ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘संगीत’ मध्ये प्लेलिस्टवर सहयोग करणे

जर तुम्ही Apple Music ची सदस्यता घेतली, तर तुम्ही प्लेलिस्ट शेअर करू शकता आणि इतरांबरोबर त्यावर सहयोग करू शकता. प्रत्येकजण सहयोगी प्लेलिस्ट मध्ये संगीत समाविष्ट करू शकतो, काढून टाकू शकतो आणि रिऑर्डर करू शकतो आणि इमोजीसह गाण्यांवर प्रतिक्रिया देऊ शकतो.

नोट : Apple Music सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

प्लेलिस्टवर सहयोग करण्यासाठी इतरांना आमंत्रित करणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. प्लेलिस्टवर टॅप करा, नंतर सहयोग बटण वर टॅप करा.

  3. लोकांनी जॉइन करण्यापूर्वी त्यांना मान्यता देण्यासाठी, ’सहयोगींना मान्यता द्या’ चालू करा.

    तुम्ही हा पर्याय चालू न केल्यास, लिंक असलेली कोणतीही व्यक्ती सहयोगी प्लेलिस्ट जॉइन करू शकते.

  4. ‘सहयोग करणे चालू करा’ वर टॅप करा, त्यानंतर प्लेलिस्टची लिंक पाठवण्यासाठी AirDrop, संदेश किंवा Mail सारखी शेअरिंग पद्धत निवडा.

    लिंक प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने सहयोग सुरू करण्यासाठी ‘प्लेलिस्ट जॉइन करा’ वर टॅप करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही ओनर असाल आणि तुम्ही ‘सहयोगींना मान्यता द्या’ चालू केले असेल, तर जेव्हा नवीन व्यक्ती सहयोगी प्लेलिस्ट जॉइन करण्यासाठी विनंती करते तेव्हा नोटिफिकेशन वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसतात.

प्लेलिस्टवर सहयोग करण्यासाठी अधिक लोकांना समाविष्ट करणे

जर तुम्ही सहयोगी प्लेलिस्टचे ओनर असाल किंवा ओनरने ‘सहयोगींना मान्यता द्या’ चालू केले नसेल, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये अनेक लोकांबरोबर लिंक शेअर करू शकता.

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. सहयोगी प्लेलिस्टवर टॅप करा, ‘सहयोग मॅनेज करा’ बटण वर टॅप करा, नंतर खालीलपैकी एक करा :

    • जवळपासच्या व्यक्तीला समाविष्ट करा : QR कोडवर टॅप करा. तुमच्या iPad वर डिस्प्ले होणारा कोड स्कॅन करण्यासाठी इतर लोक त्यांच्या iPad वरील कॅमेरा वापरुन प्लेलिस्ट जॉइन करू शकतात.

    • इतर कोणाला तरी समाविष्ट करा : “नवीन लिंक उत्पन्न करा” वर टॅप करा (आवश्यक असल्यास), ‘आमंत्रण लिंक शेअर करा’ वर टॅप करा, नंतर प्लेलिस्टवर सहयोग करण्यासाठी इतरांना आमंत्रित करण्यासाठी सूचनांचे पालन करा.

सहयोगी प्लेलिस्टसाठी शेअर केलेल्या सेटिंग मॅनेज करणे

जर तुम्ही ओनर असाल, तर तुम्ही प्लेलिस्टवर सहयोग करण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्ही व्यक्तींसाठी किंवा प्रत्येकासाठी ॲक्सेस आणि परवानग्या बदलू शकता.

संगीत ॲपमधील ‘सहयोग मॅनेज करा’ स्क्रीन.
  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. सहयोगी प्लेलिस्टवर टॅप करा, ‘सहयोग मॅनेज करा’ बटण वर टॅप करा, नंतर खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • इतरांना आमंत्रित करा : प्लेलिस्टवर सहयोग करण्यासाठी अधिक लोकांना समाविष्ट करणे पहा.

      नोट : जर तुम्ही ’सहयोगींना मान्यता द्या’ चालू केले नाही, तर प्लेलिस्टवर सहयोग करणारी कोणतीही व्यक्ती सहयोगी प्लेलिस्टची लिंक शेअर करू शकते.

    • लोक जॉइन होण्यापूर्वी त्यांना मान्यता द्या : ‘सहयोगींना मान्यता द्या’ चालू करा.

    • विनंती स्वीकारा : व्यक्तीला सहयोगी प्लेलिस्ट जॉइन करण्याची अनुमती देण्यासाठी ’विनंती स्वीकारा’ बटण वर टॅप करा.

    • विनंती नाकारा : जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सहयोगी प्लेलिस्ट जॉइन करू नये असे वाटत असेल तर ‘विनंती अस्वीकृत करा’ बटण वर टॅप करा.

एक किंवा अधिक लोकांबरोबर प्लेलिस्टवर सहयोग करणे थांबवणे

जर तुम्ही ओनर असाल, तर तुम्ही प्लेलिस्टमधून लोकांना काढून टाकू शकता किंवा त्यावर सहयोग करणे पूर्णपणे थांबवू शकता.

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. सहयोगी प्लेलिस्टवर टॅप करा, ‘सहयोग मॅनेज करा’ बटण वर टॅप करा, नंतर खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • एक व्यक्ती काढून टाका : व्यक्तीच्या नावावर डावीकडे स्वाइप करा, नंतर ‘काढून टाका’ वर टॅप करा.

    • प्लेलिस्टवर सहयोग करणे थांबवा : ‘थांबवा’ वर टॅप करा.

सहयोगी प्लेलिस्टमधून स्वतःला काढून टाकणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. सहयोगी प्लेलिस्टवर टॅप करा, ‘सहयोग मॅनेज करा’ बटण वर टॅप करा, नंतर ‘बाहेर पडा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.