम्हाला ज्या भाषेत भाषांतर करायचे आहे, त्या भाषेवर टॅप करा.

  4. टेक्स्टच्या भाषांतराखाली, पुढीलपैकी काहीही एक निवडा :

    • भाषांतरासह बदला : तुमच्या मूळ टेक्स्टला भाषांतराने बदला (केवळ संपादित करण्यायोग्य टेक्स्टचे भाषांतर करताना उपलब्ध).

    • भाषांतर कॉपी करा : भाषांतरित टेक्स्ट कॉपी करा.

    • ‘आवडते’ मध्ये समाविष्ट करा : ‘आवडते’ यादीमध्ये भाषांतर समाविष्ट करा.

    • ‘भाषांतर’ मध्ये उघडा : भाषांतर ॲपमध्ये अधिकाधिक भाषांतरे करा.

    • भाषा डाउनलोड करा : ऑफलाइन भाषांतरासाठी भाषा डाउनलोड करा.

    • मूळ टेक्स्ट ऐका : ‘अधिक’ वर टॅप करा, नंतर मूळ टेक्स्ट ऐकण्यासाठी करडे ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

    • भाषांतरित टेक्स्ट ऐका : भाषांतरित टेक्स्ट ऐकण्यासाठी निळे ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

छायाचित्रांमधील टेक्स्टचे भाषांतर करा

सपोर्ट असलेल्या मॉडेल वर, तुम्ही टेक्स्ट समाविष्ट असलेले छायाचित्र बघता, तेव्हा ‘टेक्स्ट शोधा’ बटण वर टॅप करा, तुम्हाला भाषांतरित करायच्या असलेल्या टेक्स्टला टच आणि होल्ड करा, नंतर ‘भाषांतर करा’ वर टॅप करा.

तुम्हाला ‘भाषांतर करा’ दिसत नसल्यास, अधिक पर्याय पाहण्यासाठी ’अधिक आयटम दाखवा’ बटण वर टॅप करा.

कॅमेरा ॲपमध्ये टेक्स्टचे भाषांतर करा

सपोर्ट केलेल्या मॉडेल वर, तुम्ही कॅमेरा ॲपचा वापर करून तुमच्या आजूबाजूच्या टेक्स्टचे, उदाहरणार्थ एखाद्या पाककृतीचे, भाषांतर करू शकता.

  1. तुमच्या iPad वर कॅमेरा ॲपवर जा.

  2. टेक्स्ट स्क्रीनवर दिसावे, अशा पध्दतीने iPad ठेवा.

  3. ओळखल्या गेलेल्या टेक्स्टभोवती पिवळी फ्रेम दिसल्यानंतर, ‘टेक्स्ट शोधा’ बटण वर टॅप करा.

  4. तुम्हाला भाषांतरित करायचे असलेले टेक्स्ट सिलेक्ट करा, नंतर ‘भाषांतर करा’ वर टॅप करा.

    तुम्हाला ‘भाषांतर करा’ दिसत नसल्यास, अधिक पर्याय पाहण्यासाठी ’अधिक आयटम दाखवा’ बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.