ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Apple TV ॲपमध्ये अनेक लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीम बघणे

iPad वर, ‘मल्टीव्ह्यू’ सह तुम्ही एकाच वेळी चार लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीम प्ले करू शकता.

नोट : मल्टीव्ह्यू iPadOS 17.2 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर उपलब्ध आहे; MLS Season Pass (MLS साठी) किंवा Apple TV+ (फ्रायडे नाइट बेसबॉल आणि संडे नाइट सॉकरसाठी) चे सदस्यत्वदेखील आवश्यक आहे. अनेक गेम बघण्याचे पर्याय शेड्यूलप्रमाणे बदलू शकतात.

अनेक लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीम बघणे

  1. तुमच्या iPad वरील Apple TV ॲपवर जा.

  2. साइडबारमध्ये ‘स्पोर्ट्स’ वर टॅप करा, त्यानंतर लाइव्ह गेम सुरू करा.

  3. तुम्ही मॅच बघत असताना, प्लेबॅक कंट्रोल दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक करा :

    • वरच्या डाव्या बाजूला ‘मल्टीव्ह्यू’ बटण वर टॅप करा, त्यानंतर 'आणखी समाविष्ट करा' च्या खाली गेमवर टॅप करा.

    • डावीकडे तळाशी ‘लाइव्ह स्पोर्ट्स’ किंवा ‘बघणे चालू ठेवा’ वर टॅप करा, ‘लाइव्ह गेम’ वर टच आणि होल्ड करा, नंतर ‘मल्टीव्ह्यूमध्ये बघा’ वर टॅप करा.

  4. ‘मल्टीव्ह्यू’ मध्ये असताना, पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • स्ट्रीम समाविष्ट करा : तळापासून वर स्वाइप करा, नंतर ‘आणखी समाविष्ट करा’ पंक्तीमधील स्ट्रीमवर टॅप करा.

    • स्ट्रीम मूव्ह करा : स्ट्रीमवर टच आणि होल्ड करा, नंतर ते नवीन स्थानावर ड्रॅग करा.

    • ऑडिओ वेगळ्या स्ट्रीममध्ये बदला : एखाद्या स्ट्रीमवर फोकस करण्यासाठी त्यावर टॅप करा.

      नोट : ऑडिओ प्ले करणाऱ्या स्ट्रीमच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात ध्वनी बटण दिसते.

    • स्ट्रीम फूल स्क्रीनमध्ये बघा : स्ट्रीमवर टॅप करा, नंतर ‘फुल स्क्रीन’ बटण वर टॅप करा. ‘मल्टीव्ह्यू’ वर परत येण्यासाठी ‘मल्टीव्ह्यू’ बटण वर टॅप करा.

    • ‘मल्टीव्ह्यू’ मधून स्ट्रीम हटवा : स्ट्रीमवर टॅप करा, नंतर हटवा बटण वर टॅप करा.

    • ‘मल्टीव्ह्यू’ मधून बाहेर पडा : मागे बटण वर टॅप करा. ‘मल्टीव्ह्यू’ वर परत येण्यासाठी ‘मल्टीव्ह्यू’ बटण वर टॅप करा.

स्पोर्ट्स स्ट्रीमचा लेआउट बदलणे

ग्रिडमधील स्ट्रीमचा लेआउट बदलण्यासाठी, पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

  • जेव्हा दोन स्ट्रीम सिलेक्ट केल्या जातात : 70/30 प्रमाणामध्ये स्ट्रीम बघण्यासाठी शीर्षस्थानी उजव्या बाजूला ग्रिड बटण वर टॅप करा. त्याच आकारात स्ट्रीम बघण्यासाठी ग्रिड बटण वर पुन्हा टॅप करा.

  • जेव्हा चार स्ट्रीम सिलेक्ट केल्या जातात : 70/30 च्या प्रमाणात (70 टक्के एक स्ट्रीम, 30 टक्के तीन स्ट्रीम) स्ट्रीम बघण्यासाठी वर उजवीकडे असलेल्या ग्रिड बटण वर टॅप करा. त्याच आकारात स्ट्रीम बघण्यासाठी ग्रिड बटण वर पुन्हा टॅप करा.

Apple TV+ (ज्यामध्ये फ्रायडे नाइट बेसबॉल, संडे नाइट सॉकर किंवा काही देश आणि प्रदेशात दोन्ही समाविष्ट आहेत) आणि MLS Season Pass (ज्यामध्ये संडे नाइट सॉकर समाविष्ट आहे) साठी सदस्यता आवश्यक आहेत. MLS Season Pass, संडे नाइट सॉकर आणि फ्रायडे नाइट बेसबॉलसाठी iPadOS 16.2 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे. सर्व फीचर्स आणि कॉण्टेण्ट सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.